आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 6, 2011

१०१ वा ब्लॉग

गेल्या नोव्हेंबर मध्ये सुरु केलेल्या ह्या वसुधालय ब्लॉग मध्ये १०० (शंभर) पोस्ट झाली. शंभराव्या पोस्ट वर महालक्ष्मी किरणोत्सव दाखाविले आहे.  ते सर्वांनाचं पाहण्यास  मिळेल.

वसुधालय नावाच्या ह्या ब्लॉग मध्ये, वसुधालय हे कवितांचे पुस्तक प्रसिद्ध झाले होते या मधील कविता खाली लिहिली आहे. हा  १०१ (एकशे एक) वा ब्लॉग पोस्ट आहे. वसुधालय मधील कविता सर्वांना नक्कीचं आवडेल!

२९.   नैसर्गिक

टप टप टप |  पायस पडति
पट पट पट  | प्राशित धरति

सप सप सप | अंकुर लवति
पस पस पस | पसेहि भरति

सन सन सन | किरण वावरे
नस नस नस | सलिंल मोहरे

घम घम घम | सुगंध सुखावे
मिट्ट मिटकीचा | कवळ खुळावे

मधु मधु मधु | अति कोमलता
वद वद वद | जिव्हे भगवंता

वसुधालय

वसुधालय

प्रकाशक: नयना पब्लिकेशन

हे पुस्तक मराठी साहित्य संस्कृती मंडळाकडून सन्माननीय अनुदान मिळाल्या वर प्रसिद्ध झाले आहे.

%d bloggers like this: