आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 3, 2011

पुस्तकं

पुस्तकं :आमच्या घरातं श्री तुकाराम गाथा, नामदेवाची अभंग गाथा व इतरहि धार्मिक पुस्तकं आहेत. नामदेवांच्या गाथेला ३०० वर्ष पुरी झाली व संपूर्ण पुनमुद्रण हि १९५० साली झाले होते. अजूनही इ.स. १९७३ सालची पुस्तकं घरातं आहेत. बरेचं अभंग वाचून झाले. मुंबई शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात  १९७० ची श्री नामदेव गाथा आमच्या घरातं आजही आहे, आता ती मात्र मी अजून वाचायची आहे.

राजर्ष्री शाहू गौरव ग्रंथ सचिवालय मुंबई २३ फेब्रुवारी १९७६ साल पुस्तक आजही आमच्या घरी आहे, हे माझे वाचून झाले. महात्मा फुले गौरव ग्रंथ  जुलै १९८२ मुंबई  श्री गोंदकर महाराज चरित्र (तेव्हांची किंमत १० रुपये). दुसरी व तिसरी आवृत्ती हे पुस्तक मी पूर्ण वाचलं आहे.

ह्यांचा तुळसपाणी हा कविता संग्रह महाराष्ट्रराज्य सांस्कृतिक मंडळाच्या पुढाकाराने डिसेंबर १९९३ ला प्रसिद्ध झाला, तेव्हांचे मूल्य सत्तावीस फक्त होते.  तसेच नदीची वाट हे सुनीती रे. देशपांडे यांच्या कविता संग्रह पुस्तक ही छानच आहे. श्री R.Y. Deshpande यांच्या इंग्रजी कविता पुस्तक पण आहे.

संगणकची पण भरपूर पुस्तक आहेत. मी घरगुती लिखाण केलेले कागद व सकाळ मध्ये छापून आलेले माझे लिखाणं पण आमच्या घरातं आहे ईतरही पुस्तक भरपूर आहेतं.

अश्या अनेक वेगवेगळी पुस्तकांचे वाचन मनाच्या मंदिरात सरस्वतीचा वावर जागा ठेवतात.

बी. एम. सी. सी.
बी. एम. सी. सी.  Who’s Who 2005
BMCC Past Students' Association
BMCC Past Students’ Association – ह्यांचा फोटो
%d bloggers like this: