आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 9, 2011

दिल्ली

काल माघ शुक्ल ५, पंचमी शके १९३२ भारतीय सौर माघ १९, शके, वसंत पंचमी झाली आहे. ८ फेब्रुवारी २०११ तारीख ला झाली आहे. त्या दिवशी सरस्वती व लक्ष्मी यांची पूजा करतातं

सरस्वती लक्ष्मी ची पूजा

सरस्वती लक्ष्मी ची पूजा

देल्ही, किंवा आम लोक म्हणतात दिल्ली ही भारताची अधिकृत राजधानी आहे.दिल्ली चे चौरस क्षेत्रफळ हे भारतातील सर्व मोठ्या शहरांमध्ये जास्त आहे. साधारण १.२ कोटी लोक दिल्लीत वास्तव्य करतात. जनसंख्ये च्या दृष्टीने दिल्ली हे भारतात दुसर्या क्रमांका चे शहर आहे व जगात आठव्या क्रमांका वर आहे.

यमुना नदीच्या तिरी बसलेले हे शहर नेहमीच लोकांच्या वास्तव्य मुळे ओजस्वी झाले आहे. असे मानतात कि सुमारे ४००० वर्षांपासून ह्या शहरामध्ये लोक वास्तव्य करत आहेत. दिल्ली हेच पांडवांची राजधानी शहर इंद्रप्रस्थ होथे असाही समज आहे. दिल्ली शहरात अनेक पुरातन स्मारके व पुरातत्त्व स्थाने आहेत, त्यातील काही – कुतुब मिनार, लाल किल्ला, हुमायून ची कबर, जामा मस्जिद. इतर बघण्या सारखी ठिकाणे म्हणजे – इंडिया गेट, बिर्ला मंदिर, नवे अक्षरधाम मंदिर, राष्ट्रपती भवन, लोकसभा वगैरे.

कुतुब मिनार चा फोटो खाली दाखविला आहे. दक्षिण दिल्लीत मेहरौली मध्ये उत्ब-उद-दिन ऐबक ह्याने दिल्लीवर १२०६ मध्ये कब्जा केल्यानंतर बांधला. मिनाराची उंची ७२.५ मीटर आहे आणि ह्यावर किचकट कोरीव काम करण्यात आले आहे. कुतुब मिनार चे महत्व म्हणजे, हे भारतात मुस्लीम संस्कुतीच पहिलं स्मारक आहे व नव्या पद्धतीच्या बांधकामाची व कलेची सुरवात आहे.

DSCF0424        DSCF0423DSCF0425

दिल्ली भारताची राजधानी: येथील कला कौशल्य व कोरीव काम पाहण्यासारखे आहे.

%d bloggers like this: