आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 4, 2010

ओळख

टांगे व रीक्षा: ४० वर्षापूर्वी कोल्हापूर येथे आलो. तेव्हां येथे टांगेचं टांगे असायचे. गावातं जायला मात्र K. M. T. बस असे. आता मात्र भरपूर छान छान रिक्षा आहेत. रिक्षा स्टोप मी गेले की मला विचारतात, अंबाबाईला जायचं का? कधी कधी मी S. T. Stand ला जात असते. “महालक्ष्मी” फोटो मेमरी कार्डचे फोटो तेथेच धुऊन मीळतात. तेथे कोलेजची मुलं असतात. मालकिण पण असते. मी आधीच फोन करते. लाईट आहेत का?. मलाच वसुधा काय? असं ओळख दाखवतातं. मग मी फोटो घरी येतानां कधी कधी चालतं किंवा रिक्षा करते. माझ्या जवळ जुने पण फोटो आहेत. आपल्या राहणी वरती बोलण्या वरती लोक आपल्याला ओळखतात. मी रात्री गाणगापूर S. T. बसने कोल्हापूर येथे आले. ती बस थोडी लवकरचं आली. तरी ओळखीमुळे रीक्षा वालानीं मला मी एकटी असूनही मला घरी व्यवस्थित आणले.

%d bloggers like this: