आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 18, 2011

आधाररहित महाकाय सभागृहं

अबू पर्वत येथील वैश्र्विक शांती सभागृह : हुबळी नदीवरील हावडा ब्रिज असो,किंवा नर्मदेवरील ओंकारेश्र्वरय्र्थिल सेतू असो. या वास्तुंची निर्मिती आगळी-वेगळीच म्हणायला हवी. कारण वास्तू स्थापत्यशास्त्रानुसार सेतू वा प्लॅटफॉर्मवर पडणाऱ्या संभाव्य वजनाचा तोल साधण्यासाठी खाली (Pillars) भक्कम टेकू ठेवले जातात परंतु या ठिकाणी मात्र एखाद्दा ताणलेला दोरीप्रमाणे पुलाच्या दोन्ही टोकांकडील भक्कम खांब साऱ्या तुल्यांचा भार समर्थपणे पेलू शकतात.

विज्ञानाच्या नेहमीच्या मांडलेल्या आकडेवारीपेक्षा वेगळी पध्दत तिथं अंमलात आणून मानवी चमकृती दाखविली जाते. अगदी याचा पध्दतीन विज्ञानाची चाकोरीबाहेरची गणितं मांडून आधाराशिवाय दुमजली महाकाय सभागृहं बांधण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली गेली. चेन्नई (तामिळनाडु, मद्रास) शहराच्या मध्यवर्ती भागात, राजस्थानमधील अबू पर्वतस्थळी व अबू पर्वताच्या पायथ्याशी ही महाकाय सभागृहं असून तिथं ज्ञान प्रचार, प्रसाराची वैचारिक देवाणघेवाण आदींची महत्वपूर्ण कार्य चालतात.

श्रोत्यांना मधल्या खांबांचा अडसर वाटू नये व समोर व्यासपिठावर चाललेले कार्यक्रम सहज पाहता व ऐकता यावेत हे यामागिल मुख्य उद्दिष्ट असावं.

मस्त भटकंती जानेवारी २०११ मैत्रय मधील लिखाण आहे.

वल्लुवर कोट्टम् सभागृह (चेन्नई) व वैश्र्विक शांती सभागृह (अबू पर्वत, राजस्थान)ध्यान लिंग कोईमतुर व कोल्हापूर येथे बिनखांबी गणपती येथे असेचं बांधकाम आहे.

अबू पर्वत येथील वैश्र्विक शांती सभागृह

अबू पर्वत येथील वैश्र्विक शांती सभागृह

%d bloggers like this: