आपले स्वागत आहे!

मी वसुधा…

माझे ६८ वर्ष्यांचे आयुष्य मागे झाले तेंव्हाची गोष्ट… शाळा झाली, लग्न, मुले झाली, घर सांभाळले. १० महिन्यांपूर्वी मला कोम्पूटर दिला. मी नको असतानाच मन मारून घेतला. एक आठवड्यात मला कोम्पूटर सुरु कसा करायचा, कीबोर्ड, माउस कसा वापरायचा वगेरे शिकवले. वाटले घरात आणखीन पसारा झाला, उगीचच कोम्पूटर आणून ठेवलाय. हळूहळू मला कोम्पूटरवर फोन करायला शिकवले. मग थोडी मज्या वाटू लागली. जेव्हा पाहिजे तेव्हा फोन वर बोलू व बघूही शकलो. नंतर मला इमेल शिक म्हणाले. परत मी नको म्हंटले. म्हंटले मला कुठे इंग्लिश मध्ये इमेल लिहिता येणार आहे. तरीही मुलांनी माझ्या नावे एक इमेल उघडले. हळूहळू कीबोर्ड वापरायला शिकले. घरातलीच काही इंग्लिश पुस्तके घेऊन त्यातून कोम्पूटरवर इंग्लिश लिहायचा प्रयत्न केला. नंतर मी त्यांना इंग्लिश पुस्तकातली माहिती इमेल करू लागले व त्यांच्या उत्तराची वर बघत असे. उत्तर आल्या वर अगदी छान वाटत असे.

मग मुलं व माझा भाऊ म्हणाला कि मराठीतून लिही. आणखीन धसका वाटला. आताशा कुठे इंग्लिश लिहायला शिकले. आता मराठीतून कशे लिहू? ते सुध्धा इंग्लिश कीबोर्ड वापरून. पण भाऊ व मुलांनी गुगल ट्रान्सलीतरेषण वर मराठी लिहायला शिकवले. आता मी मराठीतून इमेल लिहू लागले. इतकी माहिती गोळा केली व इमेल पाठवली कि मुलं म्हणाली की एक ब्लोग सुरु कर. आता ब्लोग ला इमेल पाठविले की सरळ ती माहिती प्रसिद्ध होते. इतकी छान सोय झाली आहे. ब्लोग लिहिण्याचा, थोडेफार साधेसुधे चार शब्द ब्लॉग वर लिहिण्याचा हा प्रयास

%d bloggers like this: