ॐ
गोलकोंडा किल्ला : सुभान अल्ला
मिनारंचं शहर म्हणून प्रसिध्द असणाऱ्या हैदराबाद (हैद्राबाद) शहराच्या शाही वैभवाचं आकर्षण सर्वांनाच मोहवतं. अंदर प्रदेशातील या हैदराबाद शहराला जगभरातून अनेक पर्यटक भेट देतातं. विशेषत: चार मीनार व गोलकोंडा किल्ल्यासाठीच! मिनार म्हणजे उंच व अरुंद अशा इमारती असतात व त्यांच्या गच्चीतून मुस्लिम धर्माचे भाऊबंद नमाज पढण्यासाठी बांग देतात. एका अर्थी मिनार म्हणजे इतिहासदर्शक स्तंभच. गोलकोंडा किल्ल्याच्या दिशेनं जाताना मुघलकालीन इतिहासाच्या पाऊल खुणा स्पष्ट दिसतात. दगड, माती व चुना यापासून बनवलेलं हे बांधकाम पक्कं नसलं तरीही कच्चही नाही. म्हणून तर चारशे वर्षे दिमाखात उभा असलेला गोलकोंडा किल्ला पर्यटकांना सदैव साद घालतो. सात कि.मी. परिघात विस्तारलेला गोलकोंडा किल्ला कंगोरीदार तटबंदीनं वेढलेला आहे. अनेक टेकड्यांवर वसलेल्या, वेगवेगळ्या शाही घुमटांनी, वास्तुंनी, मीनारांनी सजलेलं ते सुंदर निवास /व्यापारी संकुल हाहे. आत एक मंदिर आणि मशिदही आहे.
त्याकाळी नाणी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी टांकसाळही आत आहे.परंतु सध्या तिथे पुरातत्व विभागाचं ‘खजाना’ संग्रहालय आहे.वायव्य दिशेला कुतुबशाही घुमट असून पोकळ जामिनीवर,चौकोनी ओट्यावर थडगी आहेत वर गोल घुमट (DOMES) आहेत. नक्षीदार कमानी , झुंबर काचेची कलाकुसर या रुपानं त्या काळची समृध्दी आजही जाणवते.
हा किल्ला काळाच्या दोन पावलं पुढेच होता याचा प्रत्यय येतो किल्ल्याजवल येय्ताच लगेच किल्ल्याचं महाव्दार दिसणार नाही अशी नागमोडी वाट आहे, जी सोरक्षिततेसाठी आवश्यक होती.प्रवेशव्दार उंच असून त्यावर धातूचे अणकुची दार खिळे लावलेले आहेत.काल्ल्याता एका घुमटा खालील खोदाकानाता सुंदरा ‘ उन्हाळी घर ‘ आहेत. आपण ‘रेन VOTARA हार्वेस्टिंग’ च्या गोष्टी करतो. किल्ल्यात मात्र त्या काळी तशी टाकी होती.दरवाजातून आता शिरताच एका दगडी फरसबंदी आहे. तिला ‘बरामदा’ म्हणतात. तिथे नवागताला उभं राहण्यासाठी एक चौथरा आहे.
तिथे उभं राहून टाळी वाजवली तर ती ४५० फूट उंचीवरील बारादरितिल बुरुजात ऐकू येते.आल्याची वर्दी काही सेकंदात ४५० फुट उंचीवर जाई पाहुणा स्वागतयोग्य आहे, आगंतुक आहे,की त्या नवागतापासून प्रजेला धोका आहे हे जानण्यासाठी ती आवधागिरी होती. तीनशे साठ(३६०) पायऱ्या न चढता पूर्व सुचना द्दायची व्यवस्था होती. कृष्णा व तुंगभद्रा या दोन नद्दां च्या पाण्यानं सधन सुपीक झालेला हा भाग अनेक राजाम्मध्ये गोलकोंडा वर कब्जा करण्याची इच्छा व युध्द असे.पण हा किल्ला जिंकता आला नाही.
मी शाळेत असतानां गोलकोंडा, गेंडीपेट, चारमिनार, म्युझिअम पहिलेले आहे.
गोलकोंडा चारमिनार
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...