आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 23, 2011

सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस : ज्याच्या सावलीचाही इंग्रजांनी धसका घेतला होता, अशा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आज जन्मदिन. दि. २३ जानेवारी १८९७. रोजी कटक येथे त्यांचा जन्म झाला.

आय.सी.एस. सारखी सर्वोच्च पदवी घेतली. सत्ता, संपत्ती लाथाडून स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाला. प्रथम देशबंधू चित्तरंजन दास आणि पुढे गांधीजी च्या कार्यात सुभाषचंद्र बोस मग्न राहिले. काँग्रेसचे ते दोन वेळा अध्यक्ष झाले. दुसऱ्या महायुध्याचा फायदा घेत, आंतरराष्ट्रीय सहकार्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न गौरवास्पद आहेत. १९४१ ते ४४ या कालावधीत साक्षात काळाशी टक्कर घेत त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा जरी घेतला, तरी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ते एक सुवर्णपान होते, हे ध्यानी येते.

Subhas Bose   पुस्तकं

सुभाषचंद्र बोस                                                        पुस्तकं

%d bloggers like this: