ॐ
गाजराचा हलवा : पांढरा भोपळा चा दुधी हलवा दाखविला होता.
आता गाजर हलवा दाखवीत आहे.गाजर धुवून घ्यावेत.किसून
घ्यावेत.पातेल्यात दूध साखर किसलेले गाजर घालावे.पातेले
पेटत्या ग्यासवर ठेवून दूध सर्व आटेल तोपर्यंत गाजर साखर दूध
हलवत राहावे.अगदी घट्ट करू नये थोडस पातळ गाजर दूध साखर
ठेवावे.तयार झाल्यावर बदाम बारीक करून किंवा दिसण्यासाठी
अख्खे ठेवावेत. छान नुसता पण खाण्यास द्यावा.पोळी बरोबर
पण खाल्ला तरी चालतो.वेलदोडे पूड टाकली तरी चालते.
घरोघरी गाजर हलवा करतात.


Comments on: "गाजराचा हलवा" (3)
गाजर, दूध आणि साखर ह्यांचे प्रमाण कृपया सांगावे.
ॐ
पाव किलो गाजर असले की पाव किलो दूध घेणे .
अर्धी वाटी साखर घेणे.तूप दोन चमचे घेणे सर्व एकत्र
करून आटविणे दुधाचा चा खवा होतो खवा घालायची
गरज नाही.एक चमचा वेलदोडे पूड घालणे.बदाम काजू
हवे तेवढे घालणे.पूड बदाम काजूची पूड घातली तरी एक सारखे
चांगलं लागते.
धन्यवाद.