भारतीय झेंडे
ॐ
हा आहे छोटासा भारतीय झेंड्याचा इतिहास…
ॐ
हा आहे छोटासा भारतीय झेंड्याचा इतिहास…
ॐ
शालिवाहन शक महिने : १ चैत्र २ वैशाख ३ ज्येष्ठ ४ आषाढ ५ श्रावण ६ भाद्रपद ७ आश्विन ८ कार्तिक ९ मार्गशीर्ष १० पौंष ११ माघ १२ फाल्गुन अशी १२ महिने आहेतं अधिक महिना ३ वर्ष झाले की अधिक महिना येतो. अधिक महिना वैशाख महिना जेष्ठ महिना आश्विन महिना आधी अधिक महिना येतो.
ॐ
राशि :१२ राशि आहेतं :१ मेष २वृषभ ३ मिथुन ४ कर्क ५ सिंह ६ कन्या ७ तूळ ८ वृश्र्चिक ९ धनू १० मकर ११ कुंभ १२ मीन. अशा १२ राशि आहेत.
ॐ
नक्षत्र : १ अश्र्विनी २ भरणी ३ कृत्तिका ४ रोहिणी ५ मृग ६ आर्द्रा ७ पुनर्वसु ८ पुष्य ९ आश्लेषा १० मघा ११ पूर्वा १२ उत्तरा १३ हस्त १४ चित्रा १५ स्वाती १६ विशाखा १७ अनुराधा १८ ज्येष्ठा १९ मूळ २० पुर्वाषाढा २१ उत्तराषाढा २२ श्रवण २३ धनिष्ठा २४ शततारका २५ पूर्वाभाद्रपदा २६ उत्तराभाद्रपदा २७ रेवती अशी २७ नक्षत्र आहेतं.
ॐ
ही सर्व माहिती आहे.
अधिक महिना अश्विन नवरात्र
ॐ
नदी : समुद्र : गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी नदी अशा नद्या आहेत.
१. गंगा नदी काशी रामेश्वर वाराणशी येथे आहे. २. यमुना दिल्ली आग्रा येथे आहे. ३. कावेरी नदी कर्नाटक तामिळनाडू येथे आहे. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिलनाडु मधुन वाहते व पुढे बंगालच्या खाडिस मिळते. ४. गोदावरी नाशिक, नांदेड, औरंगाबाद येथे आहे. ५. कृष्णा कराड सांगली पंढरपुर येथे आहे. कोल्हापूर येथे पाचं नद्या चां संगम आहे.
ॐ
समुद्र :पेसिपिक समुद्र अटलांटीक समुद्र.असे आहेत.
Pacific समुद्र, आशिया आणि ऑस्ट्रेलीया या खंडाना अमेरिकेपासून वेगळा करतो. हा समुद्र पुढे Equetor मुळे, (विषुववृत्त), उत्तर आणि दक्षिण भागात विभागाला गेला आहे.
अटलांटिक समुद्र अमेरिकेला युरेशिया (Eurasia) आणि आफ्रिका खंडान पासून वेगळे करतो. हा समुद्र पुढे Equetor मुळे, (विषुववृत्त), उत्तर आणि दक्षिण भागात विभागाला गेला आहे.
अरबी समुद्र दक्षिण आशिया खंडास वेढले आहे. हा समुद्र आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडास वेगळे Seperate करतो.
ॐ
कुंभमेळा च्या वेळेला समुद्र, नदीत स्नान करतात. सूर्यग्रहण संपल्या नंतर नदीतं स्नान करतातं .
श्रावण पौर्णिमा महिनातं नदी समुद्र यांची नारळ वाहुन पूजा करतातं.
गोदावरी नदी समुद्र
पंचगंगा नदी, कोल्हापूर
ॐ
मलायात छत्री वापरणारा माणूस प्रतिष्ठित गणला जातो. तेथे सोनेरी रंगाची छत्री वापरण्याचा अधिकार केवळ राजाला होता. ब्रह्मदेशात (म्यानमार) आजदेखील कागदी छत्र्या वापरल्या जातात.
तेथिल धर्मगुरुंना लाल रंगाची छत्री वापरण्याचा अधिकार बहाल केलेला असतो. त्यांच्या शिवाय दुसरा कुणीही या रंगाची छत्री वापरु शकत नाही. छत्री वापरण्याला मलायात प्रतिष्ठा
हे लिखाण २०१० दिवाळी मस्त भटकंती अंक मध्ये आहे.
ॐ
आम्ही सोसायटीत राहायला आलो तेंव्हा, २५ वर्षा पूर्वी, येथे खूप मोकळी जागा होती. आजुबाजुला थोडी शेती पण होती. चिमण्या खूप असायचा.आमच्या घरातं संध्याकाळ झाली की आमच्या घरात येऊन बसतं. ओट्यावर कांही पोळी, तांदूळ असले की खात असतं. आमच्या घरातं दिव्या साठी एक टोपली टांगलेली असे. त्यात चिमणी बसतं असे. तसेच लाकडी लाईट साठी कलेले जागा तेथे पण चिमणी बसतं असे. दोन चिमण्या सततं आमच्या घरातं असतं. एकदा टोपलीत बसलेली चिमणी पाहून चिमणी व टोपली चं छायाचित्र आमचा मुलगा याने छायाचित्र काढलं आहे.टोपलीत बसलेली चिमणी आजही आमच्या घरातं छायाचित्रात पाहायला मिळते. आता ही आरशात बघायला कांही चिमण्या येतातं.
टोपलीतली चिमणी
टोपलीतील झुम्बराचा प्रकाश
ॐ
२६ जानेवारी २०११
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
तिरंगा भारत
रांगोळी झेंडा
ॐ
चतुर्भुज मंदिर – ग्वाल्हेर हे मध्यप्रदेशातिल एक प्रमुख शहर असून बराच काळ शिंदे राजघराण्यानं तिथं राज्य केलं. हे शहर एकेकाळी गोपाद्री किंवा गोपाचल म्हणून प्रसिध्द होतं. तिथं शिंदे यांनी एक भव्य किल्ला बंधला आहे, या किल्लात बरीच छोटी-मोठी मंदिरं आहेत. त्यातील सर्वात उल्लेखनीय आहे ते चतुर्भुज मंदिर. किल्ल्याच्या पूर्व दिशेला असलेलं हे विष्णुचं मंदिर त्यातील दगडी शिळ्पासाठी प्रसिध्द आहे.
नगरभट्ट राजाच्या नातवानं ८७५ साली हे मंदिर बांधलं. या मंदिरात बरेच संस्कृत भाषेतील शिलालेख सापडतात. या किल्ल्यात या मंदिराशिवाय सास-बहू मंदिर, तेलीका मंदिर अशी छोटी मंदिरं हि आढळतात.
चतुर्भुज मंदिर
ॐ
आजच्या आधुनिक जगात स्थापत्य कलाशास्त्राचा उत्कृष्ट नमुना ठरावा असे वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग ‘श्री घृष्णेश्वर’ आहे. वेरुळ येथे या ज्योतिर्लिंगाबरोबरच, लक्ष विनायक हे देवस्थान आहे. पर्यटनदृष्ट्या महत्व लाभलेले हे गाव नैसर्गिक वानराई, डोंगराच्या कुशीत वसले आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांना निसर्गाचे आल्हाददायक अनुभवावयास मिळते. वेरुळ येथील ‘श्री घृष्णेश्वर’ हे बारावे व शेवटचे ज्योतिर्लिंग असल्याने, या ठिकाणी ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होते. याबाबत पौराणिक ग्रंथांमध्ये माहिती आढळते, याचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण रामायण, महाभारत या ग्रंथांमध्ये आढळतो.
श्री घृष्णेश्वर मंदिर लाल दगडात बांधलेले असून, आकर्षक कोरिव काम करण्यात आले आहे. सभामंडप २४ खांबांवर आधारलेला आहे. लिंग पूर्वाभिमुख आहे. या मंदिराचे काम सन ७५० मध्ये राष्ट्रकुल घराण्यातील दन्तदुर्ग यांनी सुरु केले. वेरुळ येथे मंदिर विश्वस्त मंडळातर्फे धर्मशाळेचे काम सुरु आहे. वेरूळ येथे जगप्रसिध्द वेरूळ लेण्या आहेत. ऐतिहासिक स्मारक, शहाजीराजे भोसले यांची गढी आहे. दोन दिवस निवांतपणे दर्शन व पर्यटन करण्यासारखे हे स्थळ आहे.
|| देवस्थान विशेषांक सकाळ || मे २००२
‘श्री घृष्णेश्वर’
ॐ
सुभाषचंद्र बोस : ज्याच्या सावलीचाही इंग्रजांनी धसका घेतला होता, अशा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आज जन्मदिन. दि. २३ जानेवारी १८९७. रोजी कटक येथे त्यांचा जन्म झाला.
आय.सी.एस. सारखी सर्वोच्च पदवी घेतली. सत्ता, संपत्ती लाथाडून स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाला. प्रथम देशबंधू चित्तरंजन दास आणि पुढे गांधीजी च्या कार्यात सुभाषचंद्र बोस मग्न राहिले. काँग्रेसचे ते दोन वेळा अध्यक्ष झाले. दुसऱ्या महायुध्याचा फायदा घेत, आंतरराष्ट्रीय सहकार्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न गौरवास्पद आहेत. १९४१ ते ४४ या कालावधीत साक्षात काळाशी टक्कर घेत त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा जरी घेतला, तरी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ते एक सुवर्णपान होते, हे ध्यानी येते.
सुभाषचंद्र बोस पुस्तकं
ह्या वर्षात खालील चार तारखा मध्ये फक्त १ हा आकडा असेल.
१/१/११ – एक जानेवारी
११/१/११ – अकरा जानेवारी
१/११/११ – एक नोव्हेंबर
११/११/११ – अकरा नोव्हेंबर
आणखीन एक मजेदार गोष्ट – जर का तुमचा जन्म मागच्या शतकात झाला असेल तर तुमच्या ह्या वर्षीच्या वाढदिवसाला होणाऱ्या वयात तुम्ही ज्या वर्षी जन्माला होता ते वर्ष मिळवा. त्याची बेरीज १११ येईल.
उदाहरणार्थ –
जर का तुमचा जन्म १९६९ साली झाला असेल तर तुमचे ह्या वर्षी वय ४२ होईल.
त्यामुळे ४२ + ६९ = १११
जर का तुमचा जन्म १९७३ साली झाला असेल तर तुमचे ह्या वर्षी वय ३८ होईल.
त्यामुळे ३८ + ७३ = १११
आहे की नाही १ आकड्याची धमाल ह्या वर्षी?
एक हा आकडा वेगवेगळ्या भाषेत कसा लिहिला जातो ह्याचा नमुना खाली दाखविला आहे.
1 – इंग्रजी
१ – मराठी, हिंदी अणि संस्कृत
૧ – गुजराती
೧ – कन्नड आणि तेलगु
੧ – पंजाबी
௧ – तमिळ
ॐ
२१ जानेवारी २०१०, १५:२५:०३ (३:२५:३).
मध्ये घरातं संगणक मुलांनीं विकतं आणले. केबल घेतली. मी संगणक शिकायला सुरुवातं केली. इंग्रजी पुस्तक लिखानं केले. इंग्रजी कविता लिखानं केले. मराठी संस्कृत पण लिखानं केले. हिंदी एक धडा लिखानं केले. माझ्या जवळची माहिती व छायाचित्र फोटो देण्यासं शिकले. खूप लिखानं झाले. छायाचित्र वापरुन तयार केले आहेत. एका ब्लॉग मध्ये ६०/७० पानं आहेतं. एवढं सगळ सर्व तयार करण्याकरतां मूल वाचक वर्ग व केबल यांचं साहाय्य मीळाल आहे.
त्याबद्दल सर्वांना धंयवाद. धन्यवाद !
नव नवीन वर्ष चा शुभेछा !
मी केलेले विणकाम नववर्ष फुगे
ॐ
घड्याळ : खुपपुर्वी शेती करणारे व ईतर घरातं राहआरे कुटुंब लोक सूर्य याची दिशा पाहुन वेळ ठरवतं असतं शेतीवर जाणे जेवण न्याहरी स्वंयपाक करणे. सर्व काम सूर्य याची दिशा पाहुन करतं असतं. नंतर घड्याळ चा शोध लागला. किल्ली ची घड्याळ आली. लोकांना खर वाटलं नाही पसंत पडलं नाही. सवय होई पर्यंत खुपच त्रास झाला.
पण आता घड्याळ नाही तर चैन पडतं नाही.
कोनाडा सेल्प्ह भींतीवर हॉलं मध्ये पण घड्याळं लावलेली दिसतात. पूर्वी हातात व ईतर घड्याळं किल्लीची असायची. एकाचा मोठ्या थोर व्यक्तीकडे घड्याळ असे. सेल ची घड्याळ आली. बिनाकिल्लीच घड्याळ कसं चालतं असं वाटावाचं. मला सुद्धा. आतां घरात हातात सर्व लहान मोठी माणसं बायका मुली पण घड्याळ वापरतात.
भारत : भारतातील दुपारी ०३.०६ वेळ आहे. त्याप्रमाणे ईतर देश यांच्या घड्याळाच्या वेळा लिहिल्या आहेत.
जपान : १८.३६ संध्याकाळ,
ऑस्टेलिया : एडलेड २०.०६ संध्याकाळ, सिडनी : २०.३६ वेळ संध्याकाळ.
श्रीलंका: १५.२६ वेळ दुपार, दुबई : १३. ३६ वेळ दुपार,
युरोप: हाम्बुर्ग : १०.३६. सकाळ, FRANKFURT : १०.३६ सकाळ, लंडन : ९.३६ सकाळ,
आफ्रिका : जोहान्सबर्ग : ११.३६ सकाळ.
आमच्या घरातील किल्लीच घड्याळ चालू आहे. पण छायाचित्र जुनं आहे.
घड्याळ
ॐ
सूर्यमंदिर: मोढेरा – मेहसानापासून २५ कि.मी. अंतरावर पुष्पावती नदीकाठी, इ.स. १०२६ मध्ये सोलंकी वंशाच्या राजा भीमदेव याने हुबेहूब कोणार्क सूर्य मंदिरासारखंच हे मंदिर बांधलं. स्कंदपुराण व ब्रह्मपुराणानुसार मोढेराच्या आजूबाजूचा परिसर ‘धर्मारण्य’ नावानं ओळखला जायचा. सूर्यमंदिराची रचना अशी आहे, की सकाळची सूर्याची किरणं थेट मंदिरातील सूर्याच्या मूर्तीवर पडतात. दरवर्षी जानेवारीमध्ये तिथं ‘मोढेरा डान्स फेस्टिवल’ आयोजित केला जातो.
गुजरातच्या धार्मिक इतिहासात अहमदाबाद मधील हनुमान मंदिर, छोटीला गावातील चामुंडा मंदिर, नादीयादमधील संत संतराम मंदिर, साबरकटा जिल्ह्यातील शामलाजी मंदिर यांचं महत्वही खूप मोठं आहे. काळाची पानं उलटताना असं लक्षात येतं, की आपली मंदिर ही केवळ देवस्थानं नाहीत; तर ती सामाजिक, आध्यात्मिक, उत्थानाची केंद्रं ही आहेत. आपल्या अतूट अंग आहेत. त्यामुळेच हे संचित, हा समृध्द वारसा जपायला हवा.
आज १९/०१/२०११ ला शाकंबरी पौर्णिमा असली तरी पौंश महिन्यात सूर्य याला महत्व दिल्या मुळे आज सूर्य मंदिर लिहिले आहे.
‘मस्त भटकंती’ (ऑगस्ट २०१०) मध्ये लिखाण आहे.
सूर्यमंदिर
ॐ
भाषा: भाषा या शब्द म्हंटल म्हणजे आरे वा ! रुबाब आपुलकी वाटतं असते. हे सर्वान्नाच त्या त्या भाषेचा गौरव, अभिमान वाटतं असतो.
तरी पण दुसरी भाषा शिकण्यासाठी माणूस धडपडतं असतो. शिकण्याची ईच्छा शक्ती असते. त्यामुळे परगावातं, परप्रांतातं जाऊन व परदेशातं पण त्यांची भाषा शिकुन राहतातं. भाषेमुळे जनसमुदाय लोकसमुदाय एकत्र राहु शकतातं. हे नक्कीचं.
हिंदी, संस्कृत, मराठी, गुजराथी, तेलगु, उर्दु, तामिळ, बंगाली, रशिया, ईंग्रजी असे खूप भाषा संगता येतील. भाषेमुळे शेजार, गावं, प्रांत, देश, जग सर्व एक आहेत अशी जाणीव असते.
ॐ
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ: ऋ
क ख ग घ ड. च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श
ष स ह ळ क्ष ज्ञ
आमच्या घरात असं पुस्तक आहे.
सुबोध उजळणी सरस्वती रांगोळी
ॐ
पुष्कर याने कॉलेज मध्ये असतांना काढलेले चित्र (Drawing).
माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. वीर सावरकर.
ॐ
प्रणव याने कॉलेज मध्ये असताना काढलेला गणपती.
प्रणव गणपती
ॐ
मी ‘वसुधालय’ मध्ये लिखाणं ब्लॉग मध्ये लिखाणं केले आहे. ह्यालिखाणातं माझी पाककृती रांगोळी सतार विषयी माहिती दिली आहे. तसेचं फेरीवाले पासून मोठ मोठया मॉल दाखविले आहे. छायाचित्र पण तसेच लावले आहेत. खेडेगावं पासून देश परदेश गावं लिहिली आहेत. त्याची माहिती पण छायाचित्र लावून दाखवून दिली आहेतं
शब्दाला महत्व देण्याकरता शब्द सुटा करून शब्द लिहिला आहे. व नंतर त्याची माहिती दिली आहे. उदा. वांगं : वांगं भरीत, वाचण्यास सोपं वाटतं.
भोगी व मकर संक्रांत वासुधालय लिखाणात आलं आहे.
ज्येष्ठ माननीय थोर व्यक्ती चीं लिखाणं केले आहे. तेथे ही छायाचित्र पाहण्यास छान वाटतं आहे.
एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न मिळाले आहे. ईथं पर्यंत लिखाणं झाले आहे.
ॐ
दारावरचे तोरणं
ॐ
संक्रांत सण १४ जानेवारी पौंश महिना पासून ते माघ रथसप्तमी पर्यंत असतो. हया महिनात सवाष्णी बायका मंगळवारी ५ घरी जोगवा मागतातं व त्याचं शिजवुन अन्न खातातं. संक्रात म्हणुन वाणं (लुटणं) पण करायची पद्धत आहे. काळ्या रंगाला फार महत्व आहे. साडी घेतातं.
ॐ
पंतग : २१ डिसेंबर २०१० आग्रहायणी, उत्तरायनारंभ, मकरायन २९|०८ सौर शिशिर ऋतु प्रारंभ होतो. यंदा अधिक महिना (मासं) आल्यामुळे मकर संक्रांत १५ जानेवारी ला आली आहे. भोगी १४ जानेवारी ला आली आहे. संक्रांत सण म्हणजे तिळगुळचा सण. तसेचं पतंग उडविण्याचा सण. गल्लोगल्ली मूले व माणसं पण पतंग उडविताना दिसतातं. आकाशातं खूप उंच पतंग गेला की हातातल्या मांजाला पण हातात जडपणा येतो. मी व आमची मूले शाळेत असतानां शेजारच्या पटांगणातं खूपवेळा पतंग उडवित असूं मी पण त्यात भाग घेतं असे. खूपच चांगलं वाटत होत. त्यावेळा पतंग मांजाच सूत मी व मूल घरीच बनवतं होतो. सूत नीट झालं की पतंग पण छान उंच उडतो. याचा चांगलाच अनुभव आहे. त्या वेळेसची भिंगरी आजही घरात आहे.
ॐ
पतंग : पतंग उडविण्याकारीतां गच्चीवर, मैदान, बाग यथे लोक जमा होतातं. राजस्थान येथे गर्दी असते. अहमाबादचे प्रसिद्ध पतंगपटू रसूभाई रहिमभाई यांनी एकाच माज्यानं ५०० पतंग उडवून दाखविले. तेंव्हापासून दरवर्षी अहमदाबाद येथे पतंग महोत्सव भरतं आहे. देशी परदेशी पाहुणे, पतंग निर्माते आणि पतंगपटू या महोत्सवाला आवर्जुन उपस्थित राहतातं.
घरातली भिंगरी
ॐ
भोगी : यंदा भोगी १४ जानेवारी ला आली आहे. अधिक महिना २०१० मध्ये आला. भोगी १४ जानेवारीला करणार. भोगिला वांग पावटे गाजर या भाजा जास्त वापर करतातं. वांग भरित, परतून वांग, गाजराची कोशींबिर करतातं. मुग तांदुळ याची खिचडी करतातं.
बाजरीच पिठामध्ये मीठ घालून थापतांना तीळ लाऊन बाजरीची भाकरी करतात. तसेच ऊस, गाजर, गहू, हरबरे, ओला हरबराचे दाणे एकत्र करुन भाजी, बाजरीची भाकरी पांच घरी वाण देतातं. लोणी पण त्या बरोबर देतातं. अशा प्रकारे भोगी सण करतातं.
कोल्हापूरची हिरवी वांगी आणि पावटा तीळ लावलेली बाजरीची भाकरी
तयार तीळ लावलेली बाजरीची भाकरी
ॐ
वांग याचं भरीतं : वांगयाचं भरीतं पूर्वी वांग चुलीवर थोडे कोलाशे पेटलेल्यावर वांग छान भाजून घेत असतं. आता GAS शेगडीवर मायक्रोव्होव मध्ये वांग भाजतातं. जसजसे बदल झाले तसतसे बायका कामं करायला लागल्या आहेतं प्रथम वांग छान भाजून घ्यावं. भाजलेले काळ साल काढून हातानेचं वांग बारीक करावं. त्यात आवडीनुसार तिखट मीठ हिंग हळद टाकावी. कोणी कोणी दाण्याचाकुट पण टाकतातं. कच्च च तेल टाकावे म्हणजे जास्तचं चांगल वांग च भरीतं लागतं.
यंदा (यावर्षी) संक्रांत १५ जानेवारीला आली आहे. १४ तारखेला भोगीसाठी वांग भरीत असे चविष्ट पदार्थ चवीने खातात.
वांग भरीत
ॐ
एम.एस.(मदुराई षण्मुखाभाडिभू) सुब्बलक्ष्मी या ‘भारतरत्न’ पदवीने गौरविल्या गेलेल्या प्रख्यात गायिका. शिवाय ‘Raman Magsese’ पुरस्कारविजेत्या मी फक्त एक गायिका आहे. त्यामुळे माझ्या गायनाचं वैशिष्टय काय आहे, हे मला स्वत;ला सांगता येणार नाही. पण, गायनातूनाच मी ईश्वर शोधते.गायनाच्या माध्यामातून ईश्वराची पूजा करते.
भारत महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याच्या राणी एलिझाबेथ यांच्या उपस्थितीत ‘रॉयल अल्वर्त हॉल’ लंडन येथे झालेलं गायन किंवा क्रेमलिन राजवाद्याय व ‘यूनो’ च्या आमसभेत किंवा त्यागराज महोत्सवात त्या गायल्या. त्यांना मिळालेले पुरस्कार पाहता कुणीही चकित व्हाव!
‘शांतिनिकेतन’ ची ‘देषिकोत्तमा’, मद्रास म्युझिक अकादमीच्या ‘संगीत कलानिधी’ श्री व्यंकटेश्वर विद्दापीठ च्या सन्माननीय डॉक्टरेट, पद् मभूषण, पद्मभूषण, पद् मविभुषण, सप्तगिरी संगीत विव्दानामणी अशा अगणित पुरस्कारांनी सन्मानित केलेले गायिका वृत्तीनं अत्यंत लीन अशा आहेत.
रोजची दारावरची रांगोळी असो की हार गुंफायचे असोत, अम्मा इतक्या कलात्मकापणे करते. की पाहत राहावं….
एम. एस. सुब्बलक्ष्मी
ॐ
आठवणींचा अल्बम : सुनीला करंबळेकर…. आजवर अनेक मालिकांमध्ये नकारार्थी भूमिका साकारलेली ही गुणी अभिनेत्री. परंतु प्रत्यक्ष जीवनात ती किती संवेदनशील, भावनिक आहे हे तिच्या फोटोग्राफितून कळतं. शुटींगच्या निमित्तानं बरचं फिरणं होतं. त्यातून तिला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली.
तिचं वेगळेपण म्हणजे तिला ‘फूड फोटोग्राफी’ करायला आवडते. आपल्या या आवडीबद्दल सुनीला म्हणते, “लोकांना वेगवेगळ्या खाद्दपदार्थाची चव चाखायला आवडते. मला मात्र वेगवेगळ्या खाद्दपदार्थांचे फोटो काढायला आवडतात. समोर एखादं सफ़रचंद जरी दिसलं तरी मी त्याचा फोटो काढते.. मला निसर्गातील देखावेही ‘कॅप्चर’ करायला आवडतात. याशिवाय मला माणसांचे नैसर्गिक हावभाव टिपायलाही आवडतं.” एखाद्या माणसाच्या नकळत फोटो काढला तर त्याचे त्याचे खरेखुरे हावभाव टिपता येतात, असं सुनीला मानते.
हे लिखाणं मस्त भटकंती दिवाळी २०१० मध्ये आहे. संपादक : मिलिंद गुणाजी आहेत.
सुनीला करंबळेकर
ॐ
मी सतार शिकायला सुरुवातं केलीं. सर ! म्हणाले बाई तुमचा ‘सा’ स्वर वाजतं नाही, मी म्हटलं दुसरे स्वर लांब लांब आहेत. तर सर ! म्हणाले स्वर लांब असलेतरी ‘सा’ वाजतं राहतो. तर सरांनी ‘सा’ वाजत राहील असे शिकविले. नंतर मी ‘भूप’, ‘यमन’, ‘रागेश्री’, ‘मालंकस’, ‘बिहाग’, ‘सारगं’, ‘बागेश्री’, ‘दुर्गा’ असे बरेचं सतारी मध्ये ‘किराणा घराणाचे’ राग शिकले. नंतर बेळगावं येथे सरानीं स्पर्ध्देत भाग घेण्यास सांगितलं व बेळगावं येथे उत्तेजनार्थ बक्षिस मिळालें. कधीच असं बेळगावं बक्षिस मिळेलं असं वाटलं नव्हतं! कोल्हापूर येथे कॉमर्स कॉलेज शिवाजी हॉल ईतर बरेचं ठिकाणीं माझी सतार वादनं झालें.
जुन्या देवल क्लब मध्ये खूप सरांच्या उपस्थितीत माझी सतारीची परीक्षा झाली.
सकाळी ५ वाजतां माझा सतार वादनाचा रियाझ असें.
CERTIFICATE
ॐ
ए क अतिशय देखणं सुनियोजित असं शहर आणि तेही पूर्णपणे जमिनीखाली… ऐकलंय त्याच्या त्याच्याबद्दल? असं एक शहर आहे… त्याचं नाव ‘किश’! इराणमधलं हे शहर आज जगभरातल्या पर्यटकांच्या आकर्षनाचं केद्रं बनलं आहे. हे भूमिगत शहर कशाबद्दल प्रसिध्द आहे, माहीत आहे? – कारीझ(kariz) बद्दल। करिझ हा एक पर्शियन शब्द आहे. त्याचा अर्थ आहे पाण्याची नलिका. आखाती प्रदेशात जमिनीतलं पाणी पृष्ठभागावर आणण्यासाठी पूर्वी अशा जलवाहक नलिका बांधल्या जात. तया सर्वसाधारणपणे उंचावरच्या भूगर्भातलं पाणी खोलगट भागातील भुपृष्ठाकडे वाहून नेता असत. पण किश हे उचांवर नसूनही तिथून बांधण्यात आलेली ही तब्बल २ हजार वर्षापूर्वी ची नलिका, इराणी लोकंचं बांधकाम कौशल्य तर दाखवतेच, पण प्राचीन संस्कृती , जीवनशैली समजून दृष्टीनेही ती अतिशय महात्वाचि ठरते. जगभरातल्या पर्यटकांची पावलं आज या किशकडे वळताहेत, ती त्याचमुळे!
किश हे इराणचं एक बेट.
भूमिगत आश्र्चर्य
ॐ
म ध्य प्रदेशातील जबलपूर इंदौर, पचमढी, उज्जैन, मांडू, खजुराहो अशी ठिकाणं पाहून झाली होती. तरी अजुन निम्मा मध्यप्रदेश राहिला होता. तो योग मागच्या वर्षी आला. यात जरा ‘हटके’ ठिकाणं पाहणार होतो. त्यातलं मला सर्वात आवडलेलं ठिकाण म्हणजे दातिया. दातीयाचा अप्रतिम सतखंडा महाल. ग्वालेरपासून जरी हा ७० कि. मी. असला तरी आम्ही ग्वाल्हेरवरुन आधी ओरछा गाठलं. ओराछाची प्रेक्षणीय स्थळं पाहून दुसरा दिवस दातीयाचा राजमहाल पाहण्यासाठी ठेविला होता. ओरछा ते दतिया साधारण ४० कि. मी. आहे. दतीयाचा हा राजवाडा लांबूनच मनात भरतो या राजवाड्यात प्रवेश करताना प्रथम १२ – १५ खड्या पायऱ्या चढाव्या लागतात. मग प्रवेशव्दारापाशी ठेवलेल्या नोंदवहीत आपलं नाव – गाव लिहावं लागतं. मग तिथल्याच एका गाइडला घ्यायचं आणि इतिहासात रंगून जायचं
४५० खोल्या असलेला हा महाल १५० मिटर उंच आहे. सर्व बांधकाम लाइमस्टोन मध्ये केलेलं आहे. सतखंडा महाल मस्त भटकंती अंक ऑगस्ट २०१० मधील माहिती आहे.
सतखंडा महाल मस्त भटकंती अंक ऑगस्ट २०१० मधील माहिती आहे.
श्री चक्र किंवा श्री यंत्रात एका बिंदू भोवती नऊ त्रिकोण एकमेकात जोडलेले असतात. मधला बिंदू भौतिक जग आणि जे आकारात नाही (अव्यक्त) यांना जोडणारा संगम आहे असे मानतात. हा बिंदू श्री देवी ललीता महात्रिपुरसुन्दरीचा (पार्वती देवीचा एक अवतार) प्रतिक मानतात. चार त्रिकोणांची दिशा वरती असते आणि ते शिव किंवा पौरुष्य दर्शवतात. पाच त्रिकोणांची दिशा खाली असते आणि ते शक्ती किंवा स्त्रीत्व दर्शवतात. नऊ त्रिकोण असल्यामुळे ह्या यंत्राला नवयोनी चक्र असेही म्हणतात. नऊ जोडणाऱ्या त्रिकोणांच्या आत ४३ छोटे त्रिकोण असतात व हे संपूर्ण विश्वाचे प्रतिक मानतात. तसेच ह्या चक्राला सृष्टीची कोख असेही प्रतीकारूपी मानतात.
मी “श्री चक्र” देवळातं कोरलेले पाहिले. मला ते खूप काढावे वाटले. मी पुस्तक आणले. व पाहून काढण्यास शिकले. यावयाला लागले आवड निर्माण झाली. रोज कागदावर काढू लागले. मग एवढे काढले की ओळखीच्या लोकांना दिले नातेवाईक यांना दिले. अधीक महिना आला तेंवा पुजारीबाई यांच्याकडे १० श्री यंत्र कागदावर काढून दिले. सर्वांना देवळातं आवडले. मी मध्येच दर्शानासाठी गेल तर पुजारीबाई म्हणाल्या आज यंत्र आणले नाही? मी परत १०,१० अशी श्री यंत्र दिली. मला अधीक मास! याचं आपण कांहीं केलं याचं मनाला समाधान हलकं वाटलं त्यावेळेला.
ॐ
“श्री नामदेव गाथा महाराष्ट्र शासन” यांचे अभंग मी संगणक वर लिहिले
[१] प्रथम नमन करुं गणनाथा | असे ६ अभंग लिहिले आहेतं ते आपणं जरुर बघालचं याची मला खात्री वाटते. खाली [१] पासून [६] पर्यंत मी अभंग संगणक वर लिहिले आहेतं.
महाराष्ट्र शासन
श्रीनामदेव गाथा
ॐ
प्रथम नमन करुं गणनाथा | उमाशंकराचिया सुता |
चरणावरी ठेवूनि माथा | साष्टांगीं आतां दंडवत || १ ||
दुसरी वंदू सारजा | जे चतुराननाची आत्मजा |
वाक् सिध्दि पाविजे सहजा | तिच्या चरणवोजा दंडवत || २ ||
आतां वंदूं देवब्राह्मण | ज्यांचेनि पुण्यपावन |
प्रसन्न होऊनी श्रोतेजन | त्यां माझें नमन दंडवत || ३ ||
आतां वंदूं साधुसज्जन | रात्रंदिवस हरिचें ध्यान |
विठ्ठल नाम उच्चारिती जन | त्यां माझें नमन दंडवत || ४ ||
आतां नमूं रंगभूमिका | कीर्तनीं उभे होती लोकां |
टाळ मृदुंग श्रोते देखा | त्यां माझे दंडवत || ५ ||
ऐसें नमन करोनि सकळा | हरिकथा बोले बोबड्या बिला |
अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा | चालवी सकळां नामा म्हणे || ६ ||
श्री नामदेव गाथा
ॐ
तिळगुळ : थंडी मध्ये तिळाचा वापर थोडा जास्तचं करतातं. तिळगुळचा वापर केल्याने थंडीसाठी चांगलं असतं. बाजारातं दुकानं व हातगाडीवर रेवडी व चिकी विकण्यास आलेली आहे. मकर संक्रात पण १४ जानेवारी पासून सुरु होईल. मी घरी चिकी खूपवेळा केलेली आहे. तीळ छान खमंग भाजून घ्यावे. गुळाचा छान घट्ट पाक करावा. पाकातं तूप टाकावे, म्हणजे चिकी कुरकुरीत होते. पाक झाल्यावर पाकातं भाजलेले तीळ टाकावे. गरमचं लाकडी पोळपाटावर तूप लावून तीळ पाक एकत्र केलेले पसरावे. पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडाव्यातं.
पूर्वी खलबत्यात भाजलेले तीळ कुटुन त्यात गुळ कुटुन एकत्र करुन तुप लावून लाडु करत असतं. जिभेवर ठेवल्यावर छान गोड चव येते, व लगेचच, मऊ असल्यामुळे, खाण्यास चांगले पण वाटत. चणाडाळीच पीठ भाजुन तीळगुळ लाडु मध्ये घालून गोड मऊ तीळगुळ पोळी पण करतातं.
कुटून केलेला तिळगुळ
ॐ
श्र्लोक : मी आधी कागदावर श्र्लोक लिहिण्यास सुरुवातं केली. मग नंतर रोजनिशी मध्ये आवड म्हणून श्र्लोक लिहियाला लागले. नंतर “आज” गुरुपोर्णिमा म्हणून रांगोळी ने श्र्लोक लिहिले. नंतर आवड वाटायाला लागली.
मी रांगोळींनी भरपूर श्र्लोक लिहिले आहेत. ते पाहण्यास चांगल वाटतं.
नमुना म्हणून रांगोळीचे श्र्लोक बघावे.
रांगोळी श्र्लोक
ॐ
पुस्तकं :आमच्या घरातं श्री तुकाराम गाथा, नामदेवाची अभंग गाथा व इतरहि धार्मिक पुस्तकं आहेत. नामदेवांच्या गाथेला ३०० वर्ष पुरी झाली व संपूर्ण पुनमुद्रण हि १९५० साली झाले होते. अजूनही इ.स. १९७३ सालची पुस्तकं घरातं आहेत. बरेचं अभंग वाचून झाले. मुंबई शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात १९७० ची श्री नामदेव गाथा आमच्या घरातं आजही आहे, आता ती मात्र मी अजून वाचायची आहे.
राजर्ष्री शाहू गौरव ग्रंथ सचिवालय मुंबई २३ फेब्रुवारी १९७६ साल पुस्तक आजही आमच्या घरी आहे, हे माझे वाचून झाले. महात्मा फुले गौरव ग्रंथ जुलै १९८२ मुंबई श्री गोंदकर महाराज चरित्र (तेव्हांची किंमत १० रुपये). दुसरी व तिसरी आवृत्ती हे पुस्तक मी पूर्ण वाचलं आहे.
ह्यांचा तुळसपाणी हा कविता संग्रह महाराष्ट्रराज्य सांस्कृतिक मंडळाच्या पुढाकाराने डिसेंबर १९९३ ला प्रसिद्ध झाला, तेव्हांचे मूल्य सत्तावीस फक्त होते. तसेच नदीची वाट हे सुनीती रे. देशपांडे यांच्या कविता संग्रह पुस्तक ही छानच आहे. श्री R.Y. Deshpande यांच्या इंग्रजी कविता पुस्तक पण आहे.
संगणकची पण भरपूर पुस्तक आहेत. मी घरगुती लिखाण केलेले कागद व सकाळ मध्ये छापून आलेले माझे लिखाणं पण आमच्या घरातं आहे ईतरही पुस्तक भरपूर आहेतं.
अश्या अनेक वेगवेगळी पुस्तकांचे वाचन मनाच्या मंदिरात सरस्वतीचा वावर जागा ठेवतात.
![]() बी. एम. सी. सी. Who’s Who 2005 |
![]() BMCC Past Students’ Association – ह्यांचा फोटो |
ॐ
गणपती: कोल्हापूर येथे “महालक्ष्मी” देवळातं मंदिरातं बांधणी कोरीवकामातं साक्षीचा गणपती आहे. महालक्ष्मी देवीचं तेथील देवळामधील गणपतीच दर्शन घेतल्यावर बाहेर कोरलेल्या साक्षी गणपती च दर्शन घेतातं.
असं म्हणतात की साक्षी गणपतीच दर्शन घेतल की देव दर्शन “महालक्ष्मी” देवीच. दर्शन झाल असं म्हणतात. त्यामुळे महालक्ष्मी दर्शन घेऊन “साक्षी गणपती” च दर्शन घ्यावं . म्हणजे “महालक्ष्मी” दर्शन पूर्ण झाल. असं वाटतं.
साक्षी गणपती देवदर्शन करतातं.
साक्षी गणपती