आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 24, 2011

व्दारका

व्दारका – भारतातील चार धाम म्हणजेच काशी, पुरी, रामेश्र्वर व व्दारका. व्दारका म्हणजे श्रीकृष्णाची नगरी. श्रीकृष्णाचं इथलं प्रसिध्द मंदिर समुद्राकाठी वसलेलं आहे.मुख्य देवालय ५ मजली असून ७२ खांबांवर उभं आहे. या मंदिरास ‘ जगत् मंदिर ‘ किंवा ‘ निजमंदिर ‘ असंही म्हणतात. सध्याचं देऊळ सोळाव्या शतकातलं असून मूळ देऊळ कृष्णाचा पणतू वज्रनाथ याने बांधल्याचा उल्लेख सापडतो.

मंदिरात, कलाकुसरीनं सजलेले साठाहून जास्त खांब आहेत.गुप्त, पल्लव व चावडा वंशांचा प्रभाव त्या कलाकुसरीवर दिसून येतो.

या मंदिराच्या शिखरावरील ध्वजाचा रंग जरी सारखा बदलला जात असला, तरी चंद्र व सूर्याची प्रतिमा सर्व ध्वजांवर कायम आहे.

व्दारका : माझ्या आजीने माझ्या बहिण(कमलताई) बरोबर व्दारका पाहिली आहे. तसेच माझी सौ आई व सौ काकू यांनी पण व्दारका पाहिली आहे. माझी बहीण आज ही व्दारका पाहिल्या बद्दल सांगते.

व्दारका मंदिर

व्दारका मंदिर

%d bloggers like this: