आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 17, 2011

शालिवाहन शक मधील सण

शालिवाहन शक मधील सण

१ चैत्र : या महिनात गुढीपाडवा सण असतो या दिवशी अभ्यंगस्नान करुन गुढी उभी करावी. ब्रह्मध्वजाय नम: असे म्हणून गुढीचे पूजन करावे. ब्रह्मध्वज नमस्ते S स्तु सर्वाभीष्ट फलप्रद | प्रात्पे S स्मिन्वत्सरे नित्य मद्गृहे मंगलं कुरु || या मंत्राने प्रार्थना करुन नंतर पंचांगावरील गनपतिचे पूजन करावे. रामनवमी व हनुमान जयंती मारुतीचा जन्म दिवस असतो.

२ वैशाख : अक्षय तृतीया : गौरीहर दोलोत्सवाची समाप्ती अक्षय्य तृतीयेस करावी.

३ ज्येष्ठ : वटपौर्णिमा : वडाखाली ब्रह्मा सावित्रीचे पूजन वायन (वाण) आणि सत्यवान सावित्री कथा श्रवण व उपोषण ही मुख्य कर्मे आहेत. या दिवशी बैलाचा सण साजरा करतात. बैलाची पूजा करतात.

४ आषाढ : चातुर्मासाचा आरंभ व गुरूपौर्णिमा व्यासपूजन करतात. दीप पूजा दिव्याची आवस म्हणून अमावास्या ओळखली जाते.

५ श्रावण : नवनागपूजन व श्रीकृष्ण जयंती व अमावास्या ला तोडुन आणलेले दर्भ वर्षभर उपयोगात आणतात. बैलाची पूजा केली जाते. अमावासेला करतातं.

६ भाद्रपद : शुक्लपक्ष चतुर्थी ला गणपती आणून पूजा करतात. ऋषिपंचमी गौरी पूजन करतातं. अनंत चतुर्दशी अनंताची पूजा करतातं.

७ आश्विन : नवरात्र सुरु करतातं ललिता पंचमी दसरा सण साजरा करतातं. गोवत्स व्दादशी आयंकाळी वासरासह गाई ची पूजा करतातं. धनत्रयोदशी सूर्यदयाच्या आधी अंगोळ अभंगस्नान करतातं कणकेचा दिवा न ओवाळतातं संस्ध्याकाळी दिवा दक्षिण या दिशा बघून दिवा ठेवतातं.

८ कार्तिक : बलिप्रतिपदा साडेतीन मुहूरतापैकी एक दिवस म्हणून मानला जातो.वहिची पूजा लक्ष्मी व खोंड म्हणजे कुबेर याची पूजा करतातं. वडील व नवरा यांना ओवाळतातं.यमव्दितया भाऊबीज भावाला ओवाळतातं. तुळसी विवाह करतातं. कार्तिक त्रिपुरारी पोर्णिमा दिवा सकाळी चं लावतातं.

९ मार्गशीर्ष : खंडोबाचे नवरात्र मार्तंड (मल्हारी) खंडोबाचा सहा रात्रीचा उत्सव प्रतिपदा ते चंपाषष्ठी पर्यंत असतो. नागपुजनाच्या दिवशी नागाची पूजा करून अनेक प्रकारच्या पक्वान्नांवर दिवे लावून खंडोबास व मुलांना ओवाळावे. चंपाषष्ठी मोठ्ठा उत्सव करावा .दत्त्तात्रय जयंती करतातं.

१० पौंष : शाकंभरी देवी नवरात्र करतातं मकरसंक्रात सण साजरा करतात.

११ माघ : गणेश जयंती श्रीगणेशाचा जन्म जन्मोत्सव असतो. वंसत पंचमी रथसप्तमी गुरु प्रतिपदा श्रीक्षेत्र गानगापूर येथे मोठा उत्सव व यात्रा असते. महाशिवरात्र या दिवशी शिवाची पूजा अभिषेक अर्चा जप करावे .सहस्त्र बेलची त्रिदले वहावीत. कवठा च्या पदार्था चा नैवेद्द दाखवावा.

१२ फाल्गुन : होळी (हुताशनी) पोर्णिमा सांयकाळी होळी पेटवून पूजा करावी.धूलिवंदन दुसरे दिवशी करावे. रंगपंचमी करतातं वंसतोत्सव साजरा करतातं.

मागील ब्लॉग मध्ये महिने व पौर्णिमा लिहिले आहेतं आता सण लिहिले आहेत.

कमळ

कमळ