तिळगुळ !
ॐ
तिळगुळ : थंडी मध्ये तिळाचा वापर थोडा जास्तचं करतातं. तिळगुळचा वापर केल्याने थंडीसाठी चांगलं असतं. बाजारातं दुकानं व हातगाडीवर रेवडी व चिकी विकण्यास आलेली आहे. मकर संक्रात पण १४ जानेवारी पासून सुरु होईल. मी घरी चिकी खूपवेळा केलेली आहे. तीळ छान खमंग भाजून घ्यावे. गुळाचा छान घट्ट पाक करावा. पाकातं तूप टाकावे, म्हणजे चिकी कुरकुरीत होते. पाक झाल्यावर पाकातं भाजलेले तीळ टाकावे. गरमचं लाकडी पोळपाटावर तूप लावून तीळ पाक एकत्र केलेले पसरावे. पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडाव्यातं.
पूर्वी खलबत्यात भाजलेले तीळ कुटुन त्यात गुळ कुटुन एकत्र करुन तुप लावून लाडु करत असतं. जिभेवर ठेवल्यावर छान गोड चव येते, व लगेचच, मऊ असल्यामुळे, खाण्यास चांगले पण वाटत. चणाडाळीच पीठ भाजुन तीळगुळ लाडु मध्ये घालून गोड मऊ तीळगुळ पोळी पण करतातं.
कुटून केलेला तिळगुळ