आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 24, 2010

घरासमोरील झाड

हे आमच्या घरासमोरील झाड. कित्येक वर्ष झाली लाऊन.  छान वाढले आहे आता. फुलेहि छान येतात. झाडाला लहानाचे मोठे होताना बघताना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो. अगदी जुन्या आठवणी ताज्या होतात. झाड इतके मोठे झाले की विजेच्या तारांमध्ये  जाऊ नये म्हणून त्याच्या फांद्या बऱ्याच वेळेला कापल्या.

अजूनही टवटवीत असलेले ह्या झाड्याच्या काही फांद्या बाल्कनीतून अगदी हाताशी येतात. उन पावसात उभे असलेले हे झाड आम्हा सर्वाना वर्षानुवर्षे छान सावली व फुलं देत आहे.

जीवन असावे तर असे.

%d bloggers like this: