आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 25, 2011

इएम्इ मंदिर

इएम्इ मंदिर – बडोदा शहरात असलेलं हे जरा वेगळ्या प्रकारचं शंकराचं मंदिर. याची पूर्ण देखभाल भारतीय सेना करते. याची रचना व संकल्पना पारंपरिक रचनेपेक्षा खूपच वेगळी असून या मंदिराचं छप्पर व भिंतीवरील आवरण येल्युमिनिमच्या डीझाइनयुक्त पत्र्यानीं झाकलेलं आहे.’सर्वधर्मभावा’ चं प्रतीक असलेलं हे मंदिर १९६६ साली बांधल गेलं. या मंदिरात पाच मुख्य धर्माचं अस्तित्व वेगवेगळ्या चिन्हांच्या द्वारे दाखविलं आहे. शिखरावरील कळसात हिंदू धर्म, घुमटात इस्लाम,मनोऱ्यात ख्रिस्ती, मनोऱ्यावरील सोनेरी वस्तूत बौध्द व प्रवेशद्वावर जैन धर्माची चिन्हं दिसतात. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात उत्खानानाता सापडलेल्या मूर्तीची नीट रचना करून,त्या देवळाच्या वाटेवर मांडलेल्या आहेत. यातील काही मूर्ती सहाव्या शतकातील आहेत.

मंदिरात शंकर ‘दक्षिणामूर्ती’ म्हणजेच दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत. ही मूर्ती जगाला संदेश देणाऱ्या जगद्गुरुच्या रुपात आहे.

इएम्इ मंदिर

इएम्इ मंदिर

%d bloggers like this: