आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 2, 2011

दशमी

दशमी : साहित्य : ज्वारीच पीठ चणाडाळीचं पीठ कणीक सर्व पीठ घेऊन त्यात आवडीनुसार तिखट, मीठ, लसुन बारीक वाटून घालावा, व हळद, हिंग, तीळ, ओवा, जिरे वाटल्यास कांदा किसुन पाणी न काढतां घ्यावा थोड कच्च तेल घालावे. सर्व साहित्य काद्द्य एकत्र करुन मिसळुन एकत्र गोळा करावां. पोळपाटावर थोडसं ज्वारीच पीठ घालून थापावं किंवा लाटण्यान पसराव. पीठ लावलेल्या बाजुनेच तव्यावर घालावे. दुसरी बाजु भाजुन घ्यावी. दोन्ही बाजुंना तेल लावावे. फार लाल भाजु नये.नाहीतर कडक होण्याची शक्यता असते. मऊ खुशखुषितं खाण्यास चांगल लागत. दोन चार दिवसं पण चांगल तिकतात. दाण्याच्या चटणी वर तेल घालून खाण्यास चांगल लागतं. प्रवासातं पण नेता येतातं. घरी दही लोणी बरोबर किंवा सांबार बरोबर पण खाण्यास कांहीच हरकतं नाही.

थापलेली दशमी    तयार दशमी

थापलेली दशमी                                        तयार दशमी

%d bloggers like this: