आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर, 2010

जुनी पत्रं

ॐ 

आतां आतांशा  संगणक  सुरु  झालं  आहे. त्यामुळे  झटपट माहिती मिळते. पण  जपून  असं  काहीं  ठेवण्यासाराखं राहतं जवळ असं काहीं नसतं. पूर्वी पोष्टमन घरी पत्र आणून देत असतं. ठरावीक वेळ झाली कीं घरच्या माणसारखीं. पोष्टमनची वाट पाहतं असतं मीच काय घरोघरी असं वाट पाहणं असें.

अजूनही माझ्याकडे जूनीं जपून ठेवलेली पत्र आहेतं. माझे   मलाचं छानं  व आच्छर्य वाटतं, अशी पत्रं माझ्याजवळ आहेतं ह्याचं. 

आंबा पोळी

आंबा म्ह्टलं की एकदम एप्रिल मे महिना आठवतो. रत्नागिरी हापूस, देवगड पायरी, छोटे छोटे गोटया आंबा हे सर्व आंबे आठवतात. लहानपणी तर गोट्याच्या आंब्याचा भरपूर रस पोळी त्यावर साजूक तूप आम्ही नेहमी माझ्या आजोळी मामा मामी सर्व भावंड एकत्र जेवतं असतं. मामी भरपूर आंब्याचा रस व तूप वाढतं असें. ईतरही आजोळचे सर्वजण असावयाचे. आतां आतां हापूस पायरी आंबे आणले जातात. पोळी रस तूप पण असतं.

मी आंबा आला की आंब्याची पोळी खूपं वेळा करते. दोन आंबे रस करून ताटात उन्हातं दिवसं भर ठेवले की कडक उन्हात छान आंबा पोळी वाळते. एकदा वाळली की ती ताटाततून लगेचंच सूटी निघते. साखर वगेरे काहीं लागतं नाही. मस्त आंबट गोड छान लागते. ग्यासवर साखर घालून आंबा गोळा पण करतात. पातळ रस ठेवून आंबाचा जांब पण करतात.

हि मी एकदा केलेली आंबा पोळी.

DSCF0736

मासिक भेट

आमच्या लग्नानंतर हे मला दर महिनाला भेट देतं असतं. बटवा व कांही असं दर महिनाभर भेट दिली. पण आठवण म्हणून ही भेट (माताजींचा फोटो) आजही माझ्या जवळ आहे. मी ती जपून ठेवली आहे.

माताजींनां माझा मनापासून नमस्कार

DSCF1244 DSCF1245

खजुराहो

भारतातील त्याचप्रमाणे परादेशातील पर्यतकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे खजुराहो. ही मंदिरं देवांच्या पारंपरिक मूर्तीबरोबरच शृंगारिक शिल्पांसाठीही प्रसिध्द आहेत. बरीच वर्ष ही मंदिरं तेथील जंगलामध्ये दडलेली होती. परंतु १८३८ साली एका ब्रिटिश सेनाधिकाऱ्याला या मंदिरांचा शोध लागला. मंदिरांचं खजुराहो हे नाव तिथं असलेल्या खाजुरांच्या झाडावरुन पडलेलं आहे. या सर्व   मंदिरांची रचना ‘इन्डो-आर्यन’ शैलीत आहे. हे एक संरक्षित प्रार्थनासस्थळ आहे.

दंतेश्र्वरी मंदिर

५२ शक्तिपीठांपैकी ऐक असलेल्या या पवित्र स्थानी देवीचा दात पडला असल्याची भाविकांची श्रष्दा आहे. म्हणूनच या मंदिरास दंतेश्र्वरी मंदिर म्हणतात. दक्षिणेतील चालुक्य वंशाच्या राजानं  १४ व्या शतकात हे मंदिर बांधलं. ही बस्तरच्या राजांची कुलदेवी मानली जाते. शंकिनी व दंकिनी या दोन पवित्र नद्दांच्या संगमाजवळ हे मंदिर असून भारतातील प्राचीन वास्तूपैकी हे एक आहे. बाहेरच्या जगाला या मंदिराची खूपच कमी माहिती असली तरी हे मंदिर व त्याचं आवार गतवैभाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर तंतेवाडा या तालुक्यात असून बसनं सहज जाता येण्यासाराखं   आहे.

आभार…

आई वडील यानीं आरोग्य संब्रुद्दी  दिली. त्याबद्दल आई  वडील यांचे ऋणी आहे. गुरुंनी विद्दा दिली. त्याबद्दल गुरुंची  ऋणी  आहे. मी शाळा शिकले. सतार शिकले. “श्री महालक्ष्मी यंत्र”  पूर्ण  करण्यास   सांगितले त्या गुरुंनां नमस्कार.

काका, काकु, आजीं, बाई व बापु सर्वानीं मला  वळण लावल, शिकविल त्यासर्वांची मी ऋणी आहे. सर्व भावानीं साहाय्य केलं त्याबद्दल मी त्यांची   ऋणी   आहे.

सासरी सर्वानीं मला त्यांच्यात मिसळूनं हसतं मूख ठेवलं त्याबद्दल मी सासरची ऋणी आहे.

हे तर माझे  सर्वस्वी हातभार साहय्य करणारे. मनापासून  ऋणी आहे ह्यांचीं.

मूलं सुनबाई ईतक जीव तोडुन मला सांगतात विचारतात  मला मानं देतातं. माझी  सर्व विचारपूस करतातं. मूल सूनबाई यांची मी ऋणी आहे.  मनापासून…

देशाच नागरीकत्व आहे. देशाची  मी  ऋणी  आहे. परदेशचा विसा असल्यामुळे जगाची मी ऋणी आहे.

हे  सर्व  मला देवाच्या  कृपेने मीळाल आहे. देवाला नमस्कार.

घरासमोरील झाड

हे आमच्या घरासमोरील झाड. कित्येक वर्ष झाली लाऊन.  छान वाढले आहे आता. फुलेहि छान येतात. झाडाला लहानाचे मोठे होताना बघताना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो. अगदी जुन्या आठवणी ताज्या होतात. झाड इतके मोठे झाले की विजेच्या तारांमध्ये  जाऊ नये म्हणून त्याच्या फांद्या बऱ्याच वेळेला कापल्या.

अजूनही टवटवीत असलेले ह्या झाड्याच्या काही फांद्या बाल्कनीतून अगदी हाताशी येतात. उन पावसात उभे असलेले हे झाड आम्हा सर्वाना वर्षानुवर्षे छान सावली व फुलं देत आहे.

जीवन असावे तर असे.

गोंदवले

 ॐ

गोंदवले, छोट खेडे गावं पण महान, मनानं मोठ्ठ गावं आहे. श्रीब्रह्मचैतन्य महाराज गुरुंचं गावं. त्यांचा जन्म माघ शुध्द व्दादशी शके १७६६. पुण्यतीथी मार्गशीर्ष वद्द दशमी १८३५. मार्गशीर्ष महिनात. १० दिवस तेथे उत्सव असतो. आता ही भक्त भावीक जनसमुदाय तेथे येतात. काहीं जण ८/८ दिवस आधीच येतात. राहतात. तेथे नारळाची फ़ूलाचीं दुकान आहेत. जपमाळा त्याचीं पुस्तक फोटो छायाचित्र मिळतात. चहा काहीं खाण्यासाठी खाणावळं आहेत. १२ वाजता आरती झाली कीं जेवढे भावीक भक्त जणं असतील सर्वाणां प्रसाद जेवनं दिले जाते. भक्त भावीक प्रसादांनी दर्शनं छान झालं  म्हणून तृप्त होतात. परत दर्शन घेऊन नमस्कार करतात. आपआपल्या उद्योग, कामाला आपल्या गावीं रवाना होतातं.

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य सदगुरनां. नमस्कार!

गोंदवले येथे गुरूं ब्रह्मचैतन्य महाराजाचं दर्शन घेण्याकरता आम्ही मनातं येईल तेंव्हा जात असतो. एकदा मी व माझी बहीण माझ्या वाढदिवसाला गेलो होतो. मला व माझ्या बहिणीला तेथे दर्शन व प्रसाद मिळाल्या मूळे मला व माझ्या बहिणीला खूपचं मनाला शान्त व समाधान वाटल, त्या वेळेला.

हलव्याचे दागिने

संक्रात सण सूर्यपासून होणारा फ़क्त एक सण आहे. १४ जानेवारी पासून ते पौंष व माघ रथसप्तमी पर्यंत करतात. तीळगुळ हलवा देण्याची रीत आहे.

हलव्याचे दागिने करतात. आपली कला कौशल्य दखवतात. हलवा करतांना खूप काळजी घ्यावी लागते. कोळशाच्या शेगडीवर परातीत तीळावर साखरेचा तीळ हलवून साखरेचा पाक घालावा लागतो. त्यासाठी तासं तासं बसावे लागते. मी लहानपणी व नंतर, लग्ना नंतर पण हलवा केला आहे. त्याच हलव्याचे दागिने माझ्या आत्या सासूबाई आक्का यांनीं हलव्याचे दागिने घरीचं केले होते. हलवा व घरीचं दागिने तयार केल्याचा आनदं असतो. तो आनदं मला व आक्काना त्यावेळा झाला. घरातं पण सर्वाना हलव्याचे दागिने पाहुन खूपचं छान वाटल त्यावेळा.

माझा हलव्याचे दागिने घालून काढलेला फोटो जोडला आहे.

halvyache-dagine

पोर्णीमेंची माहिती

१. चैत्र पोर्णिमा हनुमान चा जन्म असतो. हनुमान जयंती करतात. महावीर जयंती करतात. तसेच कोल्हापूर येथे जवळच ज्येतिबा असल्यामुळे ज्योतिबा उत्सव करतात.

२. वैशाख पोर्णिमा बुध्द पोर्णिमा करतात.

३. ज्येष्ठ पोर्णिमाला वट पोर्णिमा करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात.

४. आषाढ पोर्णिमाला गुरु पोर्णिमा करतात. गुरुंनीं दिलेली विद्दा आठवण ठेवातात.

५. श्रावण पोर्णिमा नारळी पोर्णिमा रक्षाबंधन राखी पोर्णिमा करतात. आपला भाऊ शूरवीर जगप्रसिध्द व्हावा म्हणून बहिण भावाला राखी बांधते. तसेच समुद्र नदी यांची नारळा नीं पूजा करतात.

६. भाद्रपद पोर्णिमा असते. पौष्ठपदी पौर्णिमा असते.

७. आश्र्विन पोर्णिमा कोजागिरी पोर्णिमा करतात. जेठ्ठ मूलाला मुलगा मुलगी कोण असेल त्याला ओवाळतात.

८. कार्तिक पोर्णिमा तुळसीच लग्न करतात. गुरु नानक जयतीं करतात. गणपती भाऊ म्हणून कार्तिक पौर्णिमा करतात.

९. मार्गशीर्ष पौर्णिमा श्रीदत्तं जयतीं करतात.

१०. पौंष पोर्णिमा शाकंभरी पोर्णिमा करतात. माघस्नान करतात.

११. माघ पोर्णिमा माघ स्नान समाप्ति करतात.

१२. फाल्गुन पोर्णिमा होळी पोर्णिमा करतात. पुरण पोळी चा नैवेद्द करतात. होळी मध्ये घालतात.

full-moon3  full-moon2

लिखाण

मी कॉम्पुटर वर लिखाण करता करता भारतातील बरीच माहिती एकत्र केली. सारी माहिती मराठी व संस्कृत भाषेत आहे. माहिती इमेल द्वारे पाठवताना काही छायाचित्र हि जोडता येते. त्यामुळे ज्यांना इमेल पाठविले त्यांना छायाचित्र प्रत्यक्ष दिसतं. छायाचित्र दिसतं असल्यामुळे लिखाण व संस्कृती ची कल्पना एकदम येते. मलाही त्यामुळे लिखाण मनात जास्तच भरल्या सारखं वाटतं.

Tulas

संगणक शिक्षण

फ़ोनचा शोध लागला. घरातं ईतर ठिकाणी सर्व लोक फ़ोन बोलु लागले.

नंतर संगणक चा शोध लागला. सर्वजण पत्र रुपाने लिहुन थोड्या वेळातच सर्व माहिती देण्यास तयार झाले.

आमच्या घरी संगणक आणण्याच ठरलं. मी म्हटलं काहीं नको. वायरचा पसारा ते कोणाला चालू करता येणार? तरी मुलानीं संगणक घरी आणला. ईंटरनेट घेतलं. माझा नावाचं HOTMAIL चालू केलं. मला म्हणाले तुझं (माझं) नाव लिही. मला माझं नाव लिहिता आले. नंतर मी सतार, पुस्तक, तुलस अशी नाव चार पाच अन्तर सोदुन करायला शिकले. नंतर मोठ्ठी “CAPITAL” अक्षर शिकले, ईंग्रजी पुस्तक टाईप केले. नंतर माझे भाऊ फोन वर म्हणाले मराठी शीक. ईंग्रजी आहे. येणार का? तरी पण मी मराठी शिकले. मराठी वाक्य रचना आली. छायाचित्र कशी पाठवावयाची शिकले. नंतर श्र्लोक लिहिले. गणपती स्तोत्र लिहिले. आवड निर्माण झाली. आता मी माझ्या विषयी लिहीत आहे. संगणक चा ऊपयोग करावा तेवढा केला जातो.

मला संगणक आल्या मुळे ज्यांनीं मला संगणक शिकविले त्या सर्वांनां माझ्या कडून धंयवाद धन्यवाद.

यात्रा

माझ्या आयुष्यभरात ठिकठिकाणच्या तीर्थस्थानी देवदर्शन झाले. मी टिटवालाचा गणपती पाहिला. चिंचवडचा गणपती, सांगलीचा गणपती व रत्नागिरी पालीचा गणपतीही पाहिला. पालीच्या गणपतीला बाहेरुन प्रदक्षिणा घालावी लागते ती मी घातली.

शक्तीपिठातील चार देवी दर्शन केले. तुळजापुर कोल्हापूर शप्तश्रुंग (वणी), माहूर (रेणुका देवी) असें चार देवी दर्शन केले.

नरसोबावाडी, गाणगापूरही झाले. गाणगापूरला तर मी नथ घालून पूरणपोळीची भिक्षावळ दिली.

तुळजापूर देवी दर्शन झाले, त्याच यात्रेत आम्ही (हे, मी व मुले) पंढरपूर येथे विठोबाचे दर्शन घेतले.

औदुंबर येथे १४ जानेवारिला कविता संमेलन असते. ह्यांनी तेथे स्वतः ची कविता वाचनं केले. मी पण त्यांच्या बरोबर औदुंबरला गेले होते. त्यामुळे माझे औदुंबर दर्शन झाले.

गाणगापूरला माझा भाऊ, भावजय, भाच्ची, बहीण व मी सर्वजण होतो.

जेजुरीला माझ्या चुलत भावाची मुंज होती. त्यावेळा मी माझे आई वडील, काका काकू ईतर सर्वजण जेजुरीला गेलो होतो. त्यामुळे माझे जेजुरी दर्शन झाले.

हे सर्व माझ्या कडून घडलं. देवाची कृपा. सर्व देवानां माझां नमस्कार.

श्र्लोक

ॐ 
ॐ भूर्भव स्व: ॐ तस्त्यवितुर्वरेण्यं   भर्गोदेवस्य धीमही |
धियो योन:  प्रचोदयात:


एकदंताय   विघ्महे   वक्रतुण्डाय     धीमहि |
तन्नो   दंति:  प्रचोदयात   ||
 
ॐ 
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:|
निर्विग्न्म  कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा: ।।
 
ॐ 
जयाच्या जनि जन्म नामार्थ झाला |
जयाने सदा वास नमात   केला ||
जयाच्या मुखी सर्वदा नामकिर्ति|
नमस्कार त्या ब्रह्म  चैतन्यमूर्ती ||
 

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल  |
 

गुरु ब्रह्मा गुरु विंष्णु गुरुदेवो महेश्र्वरा   |
गुरु साक्षात परब्रह्म  तस्मै श्री गुरवे नम:  ||

श्री गणपतिस्तोत्रं

मी रोज पूजेच्या वेळेला गणपती स्तोत्र म्हणते. पुस्तकात पाहून म्हणत असे. म्हणून म्हणून पाठ झाले आहे. तरिपण पुस्तक जवळ ठेवते. तसेच ईतरही श्र्लोक म्हणते. ते पण मला पाठ आहेत. मोठयाने म्हठंळ की घरभर आवाज घुमतो. घरात छान प्रसन्न वातावरण असतं. तसेच मी बाजारात गेले की फ़ुलवाडीतून फ़ुले आणत असते. गुलाब केवडा ईतर काहीं फ़ुल आणत असते.

॥ श्री गणपतिस्तोत्रं ॥
॥ श्री गणेशाय नाम: ॥
॥ नारद उवाच ॥

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ॥
भत्त्कावासं स्मरेन्नित्यमायु: कामार्थसिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं व्दितियकमं ॥
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ॥
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टममं ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकमं ॥
एकादशं गणपतिं व्दादशं तु गजाननमं ॥४॥

व्दादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ॥
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकरं प्रभो ॥५॥

विविद्दार्थी लभते विद्दां धनार्थी लभते धनम् ॥
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थि लभतेगतिमं ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्र्भिमासै: फलं लभेत् ॥
संवत्सरेण सिध्दि च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राःमनेभयश्र्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य वि द्द। भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:॥ ८ ॥

॥ ईति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपति स्तोत्रं संपुर्णमं ॥

रांगोळी

आम्ही जुन्या घरात रहात होतो. त्यावेळाला बाबा, सासूबाई येत असत. त्या घरात काळी लांब दगडी फारशी होती. सासूबाई मी दोघी रांगोळ्या काळ्या दगडावर रांगोळी काढत असू. अजूनही मला रांगोळी काढण्याची आवड आहे. देवा पुढे, वाढदिवस सहज म्हणून मी रांगोळी काढते.

rangoli1 rangoli2
rangoli3 rangoli4

घरगुती जेवण

घरगुती रोजचे जेवण: रोजच जेवण म्हणजे भाकरी भाजी असं दाखविले आहे. गोड साठी लाडू असं ठेवले आहे. कडीगोळे म्हणजे हरबरा डाळ भिजल्या वर जाडसर वाटून घ्यावी. त्यात आवडीनुसार हळद हिंग तिखट मीठ कोथिंबीर आलं बारीक केलेले सर्व एकत्र करावे. ताकाच्या काडीत हिरवी मिरची हळद हिंग मीठ ताकाला डाळीचं पीठ लावून गिरे तूप याची फोडणी केल्या वर पीठ लावलेले घालावे. कडी उकळल्यावर नंतर त्या कडीमध्ये हरबाडाळीच मिश्रनाच छोटे छोटे गोळे कडीत टाकावे. सोडावे.  परत थोड्यावेळ कडी ऊकळू द्यावी. म्हणजे कडीगोले तयार झाले.

jevan1 jevan2

विणकाम

मी अनेक गोष्टींचे विणकाम केले. लोकरीचे स्वेटर, प्लास्टिकच्या  पिशव्या व शिंकाळे वगैरे. विणकाम करताना वेळ खूपच छान जातो. व एक प्रकारचे समाधान हि मिळते.

ऊंच ठेवलेल्या टांगलेल्या शिंकाळ्या मध्ये मला बेळगाव येथे सतार वाजवली म्हणून कप मिळाला आहे. तो शिंकाळ्यात ठेवला आहे.

अनेक प्रकारची वेगवेगळ्या रंगाची शिंकाळे व पिशव्या विणल्या. त्यातील दोन गोष्टींचे फोटो. आपल्याला कशे वाटले जरूर कळवा… 

veenkam1 veenkam2

H. S. C. (S. S. C.)

मी जालनातं सातवितं शिकतं होते. भाऊ वाहिनी राजुचि आई याच्यां रहातं होते. तेव्हां सातवी परीक्षा पास झाले. ४५ टक्के मार्क मीळाले. मला भाऊ व सर्वाना खूप आनदं वाटला. त्याचं वेळेला मी हिन्दीची बोर्डाची दुसरी  परीक्षा  दिली. त्या पण मी दुसरा (दुसऱ्या) श्रेणीत पास झाले. पण मी मुंबईत H. S. C. (S. S. C.) ला विलेपार्ले  (प्रार्थना समाज   हायस्कुल) मी परीक्षा ४५ टक्के ने पास झाले. त्यावेळा मी गणित विषय घेतला. तरी पाहिदां  पहिल्या  झटकेतं   पास  झाले. FROM परीक्षा गणित घेऊन पण पास झाले. गणित याचा पेपर मार्काचा सरांनि विद्दार्थी यानां दिले. १५ – २० जणचं मूल, मूली होते. मी पास झाले. मला खूप हलक वाटल. थोडया वेळान सरानिं माझा पेपर मला मागितला मला वाटलं मार्क कमी होणार सरानिं पेपर पेपर परत तपासला. व गणिताला  रितला  २ दोन  मार्क   दिले. नतंर मार्क २ दोन वाढवून मीळाले टोटल २ दोन मार्कने जास्त झाली. मार्च मध्ये बोर्डातं पण ४५ टक्के मार्क मिळाले. महाराष्ट्र  टाइम्स   मध्ये माझा नंबर आला. मी औरंगाबाद ला मी होते तेथे मला  कमलताईची तार आली – पुष्पा S. S. C. पास झाली आहे. मला खूपं आनंद  हलकं वाटलं

मतदान

आम्ही चेंबुरला बाळ सर्वजण राहत होतो. मी आकाश लहान सर्वजण असतं. तेथे माझ पण नावं रेशन कार्डा नावं असें. त्यावेळा उघड्या गाडीतूण उभे राहून मत द्द्या प्रचार करायचे. उमेदवार. मी पण सर्वजण मत करायचो . नंतर माझं नावं पुणे येथे कार्डा वर आलं. पुण्यात थोडे दिवसं असल्यामुळे मतदान केले नाहीं. कोल्हापूर येथे शाहुपिरीतं मतदान केलें. तेथे ७/८ वर्ष असल्यामुळे भरपूर वेळा मतदान असेल तेव्हां मतदान केले. हे विद्दापिठ तर्फ़्हे मतदान केंद्रा वर काम करत असतं. सकाळी ४ वाजतां केंद्रावर जातं असतं त्यावेळा वाहनं नवहत. सकाळी बसं पण नसायची चालतं जातं. घरातूण साडेतीन पावणेचार निघायचे. मी घरी एकटी असायची. पुष्कर प्रवण नंतर झालें. नंतर शाहुमिल जवळ राहत असू तेथे हे केंद्रावर कामाला जात नसतं. दुर्गा सोसायटी त आल्यावर मतदान करु लागलों.

मतदानाचं केंद्र सापडलचं नाहीं मी ह्यांनां विचाररल तर ते म्हणाले hola च्या मागे शाळेतं आहे . मी परतं मतदान करण्या करतां शाळेतं गेलें व मतदान केलें मतदान करुणं आले. आजं कोल्हापूर कल्याण डोंबवली येथे मतदान आहें. आजं तरं माज्ह्या कडे केंद्र नावं माझ नावं आहे. उमेदवार यांनीं घरी आणूण दिले आहेतं मी मतदान करणार आहे.

 

मी मतदान करून आल्याची बोटावर खुणेचा फोटो:

voting

वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रणव… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझा वाढदिवस व नवीन वर्ष सुख, समाधान व समृद्धीचे जावे हीच ईश्वर चरणी मनःपूर्वक प्रार्थना

कॅमेरा

कॅमेरा शोधामुळे जगभर सर्व छायाचित्र फोटो काढायाला मिळतात लहान मोठे व्यक्ति कॅमेरा जवळ बाळगतात. ठेवतात. माझ्याकडे पण कॅमेरा आहे. त्यामुळे मी केलेले पदार्थ अनारसे साटोरी   कारंजी पानावरच्या रांगोळ्या ईतर साहित्य छायाचित्रात फोटोत ठेवल्यामुळे आज मला माझं कलाकौशल्य दाखविता येते.
 
सोनेरी क्षणांच्या आठवणींसाठी कॅमेरा घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल  –

  • – कॅमेरा कोणत्या कारणासाठी घेणार आहात हे आधी निश्र्चित करा.
    – ज्याची कार्यं हातालण्यास सोपी आहेत असाच कॅमेरा घ्यावा. जास्तकिचकट कर्याचा  कॅमेरा घेऊ नये.
    – बहुधा कॅमेरा त्या कंपनीच्या अधिकृत दुकानातूनच घ्यावा.  यात फसगत होण्याची शक्यता नसते. शिवायकॅमेर-यात काही बिघाड झाल्यास तो त्या कंपानितच दुरुस्त करून मिळतो.
काचेवर मेंदीने कोरले काढलेले आहे. काचेवर गंधाने कोरले काढलेले आहे.
glass1 glass2

देवदर्शन

“देवदर्शन”
गड चढू ग जेजूरी
आत्मा नांदतो तिथे मल्हारी
नऊ लाख दगड ग पायरीला
बेल भंडारा वाहू चला “१”

दूरुनि पाहिला ग कळस
भक्ता मनीं झालासे उल्हास
येळकोट, येळकोट नामघोष केला
बेल भंडारा वाहू चला “२”

गुळ खोबर ग नैवेद्दाला म्हाळसा बसे शेजारी
भक्त येतील दर्शनाला
बेल भंडारा वाहू चला “३”
– राधाबाई वहिनी

 

 

 

Vahini  

शेवया

माहेरी आम्ही  सर्वजण मिळून शेवया फेणी करतं असू.

मला शेवया फेणी येत असल्यामुळे मी आता घरी पण एकटी   शेवया फेणी  करते.

 
                                  फेणी
shevaya1

Shevaya2

पानावरच्या रांगोळ्या

विडाच्या पानांवर काढलेल्या रांगोळ्या. विडाचं पान आपण पूजे करता वापरतो. देवा पुढे ठेवण्याकरता वापरतो. विडाच पानं खाण्याकरता वापरतो. मी विडाच पानं रांगोळी असं छान उपयोग केला आहे. विडाच्या पानावर मी सरस्वती, स्वस्तिक, स्वस्तिकच्या खाली रांगोळीचचं स्वस्तिक काढून त्यावर विडाच्या पानावर स्वस्तिक काढून तेच पानं स्वस्तिकवर ठेवले आहे. ईतरही रांगोळ्या विडाच्या पानावर आहेत.

वडाच्या झाडाची पूजा करतात. मी वडाच्या पानावर वडाच्या फांद्या दिसतात असं फांद्या काढल्या आहेत. वडाच्याचं पानावर काढल्या आहेत.

विडाच्या पानावर रांगोळ्या:

DSCF0329 DSCF03317

DSCF12107 DSCF12097

वडाच्या पानावर रांगोळी:

DSCF08196

पिसावर

पिसावर  म्हणजे  कन्नड  तालुक्यातलं गावं. माझ्या आईचं आजोळ. मामा मामी  त्यांची नातवंड. माझे पणं  मामा मामी लागतं असतं. आईच्या मामी न माझं  माझ्या लहान पणी  माझं नाकं  टोचलं. मी चमकी   किंवा नथ  घातली  की  मला आईच्या मामीची आठवणं येते. आईच्या मामा मामीचा मोठ्ठा वाडा होता.  वाड्यात डाळींबाच झाडं  असे.  इतरही झाडं होती. जुनी पण मोट्टी घर  वाडा.  एका खोलीत धान्याचां  कोठार असे.  धान्यं  ठेवण्या करता मातीचे मातीतंच  रोवलेले रांजन (कणग्या) भरपूर  असतं. त्या  सर्वांना  रांजनवाडी   म्हणतं असे. आताही  कांही ठिकाणी  रांजनवाडी  आहेत. नागापूर माझं  माहेरं  तेथे  पण असचं  असे.
माझी आजी सर्व बघतं असे. नागापूर  येथे आंबा  गहू  होतं  असे  त्यामुळे  घरातचं शेती होती. माझी आजी बैलाची पूजा करतं असतं. आता मी मातीचे बैल  मिळतात त्याची  बैलाची पूजा करते.

pisavar

दिवाळी फराळ

दिवाळी फराळ मी  माहेरी  असतानां  सर्वजण   एकत्र   राहतं त्यामुळे   मजा सहज हात लावण्या करतां फराळाचं  करतं असे. सासरी  एकत्रचं राहतं  असल्यामुळे   तसच  सर्वाच्यां बरोबर फराळाचं करतं असें. मात्र कोल्हापूरला   आल्यापासून  मी चं  जिम्येदारिन   सर्व एकटी न फराळाचं करायला शिकले. हयाचां  ऑफिस मध्ये  व मुलाच्यां  मित्रानां शेजारी सर्व फराळाचं देतं  असे  सर्वानां दिवाळी  फराळ  आवडीने देतं असे. सर्वजण  छान  फराळ  झाला असं सांगत म्हणतं  असें. मला खूपं  चागलं वाटतं  असे .  मी सर्व फराळाचं केल्याचंसमाधान व उच्चांहं  येत  असे.  वाटतं असे .

                                                        मी केलेले साटोरी चे फोटो 

faral

करंजी

दिवाळी शुभेच्छा!

मी केलेली करंजीचे फोटो.

Karanji

महालक्ष्मी यंत्र||  महालक्ष्मी  यंत्र  ||


महालक्ष्मी यंत्र कोल्हापूरच्या देवीच्या देवळात काळ्या दगडावर कोरलेले आहे.

त्याची प्रतिकृती पुस्तकातून पाहून मी काढली आहे.

DSCF0768

mahalaxmi_yantra

दिवाळी शुभेच्छा‏

 AkashDiva

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

दिवाळी व नववर्ष सर्वांना मंगलदायक जावो

 

फराळ

 

रांगोळी

                                              मी केलेले अनारसे चे फोटो 
 
faral2

अथर्वशीर्ष‏


ॐ भद्रं  कर्णे भी:   शृ  णुयाम     देवा भर्दं
पश्येमाक्षभिर्यजत्रा:  ।
स्थिरै रंगै स्तुष्टुवांस्तनु भि   र्व्य शे म     देवहितं
यदायु:  ॥
ॐ   स्वस्ति  न इन्दो  वृ ध्दश्र वा:  स्वस्ति   न:  पूषा
विश्र्ववेदा:  ।
स्वस्ति   नस्ता  र्क्ष्यो  s   अरिष्टनेमि:  स्वस्ति  नो
बृहस्पतिर्दधातु   ॥
ॐ   शान्ति:   शान्ति:   शान्ति:     ॥
अथ श्रीगणे शाथर्व शी र्ष व्याख्यास्याम: ।।
ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ।।
त्वमेव केवलं कर्ता s सि ।।
त्वमेव केवलं धर्ता s सि ।।
त्वमेव केवलं हर्ता s सि ।।
त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि ।।
त्वं साक्षादात्मा s सि नित्यमं ।।१।।
ऋतं   वच्मि  ।   सत्यं   वच्मि ॥ २ ॥
अव त्वं   मा म् ।  अव  वक्तार म्  ।
अव शरोतार म्  ।  अव दातार म्   ।
अव धातार म् ।    अवानूचानमव   शिष्य म् ।
अव पश्चात्ता त् ।  अव पुरस्ता त्  ।
अवोत्तरात्ता त्  ।  अव दक्षिणात्ता त्  ।
अव चोर्ध्वा त्ता त् ।  अवाधरात्ता त्
सर्वतो  मां   पाहि पाहि   समंता त्   ॥ ३ ॥
त्वं वाड्. मयस्त्वं चिन्मय: ॥
त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय: ॥
त्वं सच्चि दानंदाव्दितियो s सि ॥
त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि ॥
त्वं ज्ञानमयो ज्ञानमयो s सि ॥ ४ ॥
सर्व  जगदिदं  त्वत्तो  जायते  ॥
सर्व  जगदिदं   तत्त्वस्तिष्ठति ॥
सर्व   जगदिदं   त्वयि   लयमेष्यति  ॥
सर्व   जगदिदं   त्वयि   प्रत्येति  ॥
त्वं  भूमिरापो s  निलो   नभ:  ॥
त्वं चत्वारि वाकपदानि  ॥ ५ ॥
त्वं  गुणत्रयातीत:  ॥
त्वं  अवस्थात्रायातीत:  ॥
त्वं   देहत्रयातीत:  ||  त्वं   कालत्रयातीत:  ॥
त्वं   मूलाधारस्थतोsसि  नित्यं   ॥
त्वं   शत्कित्रयात्मक:  ॥
त्वं  योगिनो  ध्यायंति  नित्यं   ॥
त्वं  ब्रह्मा  त्वं   विष्णुस्त्वं
रुद्रस्त्वं   इ द्रस्त्वं  अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं  चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव: स्वरोमं  ॥ ६ ॥
गणादिं   पूर्वमुच्चार्य   वर्णादिं   तदनंतर म्    ॥
अनुस्वार:  परतर:  ॥
अर्धैन्दुलसितं  ॥   तारेण   ऋध्द म्   ॥
एतत्तव  मनुस्वरूप म्   ॥   गकार: पूर्वरूप  म्   ॥
अकारो  मध्यमरूप  म्   ॥
अनुस्वारश्र्चां त्यरुप म्   ॥
बिम्दुरुत्तररुप  म्  ॥   नाद:  संधान म्   ॥
संहिता   संधि: ।   सै षा  गणेशवि   द्या ॥
गणक  ऋ षी:  ॥   नि  चट्  द् गाय  त्री  छंद:  ॥
गणपतिर्देवता   ॥
ॐ   ग गणपतेय  नम:  ॥ ७ ॥


गणपत्यथर्वशीर्ष
एकदन्ताय   विद्महे   वक्रतुण्डाय   धीमहि  ।
तन्नो   दन्ति:   प्रचोदया त्  ॥ ८ ॥


एकदन्तं   चतुर्हस्तं   पाशमंकुशधारि ण  म्   ॥
रदं   च   वरदं   हस्तै   र्बि  भ्रा  णं   मु ष  कध्वज  म्  ॥
रत्त्कं   लंबोदरं   शूर्पकर्णकं    रत्त्कवासस म्   ॥
रत्त्कगंधानुलि प्तांगं   रत्त्कपुष्पै: सुपूजित म्   ॥
भक्ता      नुकंपिनं  देवं   जगत्कारणमच्युत   म्   ॥
आविर्भूतं   च स्ट  ष्टया दौ   प्रकृते:  पुरषात्पर  म्   ॥
एवं   ध्यायति   यो   नित्यं   स   योगी   योगिनां   वर:   ॥९  ॥   

नमो   व्रातपतये   नमो   ग  ण  पतये   नम:
प्रथमपतये    नमस्ते   अस्तु   लंबोदरायै कदं ताय
विघ्ननासिने   शिवसुताय
वरदमूर्तये   नम:  ॥ १० ॥


एतदथर्व  शी र्ष   यो  s  धीते  ॥
स ब्रह्मभूयाय   कल्पते   ॥
स सव्रवुघ्नैर्न    बाध्यते  ॥
स सर्वत:  सुखमेधते   ॥
स  पंचम        हापापात्प्रमुच्यते     ॥
सायमधीयानो   दिवसकृतं   पापं नाशयति   ॥
सायं   प्रात:  प्रयुंजानो s अपापो   भवति ॥
सर्वत्राधियानो s  पविघ्नो  भवति ॥
धर्मार्थकाममोक्षं  च विंदति ॥
एदमथार्वशी     र्षमशी    ष्याय  न   देयं  ॥
यो यदि  मोहाधास्यति    dhya
स  पापीया न्
स पापीया न्  भवति  ॥
सहस्त्रावर्तना  त्  ॥
यं यं काममधीते
तं   तमनेन   साधये  त्   ॥ ११ ॥


अनेन   गणपतीम भि षिं  च ति  ॥
स वाग्मी   भवति  ॥
चतु र्थ्यामनश्रनजपति   स वि द्द।वा न्  भवति
इ त्यथर्व ण वाक्य म्  ॥
ब्रह्माद्द।वर   णं  विद्द। त्  ॥
ण बिभेति   कदाचनेति   ॥ १२ ॥


यो  दूर्वांकु रै र्यजति   ॥
स वै श्रव णोपमो   भवति   ॥
यो लाजैर्यजति   स      यशोवा न्  भवति   ॥
यो मेघावा  न्   भवति   ॥
यो मोदक   सहस्त्रे ण  यजति   स
वां छितफलमवाप्नोति   ॥
य:  साज्यसमिध्दिर्यजति   स   सर्व   लभते   स
सर्व   लभते   ॥ १३ ॥


अष्टो   ब्राह्म  णा न्  सम मया ग्र्गा  हयित्वा
सूर्यवर्चस्वी   भवति   ॥
सूर्यग्रहे   महान द्यां   प्रतिमासं   निधौ   वा   जप्त्वा
सधद मंत्रो   भवति   ॥
महाविघ्ना  त्प्र       त्मुच्यते   ॥
महादोषा  त्प्र मुच्यते    ॥
महापापात्प्रमुच्यते   ॥
स  सर्ववि ध्दवति   ससर्वविध्दवति
य   एवं    वेद   ॥ १४ ॥    इत्युपनिष   त्  ॥


ॐ सहनाववतु   ॥    सहनौ   भुनत्कु    ॥
स ह वी  र्य    करवाव   है   ॥
तेजस्वि  ना व धी  त म स्तु   मा    विव्दि  षाव है   ॥


ॐ भद्रं  कर्णे भी:   शृ  णुयाम     देवा भर्दं
पश्येमाक्षभिर्यजत्रा:  ।
स्थिरै रंगै स्तु ष्टु वां स्तनु भि   र्व्य शे म     देवहितं
यदायु:  ॥
ॐ   स्वस्ति  न इन्दो  वृ ध्दश्र वा:  स्वस्ति   न:  पूषा
विश्र्ववेदा:  ।
स्वस्ति   नस्ता  र्क्ष्यो  s   अरिष्टनेमि:  स्वस्ति  नो
बृहस्पतिर्दधातु   ॥
ॐ   शान्ति:   शान्ति:   शान्ति:     ॥

ॐ इति   सार्थ   श्रीग णप त्य थ र्व शी  र्ष   समाप्त  म्  ॥

किल्ला


महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किल्यांना फ़ार मोठे महत्व आहे. किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा प्रेरणादायी इतिहास आजही सांगितला जातो. ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याचा प्रयय्न दिवाळीमध्ये शहरातलया छोट्या-मोठ्या गल्लीतून मातीचे किल्ले करण्याच्या तयारीला लागले आहेत. विविध ठिकाणी या आकर्षक किल्ला बनविण्यासाठीह स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील अनेक किल्ले आजही आपल्याला प्रेरणा देतात. असे विविध किल्ले बनविण्यासाठी लाल माती, दगड याची जमवाजमवी करुं लागले आहेत. माती चाळून त्याचा चिखल बनवितात आणि नंतर रचून त्यावर चिखल लिपून किल्ला तयार झाल्यावर त्या किल्ल्याच्या बाजूने मावळे , मध्ये छ शिवाजी महाराज यांचे  छोटे सुबक आकर्षक पुतळे ठेवून किल्ला आकर्षक करण्यासाठी हे सुबक आकर्षक व रेखीव होईल हे ते पाहात आहेत.

माझा ब्लोग

नमस्कार…

मी इन्टरनेट वर माझा ब्लोग सुरु केला आहे. आपण जरूर तिथे जावे हि इच्छा. माझा ब्लोग खालील लिंक वरून बघता येईल. आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.

https://vasudhalaya.wordpress.com

 

वसुधा

आमची वास्तु


२ दोन नोव्हेंबरला आमचीं सोसायटीची वास्तु कारायची ठरली. वास्तुं झालीं
त्यावेळा इंदिरा गांधी पंतप्रधान याचीं बातमीं आली पसरली. सगळ गावं बंद.
तरी पण सोसायटी सर्वजण लोक आले. सोसायटीतं राहण्यास (आम्हीं) व
शेजारचे होतो. गुरुजिनां वाटलं राहण्यास कोणीं नासणार. घरुन नैवेद्द आणलां होता .
हे म्हाणाले घरातं काहीं आहे का करण्यासारखं तर मी पुरण पोळी बटाटाची भाजी शेवया खीर
वरण भातं सर्व निट सैंपाक केला. पूजा झालीं आरती च्या वेळेला अचानक
बाबा अक्का आलें. त्यानां पण सर्व पाहून चांगल वाटलं.
मी एवढं सगळं एकटीनं केलं. त्यांनी बाबा नीं मला बांगड्या दिल्या .
आम्हीं कोणाला न सांगतां नात्यात तरी सर्व घडलं मनाची ठेवणं कोठे जाते हे कळत.

पणती

दिवाळीत आपल्या घरासमोर तेवत असलेल्या पणत्या केवळ शोभेसाठी नसतात, प्रत्येक पणतीमागे एक वलय असतं दुसऱ्या बद्दलची कणव निर्माण करणारी पणती अज्ञानाचा अंधकार दूर करणारी पणती, विपुलतेबद्दल दैवाची कृतज्ञता व्यक्त करणारी पणती, अशा विविध पणत्यांचा त्यात समावेश असतो. ज्ञानाच्या प्रकाशानं अज्ञानाचा अंधकार दूर सारला जातो तेव्हाच आपल्या प्रत्येकामध्ये चांगुलपणाही संचारत असतो…

%d bloggers like this: