रांगोळी
संस्कृतमधील रंगवल्ली या शब्दापासून रांगोळी हा शब्द आला आहे.
रांगोळी म्हणजे कला, उत्सव, रंग, पावित्र्य, मांगल्य अशा सर्व भावनांचे
प्रकटीकारण होय. सण असो. एखादं शुभकार्य असो रांगोळीशिवाय त्या
कार्यक्रमाला पूर्णत्व येतच नाहि. दिवाळी तर मुळातच समृध्दिचा आणि
भरभराटीचा सण, यावेळी रांगोळी काढणे म्हणजे लक्ष्मीच्या स्वागताची
तयारी करणेच होय. रांगोळी म्हणजे धरतीचे अलंकरण होय.
हल्ली धरअपुढचं अंगण, अंगणातलं तुळशी वृंदावन, या वृंदावनापुढे
काढलेली बारीक रेखांची सुंदर रांगोळी असे चित्र पाहायला मिळत नसले
तरी फ़्ल्यटच्या दारासमोर छोट्याशा जागेत रांगओळीच्या रेखीव नक्षी
काढलेल्या दिसतात.