आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 27, 2011

जागतिक मराठी भाषा दिन

२७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमितं ह्यांची एक मराठीतील ही जुनी कविता खाली लिहिली आहे. ही स्वागत कविता ६५ व्या अखिल भारतीय मराठी संमेलन, कोल्हापूर१९९२ ||जरीपटका|| मध्ये छापून आली आहे.

स्वागत

शारदेच्या प्रांगणात | माय मराठीचा तोरा
पंचगंगा थबकली | झुले कळस साजिरा
महालक्ष्मी निवासिनी | थोर क्षेत्र करवीर
मराठीच्या सारस्वता | गवसले गं माहेर
अष्टविद्दा चारी कला | कष्ट हाच सामवेद
रंगताना दरबार | सान थोर नाही भेद
शारदेच्या पालखीचे | सारे ऋणाईत भोई
स्वेदगंगा शिकविते | वापरावी कशी शाई
काही लिहू गाऊ गीत | चित्र अक्षर कहाणी
जीवनाचा अनुभव | शब्द ब्रह्म ये अंगणी
राजर्षीच्या स्मरणाने | आवाहन दरबारा
पासष्टाव्या संमेलना | करु मानाचा मुजरा

जरीपटका

||जरीपटका||

%d bloggers like this: