ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र पूर्वा रास कन्या माघ कृष्णपक्ष संकष्ट चतुर्थी आहे. तसेच दिनांक तारीख १० फेब्रुवारी ( २ )२०१२ संकष्ट चतुर्थी आहे.कांही ठिकाणी शनिवार ११ फेब्रुवारी ( २ ) २०१२ तारीख दिनांक ला पण संकष्ट चतुर्थी आहे.
संकष्ट चतुर्थी आहे मी पेढे याचे मोदक केले आहेत. मैदा व ख्वा साखर याचे मोदक करतात.
मी कणीक मध्ये तेल मीठ घालून दुधात मळवून तिंबून भिजवून घेतली कणीक याचा गोळा केला.
हातानेच पेढे मऊ केले. हातानेच तींबलेला कणीक याचा गोळा घेतला.हातानेच गोल गोल पात पाती केले.
पाती मध्ये मऊ केलेला पेढा भरला मोदकाचा आकार दिला.तुपात कणीक पेढा याचे तयार केलेले मोदक
तळून काढले. मोदक केले की त्या बरोबर करंजी करतात करंजी केली की त्या बरोबर मोदक करतात.
मी एक करंजी केली आहे.
घरोघरी मोदक व करंजी करतात.

