आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 15, 2011

मकर संक्रांत

संक्रांत सण १४ जानेवारी पौंश महिना पासून ते माघ रथसप्तमी पर्यंत असतो. हया महिनात सवाष्णी बायका मंगळवारी ५ घरी जोगवा मागतातं व त्याचं शिजवुन अन्न खातातं. संक्रात म्हणुन वाणं (लुटणं) पण करायची पद्धत आहे. काळ्या रंगाला फार महत्व आहे. साडी घेतातं.

पंतग : २१ डिसेंबर २०१० आग्रहायणी, उत्तरायनारंभ, मकरायन २९|०८ सौर शिशिर ऋतु प्रारंभ होतो. यंदा अधिक महिना (मासं) आल्यामुळे मकर संक्रांत १५ जानेवारी ला आली  आहे. भोगी १४ जानेवारी ला आली आहे. संक्रांत सण म्हणजे तिळगुळचा सण. तसेचं पतंग उडविण्याचा सण. गल्लोगल्ली मूले व माणसं पण पतंग उडविताना दिसतातं. आकाशातं खूप उंच पतंग गेला की हातातल्या मांजाला पण हातात जडपणा येतो. मी व आमची मूले शाळेत असतानां शेजारच्या पटांगणातं खूपवेळा पतंग उडवित असूं मी पण त्यात भाग घेतं असे. खूपच चांगलं वाटत होत. त्यावेळा पतंग मांजाच सूत मी व मूल घरीच बनवतं होतो. सूत नीट झालं की पतंग पण छान उंच उडतो. याचा चांगलाच अनुभव आहे. त्या वेळेसची भिंगरी आजही घरात आहे.

पतंग : पतंग उडविण्याकारीतां गच्चीवर, मैदान, बाग यथे लोक जमा होतातं. राजस्थान येथे गर्दी असते. अहमाबादचे प्रसिद्ध पतंगपटू रसूभाई रहिमभाई यांनी एकाच माज्यानं ५०० पतंग उडवून दाखविले. तेंव्हापासून दरवर्षी अहमदाबाद येथे पतंग महोत्सव भरतं आहे. देशी परदेशी पाहुणे, पतंग निर्माते आणि पतंगपटू या महोत्सवाला आवर्जुन उपस्थित राहतातं.

घरातली भिंगरी

घरातली भिंगरी

%d bloggers like this: