आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 25, 2011

चतुर्भुज मंदिर

चतुर्भुज मंदिर – ग्वाल्हेर हे मध्यप्रदेशातिल एक प्रमुख शहर असून बराच काळ शिंदे राजघराण्यानं तिथं राज्य केलं. हे शहर एकेकाळी गोपाद्री किंवा गोपाचल म्हणून प्रसिध्द होतं. तिथं शिंदे यांनी एक भव्य किल्ला बंधला आहे, या किल्लात बरीच छोटी-मोठी मंदिरं आहेत. त्यातील सर्वात उल्लेखनीय आहे ते चतुर्भुज मंदिर. किल्ल्याच्या पूर्व दिशेला असलेलं हे विष्णुचं मंदिर त्यातील दगडी शिळ्पासाठी प्रसिध्द आहे.

नगरभट्ट राजाच्या नातवानं ८७५ साली हे मंदिर बांधलं. या मंदिरात बरेच संस्कृत भाषेतील शिलालेख सापडतात. या किल्ल्यात या मंदिराशिवाय सास-बहू मंदिर, तेलीका मंदिर अशी छोटी मंदिरं हि आढळतात.

chaturbhuj-temple

चतुर्भुज मंदिर

%d bloggers like this: