श्री नामदेव गाथा
ॐ
“श्री नामदेव गाथा महाराष्ट्र शासन” यांचे अभंग मी संगणक वर लिहिले
[१] प्रथम नमन करुं गणनाथा | असे ६ अभंग लिहिले आहेतं ते आपणं जरुर बघालचं याची मला खात्री वाटते. खाली [१] पासून [६] पर्यंत मी अभंग संगणक वर लिहिले आहेतं.
महाराष्ट्र शासन
श्रीनामदेव गाथा
ॐ
प्रथम नमन करुं गणनाथा | उमाशंकराचिया सुता |
चरणावरी ठेवूनि माथा | साष्टांगीं आतां दंडवत || १ ||
दुसरी वंदू सारजा | जे चतुराननाची आत्मजा |
वाक् सिध्दि पाविजे सहजा | तिच्या चरणवोजा दंडवत || २ ||
आतां वंदूं देवब्राह्मण | ज्यांचेनि पुण्यपावन |
प्रसन्न होऊनी श्रोतेजन | त्यां माझें नमन दंडवत || ३ ||
आतां वंदूं साधुसज्जन | रात्रंदिवस हरिचें ध्यान |
विठ्ठल नाम उच्चारिती जन | त्यां माझें नमन दंडवत || ४ ||
आतां नमूं रंगभूमिका | कीर्तनीं उभे होती लोकां |
टाळ मृदुंग श्रोते देखा | त्यां माझे दंडवत || ५ ||
ऐसें नमन करोनि सकळा | हरिकथा बोले बोबड्या बिला |
अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा | चालवी सकळां नामा म्हणे || ६ ||
श्री नामदेव गाथा