आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 1, 2011

चिंचेचं झाड

चिंचेची झाडे: प्रत्येक खेड्यापाड्यात सदाहरित सदापल्लवित म्हणून पाहावयास मिळतात. या झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खेड्यामध्ये चवीने खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. या वृक्षाची उंची ७० ते ८० फुट इतकी असते. काही झाडे शंभर फुट पर्यंत ही वाढतात.याचा आकार चौफेर असून, घाटदार असतो. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. चिंचेची झाड कोणत्याही हवामानात पोसले जाते. त्याची वाढ होण्यासाठी कमीतकमी पाणी लागते. दुष्काळी भागात किंवा स्वतंत्र शेती करावयास हरका नाही. या झाडाला आयुष्यही भरपूर असते. या वृक्षाची लागवड डोंगरी ,माळरानं जमिनीत करावयास हरकत नाही.

चिंचेचं झाडं: चिंच म्हंटल की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. व लगेचच आंबट गोड चव आल्यासारखी वाटते. चिंच मी शाळेत असतांना मैत्री नी बरोबर आवळे बोर विकतं घेत असू. त्यावेळेला खाली बसूनच टोपलीत आवळे बोर चिंच विकायला लोक बसतं असतं. आता शाळे समोर हातगाडीवर आवळे बोर पेरु चिंच मीठ लावून विकायला मिलतातं. मी बाजारात जातानां शाळा पण दिसतातं मूल ही खेळतांना व चिंच व पेरु घेतांना खातांना दिसतात. भाजी बाजार किराना सामान माल येथे पण बिया असलेली व बिया काधलेली चिंच मीळते.

चिंच स्वंयपाक करताना भरपूर प्रमाणात. वापर करतातं. आमटीत चिंच पाण्यात घालून गर घालतातं. चिंच वापरुन दाण्याची चटणी करतांना चव एकदम छान लागते.पाणी थोड वापरलं की चटणी रसरसीत भाकरी पोळी बरोबर खातांना लाल तीखट करुन नुसतं मीठ व चिंच हिरवी व मध्ये लाल असलेली चिंच वापरुन पाण्याचा हात देऊन पाटावर पूर्वी आम्ही वाटतं असू. होतो. आता ही आमच्या कडे पाटा वरवंटा आहे. वर्षभर राहिल असा ठेसा पण करुन ठेवातातं. मीठ चिंच लावून ऊन्हातं वाळवुन चिनी मातीच्या बरणीतं भरून ठेवतातं. झाडं लावां झाडं वाढवां व प्रदुषण स्वच्छ ठेवा.

चिंचे चे झाड

चिंचेचे झाड

%d bloggers like this: