आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 1, 2010

भांडी यो s..s, भांडी

आमच्या भागातं महिनात एकदा, एक नवरा बायको भोवारीण फेरी घालतात. भांडी यो s..s, भांडी असं आवाज करून फिरतातं. घरी न बोलावताहि खालूनच आवाज करून येऊ का असं विचारतात. काहीं जुने कपडे, जुनी वापरुन खराब झालेली भांडी बाहेर काढायाची. ह्यावर काय देणार म्हणून विचारयाच. नंतर थोड मोठ्ठ काहीं मागायचं. नाहीं येत काकी ह्यावर, असं करतां करतां काहीतरी भांड घ्यायचं.

जातानां काकी बरं चाललय? असं त्यांनी विचारयाच. दातं काढले वाटतं. मऊ करून खावां असं सांगून ते दोघ निघतात… दुसऱ्या ठिकाणी भांडी यो, भांडी s.. s करतं फिरतातं.

गेल्या अनेक वर्षात मी सुध्धा त्यांच्याकडून काही भांडी घेतली. त्यातील एका भांड्याचा हा फोटो.


%d bloggers like this: