आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 12, 2011

कोथींबीर वडी

कोथींबीर ची वडी : कोथींबीर चांगली धूवुन घ्यावी. बारीक चिरावी. कोथींबीर मध्ये चणाडाळीचं (हरबराडाळीचं) पीठ तिखट मीठ हळद हिंग व कच्च तेल घालावे. पाणी घालून थोडसचं पातळ करावे. कुकर च्या डब्याला कच्च तेल सगळी कडुन आतून तेल लावल्यावर सर्व एकत्र कोथींबीर एकजीव एकत्र केलेल पीठ डब्यातं घालावं. कुकर पाणी घालून मध्ये ठेवून कुकरला शिट्टी लाऊ नये छान खूप कुकरला झाकणं लावून वाफ भरपूर आणून घ्यावी. कुकर बंद करुन गार झाल्या नंतर कुकर चे झाकण काढून उकडलेलं कोथींबीर चा डबा बाहेर काढून कोथींबिरचं एकत्र केलेल सर्व गार करुन नंतर पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडाव्यातं. फोडणी व खोबर घालावं. गरम किंवा गार खाल्लं तरी चालतं. व तसं कांही दिवस पण राहत.

कोथींबीर ची वडी सोडा न घातल्यामूळे चव पण चांगली व मऊ हलकी तोंडातं ठेवल्यावर चांगली लागते. चव येते.

कोथींबीर वडी

कोथींबीर वडी

%d bloggers like this: