आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 13, 2010

‘हवामहल’

राजस्थानात फिरायचं तर, तिथल्या महत्वाच्या शहरांच्या आसपासची ठिकाणं पाहता प्रवास करणं सोईचं ठरतं मुंबईहून तसंच अन्य महत्वाच्या शहरांपासून राजस्थानात जाण्यासाठी रेल्वे आणि रस्त्यांची उत्तम सुविधा आहे. जयपूर ही राजस्थानची राजधानी, दुसरा सवाई जयबी सिंह याने इ.स. १७२७ मध्ये ही नगरी वसवली. त्याकाळी या  नगरीभोवती भक्कम तट होता. आणि त्याला सात प्रवेशव्दारं होती. इ.स. १८७६ मध्ये  ‘प्रिन्स अल्बर्ट’ याच्या भेटीच्या निमित्ताने, शहरातील सर्व इमारतींना गुलाबी रंग लावण्यात आला होता. तेव्हापासून ‘गुलाबी शहर किंवा ‘पिंकसिटी’ म्हणून प्रसिध्द आहे. आजही तिथली काही घरं गुलाबी रंगातच पहायला मिळतात. जयपूरचं लक्षात राहणारं पर्यटनास्थळ म्हणजे ‘हवामहल’ हि पाच माजली भव्य इमारत इ.स. १७९९ मध्ये सवाई प्रतापसिंहाने ती बांधली.

राजरस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुका, शोभा यात्रा, राजस्त्रियांना पाहता याव्यात म्हणून या इमारतीला रस्त्याकडेच्या बाजूस अनेक लहानमोठया खिडक्या करण्यात आल्या आहेत. त्यातून राजस्त्रिया मिरवणुका पाहात असत.

हवामहल जयपूर

हवामहल (जयपूर)

%d bloggers like this: