आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 21, 2010

‘गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर’

कोलकाता येथे फ़िरते ‘टागोर संग्रहालय’ गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या दीडशेव्या जयंतीचं औचित्य साधून, कोलकात्यात ‘संस्कृती एक्सप्रेस’ सुरु करण्यात आली आहे. टागोर यांच्या जीवनपटाचे विविध पैलू उलगडणारी हि गाडी हावडा स्थानकाहून रवाना झाली असून ती सात मे २०११ रोजी परत हावडा स्थानकात येणार आहे.

देशभरातील सत्तर स्थानकांना भेट देणाऱ्या या गाडीचं, नंतर ‘टागोर संग्रहालया’त रूपांतर करण्यात येणार आहे. या गाडीला पाच डबे असून पहिल्या डब्यात गुरुदेव टागोर यांनी काढलेल्या छायाचित्रांचं संग्रहालय आहे. दुसऱ्या डब्यात टागोर यांच्या कविता, तिसऱ्या आणि चौथ्या डब्यात टागोर यांनी काढलेली चित्रं, ध्वनिचित्रफिती यांचा समावेश आहे. तर पाचव्या डब्यात गुरुवर्य टागोर यांचा शांतिनिकेतन ते कोलकात्यापर्यतचा अखेरचा प्रवास छायाचित्र रुपात दाखवीण्यात आला आहे.

शांतिनिकेतननं तयार केलेल्या वस्तू टागोर यांची विविध भाषांतील पुस्तकं या रेल्वेगाडीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर 

           गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर                                        ‘संस्कृती एक्स्प्रेस’

%d bloggers like this: