ॐ
हिरवे टमाटो : हिरवे टमाटो ची चिरून हरबरा डाळी चे पीठ लावून भाजी करता.
मी हिरवे टमाटो ची चटणी केली आहे.प्रथम हिरवे टमाटो धुवून घ्यावेत.
जाडसर चिरावे.तेलावर परतून काढावे. तीळ भाजलेले बारीक मिस्कर मधून करून घ्यावेत.
गार झालेले टमाटो तीळ कूटात टाकावे. त्याबरोबर आवडी प्रमाणे हिरवी मिरची मीठ टाकावे.
परत सर्व मिस्कर मध्ये बारीक करावे.काचेच्या सटात काढावे काढावी.परत तेल मोहरी ची फोडणी
करावी.फोडणी गार करून हिरव्या टमाटो चटणी त घालावी.हळद टाकू नये.टमाटो चा हिरवा रंग चांगला
दिसतो.हिरव्या टमाटो त तीळ कूट असल्यामुळे हिरव्या टमाटो ला तिळाची चव चांगली लागते.
घरोघरी हिरवे टमाटो वापरतात.हिरव्या टमाटो ची भाजी चटणी करतात.
हिरवे टमाटो
फेब्रुवारी 13, 2012

