आपले स्वागत आहे!

श्री चक्र

श्री चक्र किंवा श्री यंत्रात एका बिंदू भोवती नऊ त्रिकोण एकमेकात जोडलेले असतात. मधला बिंदू भौतिक जग आणि जे आकारात नाही (अव्यक्त) यांना जोडणारा संगम आहे असे मानतात. हा बिंदू श्री देवी ललीता महात्रिपुरसुन्दरीचा (पार्वती देवीचा एक अवतार) प्रतिक मानतात. चार त्रिकोणांची दिशा वरती असते आणि ते शिव किंवा पौरुष्य दर्शवतात. पाच त्रिकोणांची दिशा खाली असते आणि ते शक्ती किंवा स्त्रीत्व दर्शवतात. नऊ त्रिकोण असल्यामुळे ह्या यंत्राला नवयोनी चक्र असेही म्हणतात.  नऊ जोडणाऱ्या त्रिकोणांच्या आत ४३ छोटे त्रिकोण असतात व हे संपूर्ण विश्वाचे प्रतिक मानतात. तसेच ह्या चक्राला सृष्टीची कोख असेही प्रतीकारूपी मानतात.

मी “श्री चक्र”  देवळातं कोरलेले  पाहिले. मला ते खूप काढावे वाटले. मी पुस्तक आणले. व पाहून काढण्यास शिकले. यावयाला लागले आवड निर्माण झाली. रोज कागदावर काढू लागले. मग एवढे काढले की ओळखीच्या लोकांना दिले नातेवाईक यांना दिले. अधीक महिना आला तेंवा पुजारीबाई यांच्याकडे १० श्री यंत्र कागदावर काढून दिले. सर्वांना देवळातं आवडले. मी मध्येच दर्शानासाठी गेल तर पुजारीबाई म्हणाल्या आज यंत्र आणले नाही? मी परत १०,१० अशी श्री यंत्र दिली. मला अधीक मास! याचं आपण कांहीं केलं याचं मनाला समाधान हलकं वाटलं त्यावेळेला.

sri chakra1 sri chakra3JPGsri chakra2

Comments on: "श्री चक्र" (2)

  1. थोडक्यात पण चांगली माहिती धन्यवाद


  2. मी काढलेले “श्री यंत्र ”

    पुढारी
    दैनिक अंक मध्ये छापून आले आले आहे .
    सोमवार ८ जानेवारी २००७ वर्ष ६९ कोल्हापूर अंक
    मध्ये आलेआहे छापून .

Leave a reply to Vasudha S. Chivate उत्तर रद्द करा.