श्रीरामदासनवमी
ॐ
श्रीरामदासनवमी शके १९३२ माघ कृष्णपक्ष ला आहे. २६.०२.२०११ शनिवार ला तारखेनी आहे. श्री. रामदासांनी रचलेली ही गणपतीची आरती.
श्री गणपतीची आरती
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ||
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||
जय देव जय देव जय मंगल मूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || धृ. ||
रत्नखचित फरा गौरी कुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ||
हिरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरें चरणीं घागरिया || जय. ||
लंबोदर पितांबर फणिवरवंधना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणीं रक्षावे सुरवरवंदना ||
जय देव जय देव जय मंगल मूर्ती || ३ ||
गणपती श्रीरामदासस्वामी