ॐ
चाकवत ची भाजी : चाकवत देठा सगट निवडून घ्यावा.चालणीत निवडलेला चाकवत घालून पाण्याने पाण्यानं
धुवून घ्यावा.मिक्सर मध्ये निवडलेला चाकवत थोड पाणी दोन वाटी पाणी घालावे.आंबट दही घालावे.दोन चमचे
हरबरा डाळीचे पीठ घालावे.चाकवत हरबरा डाळीचे पीठ दही पाणी सर्व एकत्र पातळ व बारीक करावे.तेलाची व मोहरीची
फोडणी करावी प्रथम कच्चे शेंगदाने तांबूस करून घ्यावेत मी घातले आहेत पण ते भाजीत दिसत नाही.नंतर चाकवत
सर्व केलेले मिश्रण फोडणी व शेंगदाने ह्यात घालावे.त्यात तिखट मीठ हळद हिंग घालावे.वाटल्यास फोडणीत लसून घालावा.
मी घातला नाही.सर्व चाकवत मिश्रण हलवावे पातेल्याला लागत नाही उकळी एई पर्यंत शिजवावे.चाकवत ताकातील भाजी पोळी
भाकरी बरोबर खाण्यास द्यावी.
घरोघरी चाकवत याची भाजी करतात.
चाकवत ची भाजी
फेब्रुवारी 15, 2012

