सूर्यमंदिर
ॐ
सूर्यमंदिर: मोढेरा – मेहसानापासून २५ कि.मी. अंतरावर पुष्पावती नदीकाठी, इ.स. १०२६ मध्ये सोलंकी वंशाच्या राजा भीमदेव याने हुबेहूब कोणार्क सूर्य मंदिरासारखंच हे मंदिर बांधलं. स्कंदपुराण व ब्रह्मपुराणानुसार मोढेराच्या आजूबाजूचा परिसर ‘धर्मारण्य’ नावानं ओळखला जायचा. सूर्यमंदिराची रचना अशी आहे, की सकाळची सूर्याची किरणं थेट मंदिरातील सूर्याच्या मूर्तीवर पडतात. दरवर्षी जानेवारीमध्ये तिथं ‘मोढेरा डान्स फेस्टिवल’ आयोजित केला जातो.
गुजरातच्या धार्मिक इतिहासात अहमदाबाद मधील हनुमान मंदिर, छोटीला गावातील चामुंडा मंदिर, नादीयादमधील संत संतराम मंदिर, साबरकटा जिल्ह्यातील शामलाजी मंदिर यांचं महत्वही खूप मोठं आहे. काळाची पानं उलटताना असं लक्षात येतं, की आपली मंदिर ही केवळ देवस्थानं नाहीत; तर ती सामाजिक, आध्यात्मिक, उत्थानाची केंद्रं ही आहेत. आपल्या अतूट अंग आहेत. त्यामुळेच हे संचित, हा समृध्द वारसा जपायला हवा.
आज १९/०१/२०११ ला शाकंबरी पौर्णिमा असली तरी पौंश महिन्यात सूर्य याला महत्व दिल्या मुळे आज सूर्य मंदिर लिहिले आहे.
‘मस्त भटकंती’ (ऑगस्ट २०१०) मध्ये लिखाण आहे.
सूर्यमंदिर