ॐ
नवलकोल भाजी : हरबराडाळ पाण्यात सात आठ भिजत ठेवावी.
नवलकोल् साल काढून चिरून घ्यावा.पेटत्या ग्यास वर पातेल्यात
तेल मोहरी ची फोडणी करावी.फोडणी मध्ये प्रथम भिजलेली हरबरा
डाळ टाकावी.नंतर चिरलेले नवलकोल टाकावे.हरबरा डाळ व नवलकोल
शिजण्या करता पाणी भरपूर घालावे.पाणी नवलकोल व हरबरा डाळीचे
पाणी कमी झाल्यावर भाजीत हळद हिंग लाल तिखट मीठ टाकावे.
कडीपत्ता भाजी शिजतांना टाकावा.परत नवलकोल हरबरा डाळ पाणी
मसाला घातलेले परत शिजवावे.थोडे नवलकोल व हरबरा डाळ मध्ये पाणी
ठेवावे नवलकोल व हरबरा डाळ असल्यामुळे ह्यात खोबर तिळ कूट शेंगदाणे कूट
वापरू नाही नये.हरबरा डाळीची चव व नवलकोल चव चांगली लागते.अशा प्रकारे
नवलकोल व हरबरा डाळ याची भाजी करतात.
हरबरा डाळ जास्त भिजत टाकली की राहिलेली हरबरा डाळ हिरवी मिरची मीठ हळद हिंग
एकत्र करून मिस्कर मधून काढून तेलाची वरून फोडणी करून हरबरा डाळीच्या चटणीत टाकावी.
चटणी पण अशी चांगली लागते.
घरोघरी नवलकोल व हरबरा डाळ याची भाजी व भिजलेल्या हरबरा डाळीची चटणी करतात.
लिंबू टाकू नये.वाटल्यास लिंबाचा रस टाकावा प्रत्येक याचात लिंबू टाकू नये मूळ हरबरा डाळी ची
चव चांगली लागते.
घरोघरी भिजलेल्या हरबरा डाळीची चटणी करतात.
नवलकोल भाजी
फेब्रुवारी 9, 2012

