आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 31, 2011

भारतीय झेंडे

हा आहे छोटासा भारतीय झेंड्याचा इतिहास…


हा झेंडा पहिल्यांदी ७ ऑगस्ट १९०७ साली पारसी भागन चौक, कलकत्ता येथे फडकाविला होता.

हा झेंडा “सप्तरुशी झेंडा” ह्या नावाने ओळखला जातो. हा झेंडा पहिल्यांदी स्टूट्गारट मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेस मध्ये २२ ऑगस्ट १९०७ ला फडकाविला होता.

हा झेंडा डॉ. एनी बेझंट आणि लोकमान्य टिळक ह्यांच्याशी संबधित आहे. हा झेंडा कलकत्ता येथे “Home Rule Movement” च्या वेळेस काँग्रेस अधिवेशनात फडकाविला होता.

आंध्र प्रदेशातल्या एका तरुणाने खालील झेंडा महात्मा गांधीना प्रस्तुत केला होता. गांधीजींच्या मतानुसार ह्यामध्ये पंधरा रंग वा चरखा घालण्यात आला.

हा झेंडा १९३१ सालच्या आखिल भारतीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात प्रस्तुत केला होता. परंतु तो सर्वांना मान्य न झाल्याने स्वीकृत झाला नाही.

ऑगस्ट ६, १९३१ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ने खालील झेंडा अधिकृत स्वरुपात मान्य केला व तो पहिल्यांदी ३१ ऑगस्टला फडकविण्यात आला.

आपला राष्ट्रीय झेंडा. ह्याचा जन्म जुलै २२, १९४७ ला झाला. जवाहरलाल नेहरूंच्या शब्दात – “आता मी तुम्हाला फक्त प्रस्ताव नाही तर झेंडा प्रस्तुत करतो”. हा झेंडा सर्व प्रथम कौन्सिल हाउस वर १५ ऑगस्ट १९४७ साली फडकविण्यात आला.
%d bloggers like this: