आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर, 2010

चालणे

चालणे : मी लहानपणी शाळेत जाणं येणं चालतच करतं असे. नातेवाईक यांच्या बरोबर फिरतानां चालतच जात असे. त्यावेळेला नातेवाईक यांच्याकडे जातानां पण आम्ही सर्वजण चालतं जातं असू. माझी चुलत बहिण शैलजा व काकू, आई (वहिनी) दींडी बरोबर वारीने पंढरपूर येथे १५/२० दिवस चालतं पंढरपूर येथे चालतं गेलेल्या आहेतं.

मी मात्र एवढी चालले नाही. बसस्थानका पर्यंत चालत जाते. मी बैलगाडीने नागापूर कन्नड चिखलठाणा पिसावर येथे बैलगाडी प्रवास केला आहे.

एस.टी. ने प्रवास केला आहे. आगगाडी ने प्रवास केला आहे. विमान याने प्रवास केला आहे.

माझे तसें प्रवास चांगले झाले आहेत. गोवा येथे पणजी ते वास्को येथे बोटी ने प्रवास केला आहे. मला जिवनातं एवढा प्रवास केल्याचा मस्त वाटतं आहे.

रिक्षातं व टांगा ह्यात पण मी बसून प्रवास केला आहे.

मटार करंजी

मटार : मटार आता हिवाळ्यात भरपूर बाजारात येतो. हिरवागार ताजा मिळतं असल्यामुळे भरपूर खाल्ला जातो. गोड असल्यामुळे नुसता पण तोंडात टाकून पण खाल्ला जातो. भाजीत पण टाकतातं. पोहे व ऊपमा ह्यातही मटारचा वापर करतातं. मटार च्या करंज्या सामोसे पण करतातं. मी घरी केलेले सामेसे करंजी नमुना करतां दाखवत आहे. प्रथम मटार सोलून त्याचे मटार काढुन जाडसर वाटून घ्यावे. एक बटाटा ऊकडून घेऊन बारिक करावा. हिरवी मिरची बारीक करुन घ्यावी. थोडी कोथींबीर बारीक करुन घ्यावी. आलं पण बारीक करावं. सर्व तयार केलेले मटार मिरची चवी  प्रमाणे व मीठ पण चवी प्रमाणे टाकून घालून कोथींबीर मटार बटाटा एकत्र करावे. सारणं तयार करावे.

थोडी कणिक व थोडा मैदा एकत्र करुन त्यात तेल मीठ घालून गोळा एकत्र करावा. त्याच्या लाट्या करुन त्यात सारण तयार केलेले भरुण करंजी सामोसे मोदक असा आकार देऊन तुपातं किंवा तेलातं तलावे. पुदिनाची चटणी खोबर घालून तयार करुन त्या बरोबर सामोसे खावेतं. गोड व चवीष्ट लागतातं सर्वजण आवडीने भरपूर खातातं.

मटार बटाटा  मटार करंजी

मटार बटाटा                                         मोदक सामोसा

कुंभार

कुंभार : आमच्या भागातं माठ कुंड्या सुरई संक्रात मध्ये सुगडी छोटे आकाराचे माठ मिळतात. लाल माती पासून किंवा काळ्या मातीपासून तयार केलेले मिळतातं. छोट्या आकाराचे दिवा लावण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे दिवे मिळतात. मातीला गोलं ऊभे आकार देऊन तयार केलेले दिवे मिळतातं. दिवाळी साठी पणत्या निरनिराळ्या आकार असलेल्या व रंगीत पण पणत्या मिळतातं मी नेहमी कुंड्या सुगडी पणत्या आणतं असते. आमच्या घरी कुंडीत माती घालून झाड लावलेली आहेतं. छोटे माठ पण आहेत.

दिवाणखाना मध्ये झाड ठेवली आहेत.

शोभेचं झाड                                                     जास्वंद

शोभेचं झाड  जास्वंद

माठ

माठ

डिसेंबर २०१०

डिसेंबर २०१० महिना चालू आहे. सगळी कडे छान थंडी पडली आहे. छोट्या छोट्या शेकोट्या पेटविण्यात येतातं शेकोट्याची काळजी घेण्यास सांगतात. तसेचं सगळीकडे बर्फ पडत आहे. थंडीचं वातावरण आहे. सगळे लोक थंडीचा ऊपभोग घेऊन गरम स्वेटर्स घोंगडी रग याचा पण ऊपयोग करून घेतं आहेत. परदेशात हीटर लावण्याची सोय आहे. माझा ब्लॉग ‘वसुधालय’  मध्ये पण बर्फवृष्टी पडत आहे. बारीक बारीक बर्फ पडत असल्या सारखे आपणासं पाहण्यास दिसेल.

आपण जरुर ‘वसुधालय’ बघावे.

लोकरीचा गुंडाटेबल क्लॉथ

लोकरीचा गुंडा                                           टेबल क्लॉथ

‘ग्रामोद्द्योग’

आमच्या भागातं बांबू पासून विणकाम करतातं. त्यांच्या जवळील साहित्य हातार्य निट वापरुण बांबूचे भाग करतातं व नंतर पातळ भाग करुण त्यापासून विणकाम करतातं.  टोपल्या. भाजी ठेवण्या करता छोट्या परडई फूल भाकरी पोळी पण ठेवण्या करतां तयार करतातं. तसेचं सूप दिवे टांगण्या करतां छांन टोपली पण करतातं. मी नेहमी त्यांच्या कडून वस्तू आणतं असते. सूप व टोपली टांगालेली  आहे, आमच्या घरात.

ते लोक पण दिवाळी चांगली करतात. रांगोळी किल्ला दिवा पण लावतात.

सूप  टोपली

सूप                                                     टोपली

कोलंबो !

कोलंबो : कोलंबो ही श्रीलंकाची राजधानी ! दोन हजार वर्षापूर्वी गौतम बुध्दानं श्रीलंकेत बौध्द धर्माचा प्रसार केला. आज या देशातील सर्वाधिक लोक बौध्द धर्मीय आहेत, दोन हजार वर्षापूर्वी जिथं  गौतम बुध्दानं  बौध्द धर्माची दीक्षा दिली त्या ठिकाणी आज राजा  महाविहारा हे मंदिर बांधण्यात आलं आहे. अतिशय विस्तृत अशा या मंदिरात पहुडलेल्या बुध्दाची भव्य मूर्ती पाहायला मीळते. कुठे फसवेगिरी नाही. लबाडी नाही. देण्या-घेण्याचा योग्य व्यवहार  ठरवून आपण रिक्षानं कुठेही फिरु शकतो.

टेंपल ऑफ़ टूथ

टेंपल ऑफ़ टूथ

नाताळ !

नाताळ : सर्वत्र आता ख्रिसमसमय वातावरण झाले आहे. ख्र्सिसमसच्या पाश्र्वभूमीवर शहरातील विविध चर्चेस आणि खिस्ती वसाहतीमध्ये तयारीची लगबग सुरु आहे. आकर्षक असे खिसामासा ट्री बाजारात उपलब्ध आहेत. बेल ,झुंबर गिटार santa claus चे मुखवटे, ग्रीटिंग कार्ड, स्टीक, बॉल. आदी विविध निरनिराळ्या साहित्य बाजारात उपलब्ध आहे. ख्रिसमस सणाची तयारी विविध चर्चामधूनही सुरु आहे. शहरात वायल्दर मेमोरियल चर्च,ब्रह्मपुरी येथील पवित्र उपासना मंदिर, ख्राईस्ट चर्च, ऑल सेंटस चर्च, सेंव्हथ डे चर्च, होली क्रोस चर्च आदी चर्च आहेत. या चर्चमध्ये आता दि. १ जानेवारी पर्यंत ख्रिसमस विविध कार्यक्रम होणार आहेत. क्रिसमस आणि केक असेही समीकरण आहे. शहरातील विविध बेकरिमधून केक खरदीसाठी ग्राहकांची विचारणा होत आहे.बेकरीमध्ये विविध प्रकारचे केक उपलब्ध आहेत.खास ख्रिसमस केक ही करण्यात आले आहेत. एकूण बाजारात ख्रिसमसमय वातावरण आहे.

गोवा येथील चर्च आम्ही पाहिले आहे.

DSCF1296चर्च इन गोवा

                                                                            चर्च इन गोवा

मुंबई

मुंबई: महाराष्ट्र राज्याची राजधानी !

व्हिटी, चर्चगेट व मुंबई सेन्ट्रल हि मुख्य रेल्वे स्टेशन आहेत. तेथून नंतर कल्याण, बोरिवली, विरार ईतर भागात लोकल, बसेस आहेत. वेस्टर्न हरबर असे भाग आहेत. महालक्ष्मी दादर चेम्बुर मुलुण्ड असे वेगवेगळे स्टेशन आहेत.

येथे खूपच पाहण्यासारखं आहे.
– आरे कॉलनी दूध घरोघरी देण्याचं साधनं. पूर्वी काचेच्या बाटलीतुन केंद्रावर रांगेत ऊभे राहून दूध वाटप करतं असे.
– ‘टाटा इंस्टीटयूट’, ‘गेट ऑफ ईन्डीया’, ‘ ताज हॉटेल ‘ मुंबई नगरपालिका ‘ सचिवालय ‘
– केईम रुग्णालय गणपती मंदिर विरार तलाव इंजीरीयन कॉलेज.
– क्रिकेट मैदान, धोबीतलाव ईन्दिरा विमानातलं. मुंबई विद्दापीठ असे खूपचं खूप पाहण्यास मिळते.

डेक्कनचीराणी, डेक्कन क्वीन मुंबई पुण्या मध्ये सकाळ संध्साकाळ धावते, आम्ही तिने प्रवास केला आहे.

‘टोकियो’

टोकियोत मुख्य खरेदी इलेक्ट्रोनिकस वस्तूची असते. अकीहाबारा हे इलेक्ट्रोनिक दुकानांचं छोटेखानी शहरच म्हणता येईल. तिथं पाचशेहून अधिक दुकानं आहेत. थायलंड, सिंगापूरच्या मानानं तिथं भाव कमी आहेत, घासाघीस करता येते व फसवाफसवी देखील कमी आहे. या व्यतिरिक्त इतर खरेदीसाठी शिबूया घराजूकू इत्यादी भाग आहेतच. खास जपानी सुशी, जपानी ग्रीन टी. साकी, इतर मसाले सोसेसं हे सारं घ्यायचं असल्यास कोणात्याही मोलच्या बेसमेंटला असणाऱ्या ‘देपाचिका’ या गृहउपोगी वस्तुंच्या विक्रीच्या ठिकाणाहून घ्याव. बहुतेक डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या बेसमेन्टना या ‘देपाचिका’ किंवा खाद्द वस्तुंची विक्री करणारे स्टॉल्स व स्टोर्सचे विभाग आहेत. घड्याळं, कलाकुसरीचे नमुने कागदी कंदील. कागदापासून इतर कलाकृती जापानी चित्र वस्तु छान मिळतात.

हे भटकंती मासिक मध्ये आहे. लिखाणं.

शिबूया एचएमव्ही

शिबूया एचएमव्ही

अन्नपूर्णा मंदिर

अन्नपूर्णा मंदिर – इंदूर शहरातील हे प्रसिध्द मंदिर जुन्या मंदिरापैकी ऐक आहे याची वास्तुरचना उत्तर भारतातील मंदिरांच्या वास्तुकलेपेक्षा वेगळी आहे. मदुराई येथील मीनाक्षी मंदिराचा प्रभाव या मंदिरावर दिसून येतो महाव्दार चार पूर्णाकृती व अलंकृत हत्तींनी मढविलेलं आहे. तेथील पद्मासनस्थ शंकराची साडेचौदा फुट उंच मूर्ती ही एकमेवाव्दितिय दुर्मिळ असून त्याची तुलना इतर कोठल्याही मूर्तीशी होऊ शकत नाही. या मंदिराच्या आवारात कालभैरव व हनुमान यांच्याहि मूर्ती आढळतात.

या मंदिरातील प्रवचन सभागृह तेथील भिंतीवरील कलाकुसरिसाठी प्रसिध्द आहे.

माझ्या आजीचं नावं अन्नपूर्णा होतं.

अन्नपूर्णा मंदिर

अन्नपूर्णा मंदिर

‘गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर’

कोलकाता येथे फ़िरते ‘टागोर संग्रहालय’ गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या दीडशेव्या जयंतीचं औचित्य साधून, कोलकात्यात ‘संस्कृती एक्सप्रेस’ सुरु करण्यात आली आहे. टागोर यांच्या जीवनपटाचे विविध पैलू उलगडणारी हि गाडी हावडा स्थानकाहून रवाना झाली असून ती सात मे २०११ रोजी परत हावडा स्थानकात येणार आहे.

देशभरातील सत्तर स्थानकांना भेट देणाऱ्या या गाडीचं, नंतर ‘टागोर संग्रहालया’त रूपांतर करण्यात येणार आहे. या गाडीला पाच डबे असून पहिल्या डब्यात गुरुदेव टागोर यांनी काढलेल्या छायाचित्रांचं संग्रहालय आहे. दुसऱ्या डब्यात टागोर यांच्या कविता, तिसऱ्या आणि चौथ्या डब्यात टागोर यांनी काढलेली चित्रं, ध्वनिचित्रफिती यांचा समावेश आहे. तर पाचव्या डब्यात गुरुवर्य टागोर यांचा शांतिनिकेतन ते कोलकात्यापर्यतचा अखेरचा प्रवास छायाचित्र रुपात दाखवीण्यात आला आहे.

शांतिनिकेतननं तयार केलेल्या वस्तू टागोर यांची विविध भाषांतील पुस्तकं या रेल्वेगाडीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर 

           गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर                                        ‘संस्कृती एक्स्प्रेस’

श्रीदत्त जयंती

दत्त जयंती: माझ्या भावाकडे छान दत्तजयंती चा ऊत्सव करतात. मी बरेचं वेळेला दत्तजयंती म्हणून माझ्या माहेरी भाऊ सौ. भावजय यांच्याकडे गेलेली आहे. तेथे बरेचं पाहुणे जमतात. माझ्या बरोबर कधी कधी आमचा मुलगा प्रणव पण येतो. परदेशातून माझा भाच्चा आकाश पण येत असतो. भावाच्या मुली पण असतात. ईतर नातेवाईकं जमतात. गुरुचरित्र पठन व पूजा सर्व यथासांग घरीच भाऊ करतात. सौ. भावजय व मी ईतर सर्वजण नैवेद्द स्वंयपाक घरीच सार्वजन मिळूण करतात. काय छान प्रसन्न सर्व वाटत. त्या दत्तजयंती दिवशी! नंतर काहीं जण मी प्रणव भाऊ सौ. भावजय भाच्ची दत्त मंदिरात जन्माला  जात. बारशे असल्यासारखे  पैठणी नेसूण मी व सार्वजन जात. संध्याकाळी ६ वाजता दत्त जन्म सोहळा झाल्यावर आह्मी पण प्रसाद म्हणूण मंदिराताच सुकामेवा काजु बदाम दिले. सर्व मानासारखं झाल्या सारखं वाटत. आजही!

मी व ह्यांणी औदुम्बर पाहिले आहे.

नर्सिंहवाडी

नर्सिंहवाडी

वॉशिंग्टन डी.सी. ‘न्यूझियम’

अ मेरिकाही अनेकांनी बघितली असेल आणि मुझियम्सही! पण अमेरिकेतलंच ‘न्यूझियम’ किती जणांनी पाहिलंय? ‘न्यूझियम’ हा शब्द तरी या आधी किती जणांनी ऐकलाय? ‘न्यूझियम’ म्हणजे काय माहीत आहे? – न्यूझियम म्हणजे ‘न्यूज’ ला वाहिलेलं म्युझियम’ त्यात काय भघायचं? जुन्या बातम्या वा वर्तमानपत्रं तिथे नीटपणे मांडून ठेवलेला असतील, झालं! असं कदाचित तुमच्या मनात येईल. पण थांबा हे ‘न्यूज’ला वाहेलेलं म्यूझियम असलं तरी अजिबात ‘बोअरिंग’ म्युझियम नाही. बातमीत वा वर्तमानपत्रात जराही रस नसलेला माणूसही जिथे आनंदाने दिवसभर रमेल, इतकं ते ‘इंटरेस्टिंग’ करण्यात आलं आहे. बातम्यांसारखा रटाळ विषयही किती आकर्षकपणे मांडला जाऊ शकतो याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. हे ‘न्यूझियम’ आहे अमेरिकेच्या राजधानीत, वॉशिंग्टन डी.सी. मध्ये – तब्बल अडीच लाख चौ. फुट जागेवर ते पसरलेलं आहे. बातम्यांचा गेल्या पाच शतकांचा इतिहास तिथे  अक्षरश: जिवंत होतो.

पत्रकार व जनसामान्य यात सुसंवाद स्थापित व्हावा, दोघांनाही एकमेकांच्या भूमिका नीट समजाव्यात, हाच या ‘न्यूझियम’चा मुख्य उद्देश असल्याने या काचेची रचना करण्यात आली आहे, की त्यासाठी तरी वाचकांनी या बातमीच्या प्रातांत डोकावावं…

Waushingtan DC Newsium

Waushingtan DC Newsium

दुबई !

वातानुकूलित समुद्रकिनारा जगातला पहिला वातानुकूलित समुद्रकिनारा कुठे येतोय,    माहीत आहे? – दुबईला! उन्हाळ्यात दुबईतलं तापमान ५०’ सेंटिग्रेडची कमाल मर्यादा गाठतं.    त्या काळात कुणालाच व्हार्सास (Versace) या जगत् विख्यात (fashion) हाउसने आता दुबईचा समुद्रकिनाराच चक्क वातानुकूलित करायचं    ठरवलं आहे. दुबईतल्या प्रख्यात (palajho) व्हर्सास hotelachyaa बाजुचा समुद्रकिनारा ते   वातानुकूलितकरणार आहेत. कसा, माहीत आहे? – त्यासाठी समुद्राच्या पुळणीखालून ए.सी.   डक्टस् टाकण्यात येतील. त्या उष्णता शोषून घेऊन पुळण थंडगार बनवतील. अगदी    उन्हाळ्यातही त्याच्यावर पहुडता येईल इतकी थंडगार! आहे की नाही, कमाल? 

the-palmDubai

दुबई समुद्र

गंगापुजन !

आक्का यात्रा कंपनी बरोबर रेल्वेने तिरुपती कान्याकुमारी व बरिचं स्तळं बघितली. पुण्यात आल्या. हे व मी कोल्हापूर येथे होतो. आक्का भेटण्या करता पुण्यात आम्ही पुण्यात गेलो. गंगापूजन करण्याचे ठरले. बाबा म्हणाले दादा करतील नंतर विद्दाभाऊजी करतील नंतर हे आण्णा करतील करत हे गंगापुजन करण्याच ठरल मी म्हंटल मी पण पूजेला बसते आम्ही दोघांनी आक्का यांच यात्रेच गंगापुजन केल. यात्रेतून आक्कानीं ६ वारी साडी आणली ती मला दिली. ती साडी मी खुपच खूप वापरली. गंगापुजनचा नैवेद्द घरीच सौ. सासूबाई व ईतारानीं स्यंपाक घरिचं केला त्यावेलेला नंतर

मी व हे मूल पुष्कर प्रणव शाळेत शिकतानां आम्ही सर्वजण सज्जनगड व चाफळ केले आहे.

Chaphalचाफळ

लं ड न !

लं ड न ल T गेल्यावर ‘पिकाडिली सर्कस’ हा भाग आवर्जून बघितला जातो. पण त्याच्याजवळच असलेली ‘Royal Institute of Painters in Water Color’ ही वास्तू सर्वसामान्यपणे बघितली जात नाही. १८९६ मध्ये याच वास्तूत स्वामी विवेकानंदांनी भाषणं केली होती. विवेकानंद व पुढे भगिनी निवेदिता म्हणून प्रसिध्द झालेल्या मिस मागरिट नोबल यांची भेटही येथेच झाली होती.

हे संदर्भ कळल्यावर या वास्तुंचं ऐतिहासिक मूल्य अधिकच ठसतं.

Swami Vivekananda    Royal Institute of Painters in Water Color

        Swami Vivekananda                  ‘Royal Institute of Painters in Water Color’

कोल्हापूर

महाराष्ट्रात कोल्हापूर हे शहर आपलं विशेष स्थान राखून आहे. ही भूमी आहे कलावंतांची, ही भूमि आहे आधयात्माची आणि ही माती आहे शूरवीर मर्द मराठयांची!   

याठिकाणी काय काय पाहाल?

१)  देवळं:  महालक्ष्मी मंदिर,  ज्योतिबा,  त्रिंबुली मंदिर, नरसिंवाडी,  कात्यायनी  मंदिर विश्र्वेश्र्वर, खिद्रापूर,  बाहुबली,  कामेरी,  शंकराचार्य  
२)  ऐतिसिक  स्थळं:  न्यू  पेलेस,  शालिनी पेलेस, भवानी मंडप, टाऊन हॉल, शिवाजी विद्दापीठ, विशाळगड किल्ला, पन्हाळा किल्ला
३)  तलाव:   रंकाळा,  कोटीतीर्थ  
४) अभयारण्य – दाजीपूर   अभयारण्य

कोल्हापूरहून जाताना कोल्हापुरी साज  नक्की घेऊन जा! मन कोल्हापुरी काळ्या आईच्या गंधाने आणि तन कोल्हापुरी साजाने सजून जाईल.

‘हवामहल’

राजस्थानात फिरायचं तर, तिथल्या महत्वाच्या शहरांच्या आसपासची ठिकाणं पाहता प्रवास करणं सोईचं ठरतं मुंबईहून तसंच अन्य महत्वाच्या शहरांपासून राजस्थानात जाण्यासाठी रेल्वे आणि रस्त्यांची उत्तम सुविधा आहे. जयपूर ही राजस्थानची राजधानी, दुसरा सवाई जयबी सिंह याने इ.स. १७२७ मध्ये ही नगरी वसवली. त्याकाळी या  नगरीभोवती भक्कम तट होता. आणि त्याला सात प्रवेशव्दारं होती. इ.स. १८७६ मध्ये  ‘प्रिन्स अल्बर्ट’ याच्या भेटीच्या निमित्ताने, शहरातील सर्व इमारतींना गुलाबी रंग लावण्यात आला होता. तेव्हापासून ‘गुलाबी शहर किंवा ‘पिंकसिटी’ म्हणून प्रसिध्द आहे. आजही तिथली काही घरं गुलाबी रंगातच पहायला मिळतात. जयपूरचं लक्षात राहणारं पर्यटनास्थळ म्हणजे ‘हवामहल’ हि पाच माजली भव्य इमारत इ.स. १७९९ मध्ये सवाई प्रतापसिंहाने ती बांधली.

राजरस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुका, शोभा यात्रा, राजस्त्रियांना पाहता याव्यात म्हणून या इमारतीला रस्त्याकडेच्या बाजूस अनेक लहानमोठया खिडक्या करण्यात आल्या आहेत. त्यातून राजस्त्रिया मिरवणुका पाहात असत.

हवामहल जयपूर

हवामहल (जयपूर)

भाजीवाले !

भाजीवाले: मी नेहमी शाहुमिल भाजी बाझार व कपिलतीर्थ येथून भाजी आणते. आता आमच्या भागात बरीच दुकानं झाली आहे. किराणा दुकानं भाजीचं दुकानं दुध ईतर ही आमच्या भागात मिळते. मी दुघ व ईतर सामान घेतले व निघाले. भाजीवाले म्हणाले आज भाजी   कांही नको ! मग मी हिरवी वांगी भरताची छान मिळतात. ती घेतली.

मटार टोम्याटो ईकडे पावटे शेंगा छान ओल्या मिळतात. ते घेतले. कडीपत्ता आलं कोथींबीर  असं भाजी घेतली व भाजीवाले नुसतचं ओळख दाखवून या ! असे म्हणाले .

आपल्या लक्षातही न येणारे कसे ओळख दाखवतात !

चंपाषष्ठी गुळखोबरं !

ॐ 

नारळाखोबराचीं वडी: नारळाचं  खोबर   खोवून  घ्यावे. वाटीभर खोबर खोवलेले तेवढी थोडी  कमी पण साखर घ्यावी. दूध व साय एकत्र करून ग्यास वर गोळा होई पर्यंत हलवावे. फार   घट्ट करू नये. नंतर त्यात सुकामेवा काजु बदाम जायफ़ळ किंवा वेलदोडे बारिक पुड घालावी. परातीला तुप लावून सगळे तयार घालेले मिश्रण परातीत गरमचं ठेवून हातानेचं पसरावे. गरमचं हव्या तश्या आकाराच्या वडया पाडाव्यातं द्यावेत.

आज चम्पाषष्ठी आहे. मार्तंड भैरावोत्थापन आहे. नारळाचं खोबरं गुळं खोबरं देतातं. मी नारळाची वडी घरी तयार केली आहे. मी .

मी केलेली नारळाची वडी

मी केलेली नारळाची वडी

फ्रान्स विमानाचा छायाचित्र (फोटो) !

हे व मी अमेरिका येथे सौ. सुनबाई व मुलगा यांच्याकडे जाण्यास निघालो तेंव्हा फ़्रान्स येथे दुसरे विमान बदलले. बस मधून तेथेच फिरतांना बसमध्ये चं मी तेथील विमानाचा फोटो छांयाचित्र काढलं आहे !

France   मी काढलेला फ्रान्स चा विमानाचं छायाचित्र (फोटो) !

कोल्हापूर कळशी!

ॐ 

आम्हीं कोल्हापूर ४० वर्षापूर्वी आलो. त्यावेळेला भांड्याची थोडीच दुकान असायची. आम्हीं  एकदा गोल तांब्यांची कळशी घेण्यास दुकानातं गेलो. मी म्हटलं गोल तांब्याची कळशी   दाखवा. ते म्हणाले तुम्हीं कोणत्या गावांचे. मला पाहिजे तशी कळशी मिळाली नाहीं.

आतां   वाटतं कीं प्रत्येक गावात वेगवेगळ्या आकाराचीं भांडी असतात; मिळतात. त्यावेळेला आपण कसें चुकीचे मागतं होतो! कोल्हापूर कळशीचा घाट निराळाचं. पण आता माझ्याकडे कोल्हापूर कळशी आहे.

ह्याचं मला जास्तच सुखावह वाटतं आहे.

DSCF1131      DSCF0567

                                        कोल्हापूर कळशी

गुरु सौ. अनुराधा राजेंद्र गरुड

विशेष/यशोदा  वाकणकर

गाणं, योगिनीताईसारखी गुरु आणि मी असं छान रसायन जमलं, आणि ‘सुर’ सापडला. इतकी छान, चपखल आणि सोपी उदाहरणं देऊन त्या गाणं शिकवतात की एकदम ते कळतंच! रागांशी, त्यातल्या बंदिशींशी मैत्री करत सुरु झालेला हा रम्य प्रवास–माझं गाणं

माझ्या गुरु. . .

सौ. अनुराधा राजेंद्र गरुड (योगिनी) घरोबा असलेली माझी छोटी बहिण आहे.

सौ. अनुराधा राजेंद्र गरुड

अँकर बटण

                                               ॐ 

पु.ल. देशपाण्डे यांनीं वास्तू वास्तू लिखाणावर माणसाचं मनं कसं असतं हे लिहिल्याच  वाचलं ऐकल, ते मात्र की माणसाला आपल्या वास्तु चा अभिमान असतो. आम्ही नवीन वास्तुत   राहायला आलो त्या वेळेला लाईटची बटन सुरेख मिळायची, ती त्यावेळा महाग पण असायाची. तरी कायम छान दिसतील म्हणून लावून घेतली. हे जे पाहूणे येतील त्यांनां आमच्या घरातील   बटन लावून छोटे दिवे लावलेले दाखवावयाचे. पाहूणे पण खूष व्हावयाचे. मला पण ह्यांचं बोलण ऐकूण मजा व हसूं यावयाच. त्यावेळा. आता तशी बटण हीं मिळतं नाहीत… हीं खराब झाली तरी!

DSCF1264

ओळख

टांगे व रीक्षा: ४० वर्षापूर्वी कोल्हापूर येथे आलो. तेव्हां येथे टांगेचं टांगे असायचे. गावातं जायला मात्र K. M. T. बस असे. आता मात्र भरपूर छान छान रिक्षा आहेत. रिक्षा स्टोप मी गेले की मला विचारतात, अंबाबाईला जायचं का? कधी कधी मी S. T. Stand ला जात असते. “महालक्ष्मी” फोटो मेमरी कार्डचे फोटो तेथेच धुऊन मीळतात. तेथे कोलेजची मुलं असतात. मालकिण पण असते. मी आधीच फोन करते. लाईट आहेत का?. मलाच वसुधा काय? असं ओळख दाखवतातं. मग मी फोटो घरी येतानां कधी कधी चालतं किंवा रिक्षा करते. माझ्या जवळ जुने पण फोटो आहेत. आपल्या राहणी वरती बोलण्या वरती लोक आपल्याला ओळखतात. मी रात्री गाणगापूर S. T. बसने कोल्हापूर येथे आले. ती बस थोडी लवकरचं आली. तरी ओळखीमुळे रीक्षा वालानीं मला मी एकटी असूनही मला घरी व्यवस्थित आणले.

वसुधा नावाच्या रांगोळ्या

पाना  फूलापासून काढलेल्या वसुधा नावाच्या रांगोळ्या

शेल्फ

आमचं जुन्या घरी मोठ्ठ शेल्फ असायचं. स्वत: च्या घरातं राहण्यास आलो. एक सेल्फ़ लहान वाटायला लागलं.  मूलं कॉलेजची होती. मुलांनी घरी शेल्फ करायचं ठरवलं. मूलानी पहिल्या शेल्फच माप त्या जवळ बसेल असं माप घेतल. ह्यांना  म्हणाले  आपणच लाकडी फ़ळ्या आणू. हे पण सर्व शेल्फ घरी  करण्यास तयार झाले. मागील  बाजू  फ़्लायवूडचे पण माप घेतले. भरपूर सुळे (खीळे) आणले. दोन्ही बाजू मध्ये प्रथम दोन फळ्या मारून आकार दिला. नंतर छान शेल्फ तयार झाल. 

नंतर त्याला मागे फ़्लायवूड लावले. आकार दोन्ही शेल्फचा चांगला दिसायला लागला. जवळ जवळ दोन्ही शेल्फ सुंदरं दिसतात. मग नंतर घरीच मूलानीं रंग आणले. सर्व रंगाचं साहित्य  आणले व रंग पण घरी दिला.

घरीच एक शेल्फ बनविले. त्याचा मनापासून आनंद कौतुक आजही वाटतं आहे. रंग मात्र दोन्ही शेल्फला घरी दिल्यामूळे दोन्ही शेल्फ मनातं भरतात.

भांडी यो s..s, भांडी

आमच्या भागातं महिनात एकदा, एक नवरा बायको भोवारीण फेरी घालतात. भांडी यो s..s, भांडी असं आवाज करून फिरतातं. घरी न बोलावताहि खालूनच आवाज करून येऊ का असं विचारतात. काहीं जुने कपडे, जुनी वापरुन खराब झालेली भांडी बाहेर काढायाची. ह्यावर काय देणार म्हणून विचारयाच. नंतर थोड मोठ्ठ काहीं मागायचं. नाहीं येत काकी ह्यावर, असं करतां करतां काहीतरी भांड घ्यायचं.

जातानां काकी बरं चाललय? असं त्यांनी विचारयाच. दातं काढले वाटतं. मऊ करून खावां असं सांगून ते दोघ निघतात… दुसऱ्या ठिकाणी भांडी यो, भांडी s.. s करतं फिरतातं.

गेल्या अनेक वर्षात मी सुध्धा त्यांच्याकडून काही भांडी घेतली. त्यातील एका भांड्याचा हा फोटो.


%d bloggers like this: