आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 31, 2010

चालणे

चालणे : मी लहानपणी शाळेत जाणं येणं चालतच करतं असे. नातेवाईक यांच्या बरोबर फिरतानां चालतच जात असे. त्यावेळेला नातेवाईक यांच्याकडे जातानां पण आम्ही सर्वजण चालतं जातं असू. माझी चुलत बहिण शैलजा व काकू, आई (वहिनी) दींडी बरोबर वारीने पंढरपूर येथे १५/२० दिवस चालतं पंढरपूर येथे चालतं गेलेल्या आहेतं.

मी मात्र एवढी चालले नाही. बसस्थानका पर्यंत चालत जाते. मी बैलगाडीने नागापूर कन्नड चिखलठाणा पिसावर येथे बैलगाडी प्रवास केला आहे.

एस.टी. ने प्रवास केला आहे. आगगाडी ने प्रवास केला आहे. विमान याने प्रवास केला आहे.

माझे तसें प्रवास चांगले झाले आहेत. गोवा येथे पणजी ते वास्को येथे बोटी ने प्रवास केला आहे. मला जिवनातं एवढा प्रवास केल्याचा मस्त वाटतं आहे.

रिक्षातं व टांगा ह्यात पण मी बसून प्रवास केला आहे.

%d bloggers like this: