ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण हेमंतऋतु नक्षत्र हस्त कृष्णपक्ष पौष महिना सप्तमी रविवार १५ जानेवारी (१) २०१२ तारीख दिनांक ला मकरसंक्रांति भानुसप्तामि आहे.
ह्यादिवसा पासून माघशुक्लपक्ष रथसप्तामि संक्रांति च महत्व आहे तिळगुळ हलवा तिळा ची गुळ घालून केलेली पोळी करणे हळद कुंकू करणे काही वस्तू किंवा धान्य पदार्थ देण्याची पध्दत आहे. मी तिळगुळ याची वडी व लाडू केले आहे. तीळगुळ दडी व लाडू : प्रथम तीळ भाजून घ्यावे गुळा चा कळतनळत पाणी घालून गुळ विरघळू द्यावा पाणी घातल्यामुळे गुळ जळत नाही.पाक घट्ट करावा.पाकामध्ये तीळ टाकावेत किसलेले खोबर घालावे कोणी शेंगदाने पण घालतात.मी तीळ किसलेले खोबर घातले आहे.थोड सादुक तूप तीळ पाक ह्यात घालावे. पोळपाट ला तूप लावाव. हाताने सारखे करून घ्यावे सुरुने वड्या पाडाव्यात.किंवा गोल लाडू करावे.खुपदिवस तीळ गुळा चे लाडू व वड्या राहतात.
घरोघरी तिळगुळा चे लाडू वडी पोळी असे पदार्थ करतात. तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतात.
तिळगुळ घ्या गोड बोला !




Comments on: "तिळगुळ घ्या गोड बोला !" (1)
शुभेच्छा