आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 19, 2010

संगणक शिक्षण

फ़ोनचा शोध लागला. घरातं ईतर ठिकाणी सर्व लोक फ़ोन बोलु लागले.

नंतर संगणक चा शोध लागला. सर्वजण पत्र रुपाने लिहुन थोड्या वेळातच सर्व माहिती देण्यास तयार झाले.

आमच्या घरी संगणक आणण्याच ठरलं. मी म्हटलं काहीं नको. वायरचा पसारा ते कोणाला चालू करता येणार? तरी मुलानीं संगणक घरी आणला. ईंटरनेट घेतलं. माझा नावाचं HOTMAIL चालू केलं. मला म्हणाले तुझं (माझं) नाव लिही. मला माझं नाव लिहिता आले. नंतर मी सतार, पुस्तक, तुलस अशी नाव चार पाच अन्तर सोदुन करायला शिकले. नंतर मोठ्ठी “CAPITAL” अक्षर शिकले, ईंग्रजी पुस्तक टाईप केले. नंतर माझे भाऊ फोन वर म्हणाले मराठी शीक. ईंग्रजी आहे. येणार का? तरी पण मी मराठी शिकले. मराठी वाक्य रचना आली. छायाचित्र कशी पाठवावयाची शिकले. नंतर श्र्लोक लिहिले. गणपती स्तोत्र लिहिले. आवड निर्माण झाली. आता मी माझ्या विषयी लिहीत आहे. संगणक चा ऊपयोग करावा तेवढा केला जातो.

मला संगणक आल्या मुळे ज्यांनीं मला संगणक शिकविले त्या सर्वांनां माझ्या कडून धंयवाद धन्यवाद.

%d bloggers like this: