आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 11, 2011

आठवणींचा अल्बम

आठवणींचा अल्बम : सुनीला करंबळेकर…. आजवर अनेक मालिकांमध्ये नकारार्थी भूमिका साकारलेली ही गुणी अभिनेत्री. परंतु प्रत्यक्ष जीवनात ती किती संवेदनशील, भावनिक आहे हे तिच्या फोटोग्राफितून कळतं. शुटींगच्या निमित्तानं बरचं फिरणं होतं. त्यातून तिला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली.

तिचं वेगळेपण म्हणजे तिला ‘फूड फोटोग्राफी’ करायला आवडते. आपल्या या आवडीबद्दल सुनीला म्हणते, “लोकांना वेगवेगळ्या खाद्दपदार्थाची चव चाखायला आवडते. मला मात्र वेगवेगळ्या खाद्दपदार्थांचे फोटो काढायला आवडतात. समोर एखादं सफ़रचंद जरी दिसलं तरी मी त्याचा फोटो काढते.. मला निसर्गातील देखावेही ‘कॅप्चर’ करायला आवडतात. याशिवाय मला माणसांचे नैसर्गिक हावभाव टिपायलाही आवडतं.” एखाद्या माणसाच्या नकळत फोटो काढला तर त्याचे त्याचे खरेखुरे हावभाव टिपता येतात, असं सुनीला मानते.

हे लिखाणं मस्त भटकंती दिवाळी २०१० मध्ये आहे. संपादक : मिलिंद गुणाजी आहेत.

सुनीला करंबळेकर

सुनीला करंबळेकर

%d bloggers like this: