आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 23, 2010

‘टोकियो’

टोकियोत मुख्य खरेदी इलेक्ट्रोनिकस वस्तूची असते. अकीहाबारा हे इलेक्ट्रोनिक दुकानांचं छोटेखानी शहरच म्हणता येईल. तिथं पाचशेहून अधिक दुकानं आहेत. थायलंड, सिंगापूरच्या मानानं तिथं भाव कमी आहेत, घासाघीस करता येते व फसवाफसवी देखील कमी आहे. या व्यतिरिक्त इतर खरेदीसाठी शिबूया घराजूकू इत्यादी भाग आहेतच. खास जपानी सुशी, जपानी ग्रीन टी. साकी, इतर मसाले सोसेसं हे सारं घ्यायचं असल्यास कोणात्याही मोलच्या बेसमेंटला असणाऱ्या ‘देपाचिका’ या गृहउपोगी वस्तुंच्या विक्रीच्या ठिकाणाहून घ्याव. बहुतेक डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या बेसमेन्टना या ‘देपाचिका’ किंवा खाद्द वस्तुंची विक्री करणारे स्टॉल्स व स्टोर्सचे विभाग आहेत. घड्याळं, कलाकुसरीचे नमुने कागदी कंदील. कागदापासून इतर कलाकृती जापानी चित्र वस्तु छान मिळतात.

हे भटकंती मासिक मध्ये आहे. लिखाणं.

शिबूया एचएमव्ही

शिबूया एचएमव्ही

%d bloggers like this: