आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 23, 2011

मातृभाषेतून शिक्षण

कोल्हापूर ता. ४ : मातृभाषेतून शिक्षण ही आजदेखील निकड आहे, असे प्रतिपादन श्रीमती माईसाहेब बावडेकर यांनी आज येथे केले.

त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त विशेष मुलाखत देताना त्या बोलत होत्या. शासकीय अनुदान न घेता गेली पन्नास वर्षे शिखण संस्था चालाविणाऱ्या माईसाहेब म्हणाल्या ‘शासनाचे नियम आम्हालाही पाळावे लागतात. आम्ही काहीं नवीन गोष्टी करायला लागलो तर ते काहीं शासकीय अधिकाऱ्यांना आवडत नाही. इंग्रजीची आवश्यकता मलाही पटते, परंतु मातृभाषेतून शिखण आजही हवे, असा माझा आग्रह आहे. आता शासनालाही बाल शिक्षणाचं महत्व पटलेलं आहे.त्या दृष्टीनं हालचाली सुरु आहेत. वास्तविक हायस्कूल काढायचा माझा बेत नव्हता. पण पालाकांच्या आग्राहामुळे माझ्या अनिच्छेतून हायस्कूल झालं.याचं सारं श्रेय पालक, हितचिंतक, सांतारामबापू वालावलकर यांना मी देते.

आमच्या शाळेचं उद्घाटन झालं पंतप्रधानांच्या हस्ते. संस्थानीं शामियाना उभारला होता. त्यावेळी विद्दापिठाची बालवाडी होती. पण ती फरशी ठाउक नव्हती.

हे लिखाण पान ६ सकाळ रविवार, ५ जानेवारी १९९७ मधील आहे.

श्रीमती माईसाहेब बावडेकर

श्रीमती माईसाहेब बावडेकर

%d bloggers like this: