ॐ
घंटा: घंटा मी कांही ब्लॉग पूर्वी मध्ये दाखविली आहे. घंटा पितळी स्टील चांदी मातीची पण शोभे साठी घंटा असते.
घरातील देवातं डाव्या हाताने घंटा व उजव्या हातात आरती असते.घंटा वाजवून आरती करतात. गणपती देवी दत्त महादेव बरेच देवळात घंटा टांगलेली असते.
उजव्या हातील चार बोटांनी देवळात घंटा वाजवितात.
घंटे चा आवाज नाद मधुर असतो. घंटे ला हातातील बोटांचा स्पर्श व घंटा याचा आवाज घुमतो. घंटा ऐकून ब्रह्मांड जवळ गेल्या सारखे सारखं वाटतं.
कोल्हापूर महालक्ष्मी च्या देवळात सकाळी पाचं ५ वाजता काकड आरातीच्यावेळी घंटा वाजवितातं तो आवाज महाद्वार पर्यंत ऐकु जातो. एवढी मोठी घंटा व घंटा चा आवाज असतो. कोणी कोणी हॉल मध्ये टांगून ठेवतात. बाहेर जातांना घंटा वाजवून घंटा याचा आवाज ऐकून बाहेर पडतात.
सतार वाजवितांना तारांचा आवाज ऐकू चांगला येतो. खूप रियाज झाला की ब्रह्मांड पर्यंत माणूस जातो. मी खूप सतार वाजविली आहे.रियाज केला आहे. कोणतही वाध्य याचा आवाज बराचं वेळ घुमतो. घर देऊळ शाळे मध्ये पण तासाला घंटा वाजवितात. तो पण आवाज घुमतो. घंटे चा आवाज, वाध्य याचा आवाज घुमून नाद मधुर होऊन ब्रह्मांड सापडतं. घर देऊळ भरून जात. घरोघरी घंटा असते.



