ॐ
आयुष्याचे शंभर वर्ष
आयुष्याचे शंभर वर्ष लाभले
मानवी देहाचे सार्थक झाले आणि केले
आयुष्य बाल पणाचे सुखाचे गेले
सासरी माहेरी अंगणी खेळले
साथीदारा बरोबर सर्व तऱ्हेचे दिवस घालविले रमविले
कधी वस्त्रे होती धड नेसायला तर कधी दांडीची लुगडी पांघरायला
मुले नातवंडे पतवंडे सारी लाभली तिला गुणाची
तिची ही माया त्या लेकरावरती अति प्रेमाची
उंची भरजरी वस्त्रे ही नात सुनांनी घेतली
दर्शनासाठी तिने नेसली आंनदाने आशीर्वाद दिले
जीवन मान अपमान चे सुख दु:खा चे गेले
त्याचे उच्चारण मात्र कधी नाही केले
देह मात्र थकला थकला सोशीकपणा च गुण आपला केला
देवाशी मागे एकच मागणे देह आत्मा सैदेव सुंदर व्हावा
तुझाच आशीर्वादाने
सौ सुनीती रे देशपांडे


Comments on: "आयुष्याचे शंभर वर्ष" (1)
भाव चांगला उमटला
वहिनीचे आयुष्य वेगळेच हे निश्चित
पुण्याई जबरदस्त
पावसाळे उन्हाळे येणारच
त्यातून जीवन घडविणे हीच एक प्रकारची मिळवण
तीच फलश्रुती
तेच सार्थक
हा ठेवा पुढे नेणारा आहे–स्वतःला आणि सर्वांना