आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 24, 2011

‘श्री घृष्णेश्वर’

आजच्या आधुनिक जगात स्थापत्य कलाशास्त्राचा उत्कृष्ट नमुना ठरावा असे वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग ‘श्री घृष्णेश्वर’ आहे. वेरुळ येथे या ज्योतिर्लिंगाबरोबरच, लक्ष विनायक हे देवस्थान आहे. पर्यटनदृष्ट्या महत्व लाभलेले हे गाव नैसर्गिक वानराई, डोंगराच्या कुशीत वसले आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांना निसर्गाचे आल्हाददायक अनुभवावयास मिळते. वेरुळ येथील ‘श्री घृष्णेश्वर’ हे बारावे व शेवटचे ज्योतिर्लिंग असल्याने, या ठिकाणी ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होते. याबाबत पौराणिक ग्रंथांमध्ये माहिती आढळते, याचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण रामायण, महाभारत या ग्रंथांमध्ये आढळतो.

श्री घृष्णेश्वर मंदिर लाल दगडात बांधलेले असून, आकर्षक कोरिव काम करण्यात आले आहे. सभामंडप २४ खांबांवर आधारलेला आहे. लिंग पूर्वाभिमुख आहे. या मंदिराचे काम सन ७५० मध्ये राष्ट्रकुल घराण्यातील दन्तदुर्ग यांनी सुरु केले. वेरुळ येथे मंदिर विश्वस्त मंडळातर्फे धर्मशाळेचे काम सुरु आहे. वेरूळ येथे जगप्रसिध्द वेरूळ लेण्या आहेत. ऐतिहासिक स्मारक, शहाजीराजे भोसले यांची गढी आहे. दोन दिवस निवांतपणे दर्शन व पर्यटन करण्यासारखे हे स्थळ आहे.

|| देवस्थान विशेषांक सकाळ || मे २००२

'श्री घृष्णेश्र्वर'     Ghrishneshwar

‘श्री घृष्णेश्वर’

Grhishneshwar_Temple

%d bloggers like this: