आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 22, 2010

हलव्याचे दागिने

संक्रात सण सूर्यपासून होणारा फ़क्त एक सण आहे. १४ जानेवारी पासून ते पौंष व माघ रथसप्तमी पर्यंत करतात. तीळगुळ हलवा देण्याची रीत आहे.

हलव्याचे दागिने करतात. आपली कला कौशल्य दखवतात. हलवा करतांना खूप काळजी घ्यावी लागते. कोळशाच्या शेगडीवर परातीत तीळावर साखरेचा तीळ हलवून साखरेचा पाक घालावा लागतो. त्यासाठी तासं तासं बसावे लागते. मी लहानपणी व नंतर, लग्ना नंतर पण हलवा केला आहे. त्याच हलव्याचे दागिने माझ्या आत्या सासूबाई आक्का यांनीं हलव्याचे दागिने घरीचं केले होते. हलवा व घरीचं दागिने तयार केल्याचा आनदं असतो. तो आनदं मला व आक्काना त्यावेळा झाला. घरातं पण सर्वाना हलव्याचे दागिने पाहुन खूपचं छान वाटल त्यावेळा.

माझा हलव्याचे दागिने घालून काढलेला फोटो जोडला आहे.

halvyache-dagine

%d bloggers like this: