आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 18, 2010

यात्रा

माझ्या आयुष्यभरात ठिकठिकाणच्या तीर्थस्थानी देवदर्शन झाले. मी टिटवालाचा गणपती पाहिला. चिंचवडचा गणपती, सांगलीचा गणपती व रत्नागिरी पालीचा गणपतीही पाहिला. पालीच्या गणपतीला बाहेरुन प्रदक्षिणा घालावी लागते ती मी घातली.

शक्तीपिठातील चार देवी दर्शन केले. तुळजापुर कोल्हापूर शप्तश्रुंग (वणी), माहूर (रेणुका देवी) असें चार देवी दर्शन केले.

नरसोबावाडी, गाणगापूरही झाले. गाणगापूरला तर मी नथ घालून पूरणपोळीची भिक्षावळ दिली.

तुळजापूर देवी दर्शन झाले, त्याच यात्रेत आम्ही (हे, मी व मुले) पंढरपूर येथे विठोबाचे दर्शन घेतले.

औदुंबर येथे १४ जानेवारिला कविता संमेलन असते. ह्यांनी तेथे स्वतः ची कविता वाचनं केले. मी पण त्यांच्या बरोबर औदुंबरला गेले होते. त्यामुळे माझे औदुंबर दर्शन झाले.

गाणगापूरला माझा भाऊ, भावजय, भाच्ची, बहीण व मी सर्वजण होतो.

जेजुरीला माझ्या चुलत भावाची मुंज होती. त्यावेळा मी माझे आई वडील, काका काकू ईतर सर्वजण जेजुरीला गेलो होतो. त्यामुळे माझे जेजुरी दर्शन झाले.

हे सर्व माझ्या कडून घडलं. देवाची कृपा. सर्व देवानां माझां नमस्कार.

%d bloggers like this: