शेल्फ
ॐ
आमचं जुन्या घरी मोठ्ठ शेल्फ असायचं. स्वत: च्या घरातं राहण्यास आलो. एक सेल्फ़ लहान वाटायला लागलं. मूलं कॉलेजची होती. मुलांनी घरी शेल्फ करायचं ठरवलं. मूलानी पहिल्या शेल्फच माप त्या जवळ बसेल असं माप घेतल. ह्यांना म्हणाले आपणच लाकडी फ़ळ्या आणू. हे पण सर्व शेल्फ घरी करण्यास तयार झाले. मागील बाजू फ़्लायवूडचे पण माप घेतले. भरपूर सुळे (खीळे) आणले. दोन्ही बाजू मध्ये प्रथम दोन फळ्या मारून आकार दिला. नंतर छान शेल्फ तयार झाल.
नंतर त्याला मागे फ़्लायवूड लावले. आकार दोन्ही शेल्फचा चांगला दिसायला लागला. जवळ जवळ दोन्ही शेल्फ सुंदरं दिसतात. मग नंतर घरीच मूलानीं रंग आणले. सर्व रंगाचं साहित्य आणले व रंग पण घरी दिला.
घरीच एक शेल्फ बनविले. त्याचा मनापासून आनंद कौतुक आजही वाटतं आहे. रंग मात्र दोन्ही शेल्फला घरी दिल्यामूळे दोन्ही शेल्फ मनातं भरतात.