आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 19, 2010

वॉशिंग्टन डी.सी. ‘न्यूझियम’

अ मेरिकाही अनेकांनी बघितली असेल आणि मुझियम्सही! पण अमेरिकेतलंच ‘न्यूझियम’ किती जणांनी पाहिलंय? ‘न्यूझियम’ हा शब्द तरी या आधी किती जणांनी ऐकलाय? ‘न्यूझियम’ म्हणजे काय माहीत आहे? – न्यूझियम म्हणजे ‘न्यूज’ ला वाहिलेलं म्युझियम’ त्यात काय भघायचं? जुन्या बातम्या वा वर्तमानपत्रं तिथे नीटपणे मांडून ठेवलेला असतील, झालं! असं कदाचित तुमच्या मनात येईल. पण थांबा हे ‘न्यूज’ला वाहेलेलं म्यूझियम असलं तरी अजिबात ‘बोअरिंग’ म्युझियम नाही. बातमीत वा वर्तमानपत्रात जराही रस नसलेला माणूसही जिथे आनंदाने दिवसभर रमेल, इतकं ते ‘इंटरेस्टिंग’ करण्यात आलं आहे. बातम्यांसारखा रटाळ विषयही किती आकर्षकपणे मांडला जाऊ शकतो याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. हे ‘न्यूझियम’ आहे अमेरिकेच्या राजधानीत, वॉशिंग्टन डी.सी. मध्ये – तब्बल अडीच लाख चौ. फुट जागेवर ते पसरलेलं आहे. बातम्यांचा गेल्या पाच शतकांचा इतिहास तिथे  अक्षरश: जिवंत होतो.

पत्रकार व जनसामान्य यात सुसंवाद स्थापित व्हावा, दोघांनाही एकमेकांच्या भूमिका नीट समजाव्यात, हाच या ‘न्यूझियम’चा मुख्य उद्देश असल्याने या काचेची रचना करण्यात आली आहे, की त्यासाठी तरी वाचकांनी या बातमीच्या प्रातांत डोकावावं…

Waushingtan DC Newsium

Waushingtan DC Newsium

%d bloggers like this: