आपले स्वागत आहे!

Archive for मार्च, 2011

पुरी

पुरी : कांदा भाजी व कांदा दही बरोबर तिखट मीठ च्या पु ऱ्या खाल्यास पोट भरत. चव पण चांगली लागते. पुरी करतांना कणिक(गव्हाच पीठ) हरबरा (चना ) डाळीच पीठ घेऊन त्यात तीखट मीठ हळद हिंग जिरे ओवा तेल एकत्र करुन गोळा छोटे गोळे करुन थोड जाड लाटून तेलात तळून काढाव्यातं. तेलातच चांगली चव येते तुपा पेक्षा .

तयार पुऱ्या गरम कांदा दही कांदाभाजी बरोबर खावं पुऱ्या बरेच दिवस राहत असल्यामुळे प्रवासातं पण नेता येतातं.

ओवा पुरी

ओवा पुरी

कांदा

कांदा : कांदा भाजी कांदा भजी कांदा पोहे दही कांदा सर्व पदार्थ आठवतातं. कांदा हाताने फोडुन पण खातातं. उन्हाळा मध्ये कांदा खाणं चांगलं असतं. प्रवासात पण कांदा जवळ ठेवतात.उष्णता शोषुन घेतो. उन्हाचा त्रास होत नाही. कांदा खाणं व प्रवासात जवळ ठेवणं चांगलं असतं.

कांदा भाजी : कांदा चांगला थोडा जाडसर चिरावा. तेलाची मोहरीची फोडणी ध्यावी. कांदा चिरलेला फोडणीत टाकून छान तांबुस परतावा. नंतर हरबरा डाळीचं चणा डाळीचं पीठ लावावं. तीखट मीठ हळद घालून थोड पाणी घालून हलवून वाफ़ आणावी. परत हलवून दोन वेळा वाफ़ आणावी. हिरवी कांदा पाताची भाजी अशीचं करावी.

कांदा भाजी

कांदा भाजी

|| मंत्र ||

कर्पुंरारती

कर्पुरगौरा | करुणावातारा | संसारसारा | भुजगेद्रहारा | सदा रहासी हृदयारविंदीं |
भवा | भवानिसहा तूज वंदीं ||१||

घालीन लोटांगण वंदीन चरण | डोळ्यांनीं पाहीन रुप तुझे | प्रेमे आलिंगींन आनंदें पूजिन | भावें ओवाळीन म्हणे नामा ||१||

त्वमेव माता च; पिता त्वमेव | त्वमेव बंधुश्र्च सखा त्वमेव | त्वमेव विद्दा द्रविणं त्वमेव | त्वमेव सर्वे मम देवदेव ||२ ||

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वां, ध्दायत्मना वा प्रकृतिस्वभावत् | करोमि यद्दत् सकलं परस्मै , नारायणा येति समर्पयामि ||३ ||

अच्युतं केशवं रामनारायणं , कृष्णदामोदरं वासुदेवं हरि | श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं , जानकीनायकं रामचंद्र भजे ||४ ||

हरे  राम  हरे राम , राम राम हरे हरे || हरे कृष्ण हरे कृष्ण , कृष्ण कृष्ण हरे हरे ||५ ||

|| मंत्र पुष्पांजली ||

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् | ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: | ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे |स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु || कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:| ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुष आम्तादापरार्धात् || पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोको S भिगितो मरुत: परिवेष्टारो मरुतस्यावासन् गृहे || आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति एक दंताय धीमहि तन्नोदन्ती प्रचोदयात ||

भावें ओवाळीन भावे नामा ||१ || हे नामदेवांनी लिहिले आहे.कायेन वाचा मनसेंद्रियै र्वा ,बुध्दायत्मना हे बुध्द यांनी लिहिले आहे. पण खालील नावं कोणी लिहिली ते माहीत नाही.

मला हे म्हणता येते मी रोज म्हणते. पुस्तक पण जवळ म्हनतांना वापरते.

DSCF1047

गणपती

मराठी व इंग्रजी वार

मराठी व इंग्रजी वार : मराठी :१ रविवार २ सोमवार ३ मंगळवार ४ बुधवार ५ गुरुवार ६ शुक्रवार ७ शनिवार असे ७ सात वार आहेत.

इंग्रजी : 1SUNDAY 2MONDAY 3 THUDAY 4 WEDNESDAY 5 THURSDAY 6 FRIDAY 7 SATURDAY असे इंग्रजी वार आहेत.

१ रविवार सूर्या चा वार २ सोमवार महादेवाचा वार ३ मंगळवार देवीचा अंबाबाई वार ४ बुधवार बुधब्राहस्पती चा वार ५ गुरुवार दत्ताचा वार ६ शुक्रवार देवी अंबाबाई चा वार ७ शनिवार हनुमानाचा वार असे सात ७ वार आहेत त्या त्या दिवशी त्या त्या देवाची आराधना करतातं. आठवडा चे दिवस ७ मराठी व इंग्रजी लिहिले आहेत.

कोणत्या वारी कोणत्या देवाची पूजा करतातं हे पण लिहिले आहे. सकाळ व संध्याकाळ देवापाशी तेल किंवा तुप याचां दिवा लावतातं व मंत्र आरती नमस्कार हे सर्व एका ठिकाणी बसून करतातं. त्यामुळे देवाला घराला वास्तुला आजुबाजुच्या परिसराला आपोआप त्या दिवा चा व आपण केलेली मनोभावे केलेली पूजा याचा आपल्याला व ईतर ठिकाणी त्याचा नक्कीचं उपवोग होत असणार.

DSCF1467

दिवा

‘अर्थ अवर’

पृथ्वीसाठी द्दा एक तास ! पर्यावरण व पर्यायाने आपल्या या पृथ्वीमातेचे रक्षण करण्यासाठी आपण कटीबध्द होण्याची गरज आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे

‘अर्थ अवर’. शनिवार दिनांक २६ मार्च संपूर्ण जगात ‘अर्थ अवर ‘ पाळण्यात येत आहे.त्यामध्ये रात्री साडेआठ ते साडेनऊ या तासात आपल्या घरातील विजा बंद ठेऊन आपन या वैश्विक प्रयत्नांमध्ये आपला खारीचा वाटा उचलू शक्तो ! दरवर्षी मार्च महिन्यात शेवटच्या शनिवारी ‘अर्थ अवर’ पाळण्यात येतो. त्यामध्ये घरगुती किंवा व्यावसायिक ठिकाणी असलेली वीज बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येते.

२००७ मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी या महानगरित सुरुवात केली.त्यांच्या आवाःअनाला प्रतिसाद देऊन त्यावेळी सिदनित २ .२ दशलक्ष रहिवाश्यांनी आपापल्या घरांतिल वीज व विद्दुत उपकरणे एका तासासाठी बंद ठेवली. पहिल्याचा प्रयत्नाला लाभलेला हा प्रचंड प्रतिसाद पाहून दुसऱ्या वर्षी अनेक अनेक शहरांमध्ये हा उपक्रम राबावान्याता आला .

एक तास वीज बंद ठेवा: हे चांगलच आहे. पण अगदी पूर्वी  एवढी वीजच खर्च होता नव्हती ! कंदील वापरतं असतं. घर भाड्यातच वीज बिल घेतं असतं. कंदील ची काचं रामगीळी किंवा राखेनी स्वछ कापडाने पुसून कंदील चिमण्या वापरत असतं. मी पण कंदील चिमणी ची काचं स्वछ केल्याचं मला आठवतं. आता आता बोअरींग चं पाणी उंचं चढण्या करता  लिफ्ट साठी T . V . संगणकासाठी फोन साठी भरपूर वीज वापरली जाते. मंध्यतरी ७/८ वाजता दिवे जातं असतं आम्ही देवापाशी दिवा व जिना मध्ये दिवा लावतं असतं.

हे म्हणतं लवकर बाहेर जाऊन ये आज संध्याकाळी दिवे जातील. आम्ही सर्व छान पाळत !

हिरवा कंदील

हिरवा कंदील

सागरगोटे

तुळसपाणी त्यांच्या चं पुस्तक मधील ही कविता आहे.

सागरगोटे

सागरगोटे
लहानपण छोटे
परीच्या स्वप्नाला सागरगोटे

सागरगोटे
उंचावूण झेल
सातरबाई खेळ सागरगोटे

सागरगोटे
खेळ हंडी हरु
तरी गोळा करु सागरगोटे

सागरगोटे
पाचच बोटे
षड्जाची तार सागरगोटे

सागरगोटे
जिणे अधांतर
कसे मध्यंतर सागरगोटे

DSCF1308

खेळ !

खेळ: लहानपणी आजोळी जात असू. ९ सागरगोटे घेऊन एक सागरगोटा ऊंच झेलतं व वर मान करुनचं जसा १ एक व ९ नऊ डाव असेल तसे खालील सागरगोटे गोळा करुन झेललेला सागरगोटा खालील एकत्र करुन झेलतं हंडी पर्यंत येत असतं हंडी पर्यंत कोणी आल की बस आता ईतर जणी ऊठुन जात कोणावरचं कधीच हंडी होत नव्हती. हे बरं !

शाळेतून घरी आल्यावर शेजारची यांच्या बरोबर विट्टी दांडू खेळतं मूल माझ्या पेक्षा मोठ्ठी असायाची. विट्टी दांडूने लांब जाईल तितक चांगल परत दांडू ने विट्टी उडवावयाची ३ तीन वेळा करून गोल पासून विट्टी जितकी लांब गेली तिथ पर्यंत दांडूनेच १ पासून गोल मोजायचे.१५ गोल झाले २० गोल झाले असा डावं खेळत. ए मला आणि एकदा डाव देना मी म्हणत देतं असतं.

शाळेत एक लोखंडी गोळा असे तो रेषेच्या बाहेर गेला की पास असे.माझा थोडाच बाहेर जातं असे व मी पास होत असे. खेळ परीक्षा असे.

स्पध्देत संगीत खुर्ची असे प्रथम मिळे नंतर आऊट. खो S खो खेळ एक या बाजूला दुसरी त्या बाजूलां खो देऊन पळायचं कधी कधी आऊट व्हावयाच.

असे बरेचं खेळ खेळले .

जीवनात पण छान खेळ झाले सर्व यशस्वी झाले.

लग्न मूले सौ सूना देश परदेश वास्तू चार शक्तीपीठ देवी दर्शन संत दर्शन सर्व छान मना सारखं झालं आहे.

ईतक जीवनात मिळणं सोपं नव्ह. नाही.

पैठणी

पैठणी

संत एकनाथ

शालिवाहन शक १९३२ विकृतिनाम संवत्सर रंगपंचमी व श्री एकनाथषष्ठी
मार्च २४. ३. २०११ तारखेला आहे.

संत एकनाथ: पैठन हे तालुकाचे गावं . औरंगाबाद पासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. एसवि सनापूर्वी ४०० च्या बौध्द ग्रंथ, पद्मपुराण, जैन व महानुभाव व इत्यादि ग्रंथांतून पैठणचा इतिहास पाहायला मिळतो. प्रतिष्ठानच्या या पुण्यनगरीतं १४ व्या शतकापासून अनेक ग्रंथकार, कवी, संत धर्मस्थापक होऊन गेले.शककर्ता शालिवाहन राज्याची म्हणूनही पैठणची ओळख आहे. समता एकनाथ महाराजांचे गाव म्हणून आज पैठणची ख्याती सर्वदूर पसरली आहे. पैठणकडे बघितले जाते.

१५२१ फाल्गुन रविवार हा एकनाथांचा निर्वाण दिन. संत एकनाथ महाराजांच्या या निर्वाणदिनी पैठण येथे ‘नाथषष्ठी‘ उत्सवाची मोठी यात्रा भरते. लाखो भावीक पैठणला तीन दिवसांच्या मुक्कामासा येतात.’कालाष्ठमी’ च्या दहीहंडी च्या कार्यक्रमाने या यात्रेची सांगता होते.नाथांची समाधी असलेले मंदिरा बस स्थानकाच्या पश्चीम दिशेला आहे.

या मंदिरात नाथांच्या रांजण अंसून श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रुपाने बारा वर्षे कावडी ने पाणी भरले. नाथषष्ठी च्या दिवशी रांजणाची पूजा होते. नाथ पैठण येथे तीन वास्तुत राहिले. पहिले नागघाट दुसरे घर मुंजास्थान व तिसरे घर राम्जनाजवळील घर होय. देवघरात प्रवेश करताना दोन चौकोनी खांब आहेत. दक्षिणेकडील खांबाला टेकून पुराण संगता व उत्तरेकडील खंबावर ‘उध्दव’ ही अक्षरे आहेत. श्रीखंड्या उध्दव रुपाने प्रगट होऊन नाथांना दर्शन दिल्याचे प्रतीक आहे.

नाथांच्या या नगरीत जायकवाडी धरण व संत ज्ञानेश्वर उद्दानाचा प्रकल्प बघण्यासारखा आहे. शिवाय पैठण प्राचीन नगरीचा परिसरही जुन्या संस्कृतीच्या इतिहास ओळख करुणा देणारा आहे.

मी लहान असतांना व आतां आतां १५ वर्षा पूर्वी पैठण पाहिले आहे.

संत एकनाथ महाराज     पैठणची पैठणी

संत एकनाथ महाराज                               पैठणची पैठणी

उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्र

मी ०८.०३.२०११ ह्या तारखेला ‘वसुधालय… माझे साहस! (वसुधा चिवटे)’ हा लेख पाठविला आहे.

दिनांक १० मार्च, २०११ शेवटची तारीख होती. २० सभासदांचे लेख आले.

मराठी कॉर्नर स्पर्धेचा निकाल २०.०३.२०११ रोजी निकाल जाहीर झाला आहे. मी ‘वसुधालय… माझे साहस! (वसुधा चिवटे)’ ह्यात मला उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्र मिळाले आहे. मला खूप आनंद व छान वाटत आहे उत्तेजनार्थ प्रशास्तिपत्र बद्दल !

ते आपण सर्वांनी आवश्य उत्तेजनार्थ प्रशास्तिपत्र पाहावे. धंयवाद ! धन्यवाद !

vasudha[1]

वसुधा चिवटे

उस्ताद बिस्मिल्ला खाँ

उस्ताद बिस्मिल्ला खाँ अखिल भारतीय चक्रवर्ती, पद्मभूषण असा गौरव प्राप्त केलेल्या जगद्विख्यात सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा आज जन्मदिन. दि. २१ मार्च १९१६ रोजी त्यांचा जन्म झाला. सनई आणि बिस्मिल्ला खाँ या अतूट जोडीने भारताची कीर्ती साऱ्या जगात पोहोचविली. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी सनईवादनाला बैठकीत स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ‘गूंज उठी शहनाई’ मधून त्यांच्या सनईचे सूर सर्व पोहोचले. अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांनी प्रथम: च जीव ओतून सनईवादन केले. रसिक मने त्यांची कायमची ऋणी झाली. सामाण्याजानाम्शी ज्यांची कला जुळली, असा हा कलावंत. कोणताही मोठा सांस्कृतिक समारंभ बिस्मिल्लांच्या सुरांनीच होतो. आशा या आंतरराष्ट्रीय कलावंतांचा आज जन्मदिन.

ही माहिती २१ मार्च २०११ पुढारी अंक ४ पान कोल्हापूर मध्ये लिहिली आले.

उस्ताद बिस्मिल्ला खाँ

उस्ताद बिस्मिल्ला खाँ

तुकारामबीज

शके १९३२ विकृतिनामसंवत्सर  उत्तरायण  शिशिरऋतु फाल्गुन कृष्णपक्ष व्दितीया तुकारामबीज २१ .३ .२०११ ला आहे त्यानिमीत्त तुकाराम यांचे अभंग लिहिले आहेतं.

११६७. तूं माझी माउली तूं माझी सावली | पाहातों वाटुली पांडुरंगे ||१||
तूं मज एकुला वडील धाकुला | तूं मज आपुला सोयरा जीव ||२||
तुका म्हणे जीव तुजपाशीं असे | तुझियानें ओस सर्व दिशा ||३||

१४९९. आनंदाचे डोहीं आनंदतरंग | आनदंचि अंग आनंदाचें ||१||
काय सांगों झालें कांहींचियाबाई | पुढें चाली नाहीं आवडीनें ||२||
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा | तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ||३||
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा | अनुभव सरसा मुखा आला ||४||

Hindu Jnaneshvar and Tukaram smaller

Tukaram

चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ

चंद्र आहे साक्षीला ..!

चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ

मुंबई : प्रतिनिधी तुम्हा-आम्हा सर्वांचा चांदोबा शनिवारी पृथ्वीच्या जवळ येणार आहे. गेल्या १८ वर्षांत पहिल्यांदाच हा चांदोबा नेहमीच्या तुलनेत मोठा व तेजस्वी दिसणार आहे. पृथ्वीपासून ३ लाख ५६ हजार  ५७५ कि.मी. अंतरावर येणाऱ्या या ‘सुपरमून’ला पाहण्याची संधी चालून आली आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळचा हा उपग्रह. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रातील भारती-ओहोटीचे चक्र सदैव सुरु असते. आठवड्याभरापूर्वी जपानमधील भूकंप व त्सुनामीचे खापर चंद्रावर फोडण्यात आले. जमिनीतील भूगर्भीय हालचाली व खगोलीय घटनांचा काही संबंध नाही, हे वैज्ञानीकांनी जाहीर केल्यावर चांदोबावरील शंकेचे मळभ दूर झाले. १९ मार्चला फाल्गुन पौर्णिमेला सायंकाळी ६.४७ मिनिटांनी आकाशात चंद्राचे आगमन होईल. खगोल अभ्यासकांनाही सुपरमून पाहण्याची ओढ लागली आहे. ‘पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर ३ लाख ८२ हजार ९८० कि.मी. एवढे आहे. पृथ्वीभोवती चंद्राची कक्षा लंबवर्तुळाकार असते. एक फेरी पूर्ण करण्यासाठी २८ दिवसांचा कालावधी लागतो. त्या दिवसात तो कधी दूर, तर कधी लांब असतो. १८ वर्षांनतर शनिवारी चंद्र हा नेहमीपेक्षा पृथ्वीच्या थोडा अधिक जवळ  येणार आहे. पृथ्वीपासून तो ३ लाख ५६ हजार ५७५ कि.मी. अंतरावर असेल. नेहमीपेक्षा २०० ते ३०० कि.मी. ने जवळ असेल. चंद्र प्रचंड मोठा असेल, असे काही नाही. सर्वसाधारण पौर्णिमेला चंद्र अर्धा अंश (वैज्ञानिक भाषेत ३० कोणनीय मिनिटे) दिसतो. यावेळी तो ३३ ते ३४ कोणनीय मिनिटे एवढा दिसेल. असा तेजस्वी चंद्र पाहायलाच हवा’, असे खगोल अॅकॅडमीचे  डायरेक्टर  प्रदीप नायक यांनी ‘पुढारी’ला सांगितले.

ही सर्व माहिती १९.०३.२०११ ला पुढारी अंक मध्ये आली आहे.

चंद्र

चंद्र

चंद्राचं छायाचित्र मी स्वतः घरातील कॅमेरा मध्ये मी छायाचित्र काढला आहे.

फाल्गुन (होळी) पौर्णिमा

शालिवाहन शक १९३२ विकृतिनाम संवत्सर फाल्गुन पोर्णिमा मार्च १९ .३ २०११ ला आहे.

शेणानं सावरुन गोवऱ्या एकावर एक रचून एरंडा चं झाडं लावतातं .फुगे लावून सजवतातं रांगोळी काढतात. पूजा करतातं होळी लावून त्यातं पूरण पोळी देतातं घालतात. कोणी कोणी सकाळी पण घरापुढे होळी नैवद्द करतातं होळीतं घालतातं. सुर्यास्ता च्या वेळी कोणी होळी करतातं. सार्वजनीक होळी मध्ये मी नेहमी पूरण पोळी नैवद्द ला नेता असते. व होळी तं पूरण पोळी घालते.

शालिवाहन शक पोर्णिमा शेवट ची पोर्णिमा व वर्षातली पण शेवट ली पोर्णिमा असते.

पुरण पोळी

पुरण पोळी

वीर सावरकर

ऐतिहासिक उडीची शताब्दी ! ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 

फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये बोटीतून उडी घेतली, त्या ऐतिहासिक घटनेला आज १०० वर्षं पूर्ण होत आहेत. त्रिखंडात गाजलेल्या या उडीच्या शताब्दीनिमित्ताने मार्सेलिस येथे खास समारंभसुद्धा होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स ८ जुलै २०१० ‘विचार’ पान ६ मध्ये ही माहिती आलेली आहे.

महाराष्ट्र टाइम्स    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

महाराष्ट्र टाइम्स                                           स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

शालिवाहन शक मधील सण

शालिवाहन शक मधील सण

१ चैत्र : या महिनात गुढीपाडवा सण असतो या दिवशी अभ्यंगस्नान करुन गुढी उभी करावी. ब्रह्मध्वजाय नम: असे म्हणून गुढीचे पूजन करावे. ब्रह्मध्वज नमस्ते S स्तु सर्वाभीष्ट फलप्रद | प्रात्पे S स्मिन्वत्सरे नित्य मद्गृहे मंगलं कुरु || या मंत्राने प्रार्थना करुन नंतर पंचांगावरील गनपतिचे पूजन करावे. रामनवमी व हनुमान जयंती मारुतीचा जन्म दिवस असतो.

२ वैशाख : अक्षय तृतीया : गौरीहर दोलोत्सवाची समाप्ती अक्षय्य तृतीयेस करावी.

३ ज्येष्ठ : वटपौर्णिमा : वडाखाली ब्रह्मा सावित्रीचे पूजन वायन (वाण) आणि सत्यवान सावित्री कथा श्रवण व उपोषण ही मुख्य कर्मे आहेत. या दिवशी बैलाचा सण साजरा करतात. बैलाची पूजा करतात.

४ आषाढ : चातुर्मासाचा आरंभ व गुरूपौर्णिमा व्यासपूजन करतात. दीप पूजा दिव्याची आवस म्हणून अमावास्या ओळखली जाते.

५ श्रावण : नवनागपूजन व श्रीकृष्ण जयंती व अमावास्या ला तोडुन आणलेले दर्भ वर्षभर उपयोगात आणतात. बैलाची पूजा केली जाते. अमावासेला करतातं.

६ भाद्रपद : शुक्लपक्ष चतुर्थी ला गणपती आणून पूजा करतात. ऋषिपंचमी गौरी पूजन करतातं. अनंत चतुर्दशी अनंताची पूजा करतातं.

७ आश्विन : नवरात्र सुरु करतातं ललिता पंचमी दसरा सण साजरा करतातं. गोवत्स व्दादशी आयंकाळी वासरासह गाई ची पूजा करतातं. धनत्रयोदशी सूर्यदयाच्या आधी अंगोळ अभंगस्नान करतातं कणकेचा दिवा न ओवाळतातं संस्ध्याकाळी दिवा दक्षिण या दिशा बघून दिवा ठेवतातं.

८ कार्तिक : बलिप्रतिपदा साडेतीन मुहूरतापैकी एक दिवस म्हणून मानला जातो.वहिची पूजा लक्ष्मी व खोंड म्हणजे कुबेर याची पूजा करतातं. वडील व नवरा यांना ओवाळतातं.यमव्दितया भाऊबीज भावाला ओवाळतातं. तुळसी विवाह करतातं. कार्तिक त्रिपुरारी पोर्णिमा दिवा सकाळी चं लावतातं.

९ मार्गशीर्ष : खंडोबाचे नवरात्र मार्तंड (मल्हारी) खंडोबाचा सहा रात्रीचा उत्सव प्रतिपदा ते चंपाषष्ठी पर्यंत असतो. नागपुजनाच्या दिवशी नागाची पूजा करून अनेक प्रकारच्या पक्वान्नांवर दिवे लावून खंडोबास व मुलांना ओवाळावे. चंपाषष्ठी मोठ्ठा उत्सव करावा .दत्त्तात्रय जयंती करतातं.

१० पौंष : शाकंभरी देवी नवरात्र करतातं मकरसंक्रात सण साजरा करतात.

११ माघ : गणेश जयंती श्रीगणेशाचा जन्म जन्मोत्सव असतो. वंसत पंचमी रथसप्तमी गुरु प्रतिपदा श्रीक्षेत्र गानगापूर येथे मोठा उत्सव व यात्रा असते. महाशिवरात्र या दिवशी शिवाची पूजा अभिषेक अर्चा जप करावे .सहस्त्र बेलची त्रिदले वहावीत. कवठा च्या पदार्था चा नैवेद्द दाखवावा.

१२ फाल्गुन : होळी (हुताशनी) पोर्णिमा सांयकाळी होळी पेटवून पूजा करावी.धूलिवंदन दुसरे दिवशी करावे. रंगपंचमी करतातं वंसतोत्सव साजरा करतातं.

मागील ब्लॉग मध्ये महिने व पौर्णिमा लिहिले आहेतं आता सण लिहिले आहेत.

कमळ

कमळ

‘चकवा’

ह्यांच्याच ‘तुळसपाणी’ पुस्तक मधील ह्यांचीच ही कविता आहे.

चकवा

थांब थोडा
महिरप
अधराची
मुरडू दे

गुंतताना
केसांतली
चाफेकळी
धुमसू दे

थांब थोडा
निजअर्थी
डोळ्यांतली
उतरु दे

येई आता
चंद्रकांता
चंद्रगात्री
पसरू दे

तुळस

अल्बर्ट आईनस्टाईन

अल्बर्ट आईनस्टाईन : अणुविज्ञानाचे जनक असणाऱ्या अल्बर्ट आईनस्टाईन यांचा आज जन्मदिन. दि. १४ मार्च १८७९ रोजी दक्षिण जर्मनीतील उल्म शहरात ज्यू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सापेक्षतेचा सिद्धांत मांडणाऱ्या E = MC2 या त्यांच्या प्रसिद्ध समीकरणावरच कालांतराने अणूचे विभाजन करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. १९२१ मध्ये पदार्थविज्ञान शास्त्रातील संशोधनाबद्दल आईनस्टाईन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञान म्हणजे निसर्ग व मानव यांना जोडणारा दुवा असे मानणारा शांततावादी शास्त्रज्ञ म्हणून सारे जग या थोर वैज्ञानिकाला ओळखते. ‘दि मीनिंग ऑफ रिलेटिव्हिटी’, ‘इव्होल्यूशन ऑफ फिजिक्स’ व ‘आउट ऑफ माय लेटर इयर्स’ हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अल्बर्ट आईनस्टाईन यांचा आज जन्मदिन.

ही माहिती कोल्हापूर पुढारी मध्ये १४ मार्च २०११ ला आली आहे.

183113322

अल्बर्ट आईनस्टाईन

३ ऋतु !

१ ऊन्हाळा २ पावसाळा ३ हिवाळा असे तीन ऋतु आहेतं.

१ ऊन्हाळा ऋतु: या ऋतु मध्ये कैरी आंबे करवंद जांभळ कलिंगड टरबुज खरबुज द्राक्ष अशी फळ मिलतातं. फणसाचे गरे मिळतातं. ओले मोठ्ठे अंजीर पण हया ऋतुतं छान मिळतातं.

ऊन्हाळा मध्ये चैत्र महिनातं कडुलिंब चा पाला त्यात जिरे गुळ मीठ हिंग एकत्र करुन खातातं कडु कारले जास्त प्रमाणात भाजी खातातं कैरीचं पन्ह तक्कु लोणचं हरबराची कैरी डाळ करतातं. गुलमोहर झाडांना लाल  पिवळा मोहर येतो तसेच चाफ्याच्या झाडांना लाल पिवळी हिरवी पांढरी फुलांनी मोहर येतो चैत्र पाडव्याला या फुलांची माळ गुढीला घालतात.

२ पावसाळा ऋतु: मध्ये अननस सफरचंद पेरु पेरु जास्त प्रमाणातं मिळतातं.
शेतीची पेरणी वृक्षारोपण पावसाळ्यातं करतातं.
पावसाळ्यात मोर आनंदानी नाचतात. मोर हे भारताचं राष्ट्रीय पक्षी आहे.

३ हिवाळा ऋतु : संत्र मोसंब पपई सिताफळं रामफळं ऊस व ऊसाचा रस मिळतो.
केळी बारा महिने ही मिळतातं.

आतां आतां सर्व ऋतु मध्ये सर्व फळ मिळतातं पण ऋतु प्रमाणे फळ खाल्यास पचणास व चवीत पण गोड लागतातं.

गुलाबी चाफा   कैरी

गुलाबी चाफा                                                    कैरी

मोर

मोर

स्वंयपाकाची भांडी

स्वंयपाकाची भांडी : खूप चं खूपं पूर्वी मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवीतं असतं. आताही किकर संक्रांतला बोळक्यामध्ये मुग तांदुळाची खिचडी करतातं दूध ऊतू जाऊ देतातं.

नंतर लोखंडी भांडी निघाली तवा कढई विळी ऊलथन अशी लोखंडी भांडी वापरतं असतं लोखंडी भांड्यातं आयर्न असतं त्यामुळे अजूनही कित्त्येकजण फोडणी करता छोटी कढई बुटकलं घरी वापरतातं कांही दिवसांनीं पीतळ तांब यांची भांडी आली पीतळी भांडी वापरतांना नंतर कलही करु लागले. मिसळणाचा डबा वापरतं असतं.

नंतर स्टेनलेसष्टीलची भांडी आली पाणी पिण्याकरता ष्टीलचे पीप वापरु लागले जेवणासाठी ताट वाट्या फुलपात्र वापरु लागले. स्वंयपाकासाठी निर्लेपची भांडी आली पाणी पिण्या करता काचेचे ग्लास आले.

स्टेनलेसष्टील च्या कुकरला तांब लावलेल व स्वंयपाक दूध तापविण्या करता तांब लावलेली स्टेनलेसष्टीलची भांडी मिळतातं. निर्लेपची भांडी वापरतांना लाकडी डाव झाऱ्या ऊलथन व निर्लेपची चं अशी डाव ऊलथन पण मिळतातं. अल्युमिनियम ची पण भांडी स्वंयपाकातं वापरत कुकर पण मिळत असतं.

आता स्टेनलेसष्टील ची कुकर चांगली मिळतातं. चांदी ची भांडी दूध पाणी पिण्या करतां वापरतातं.

तळाच तांब स्टेनलेस स्टील

निर्लेपची भांडी

श्रावण घेवडा ची भाजी

श्रावण घेवडा ची भाजी : मार्च मध्ये पण श्रावण घेवडा फनसबी पण म्हणतात चांगली मिळते. मटार पण हिरवा गार मिळतो भाजी बाजारातं.मटारचे सोलून घ्यावा. श्रावण घेवडा चिरुण घ्यावा. आम्ही पूर्वी शिरा काढून हातानेचं लहान लहान तुकडे करतां असतं. गवार पण अशीच निवडतं असतं.

श्रावण घेवडा व मटार एकत्र कुकर मध्ये थोड पाणी घालून दोन शिट्या द्याव्यातं पचण्यास हलक असतं फार कच्च खाल्ल की आतड्यांना ताण पडतो. लहान मोठे व्यक्तींना पण त्रास होतो. शिट्या दिल्या नंतर कुकर मध्ये भाजी मध्ये तीखट मीठ हळद हिंग दाण्याचा कूट घालावा. वरुण लोखंडी कढईतं तेल मोहरी ची फोडणी करुन भाजी मध्ये घालावी परतं सर्व भाजी एकत्र करुन गरम करावी. छान बाऊल मध्ये भाजी पोळी बरोबर खाण्यास द्यावी. चव पण येते व पोट पण चांगलच चं भरतं. माझ्याकडे लोखंडी कढई आहे.

साखर किंवा गुळ घालू नये भाजीची चवं चांगली लागते.

श्रावण घेवडा ची भाजी         लोखंडी कढई

श्रावण घेवडा ची भाजी                                             लोखंडी कढई

दादरा ६ मात्रा

ताल – दादरा

६ मात्रा

               +
               १   २    ३  /  ४   ५    ६
बोल –> धा धीं ना / धा ती ना

रिषभ – प्रिया

– धून – दादरा ६ मात्रा

ध S ध प ध२ ३ प S प म ग२ ३
सा ग S ग म ध S प म२ ३. म ग रे सा नी
— सा ग s ग म ध S प S म २ ३ , ४ ५ ६ – || धृ ||

या रागात म ध व नी हे स्वर कोमल लागतात बाकीचे शुध्द लागतात.

वादी स्वर ध संवादी स्वर रे

निसा निसा धनी धनी पध पध मप मप गम गम रेग रेग – धृ || साग S ग
निसा धनी पध मप रेग सारेसा सारेसा सारेसा – धृ || सा ग S ग

‘रे’ तार सप्तकातला वाजवून नि रे सा ला थांबले आहे.

मी हा राग भाद्रपद गणपती च्या दिवसात दुपारी ४ वाजतां वाजविल्यामुळे उन्हं दिसते.

सराचं अक्षर      DSCF0309

सराचं अक्षर                                             दादरा

वर्ल्ड कप सेमी-फायनल

तर मित्रांनो, ह्या वर्षी भारत वर्ल्ड कप जिंकेल अशी सर्वांनाच आशा आहे पण कुठल्या चार टीम सेमी-फायनल मध्ये येतील असे तुम्हाला वाटते? आपले मत खाली नोंदवा.

जागतिक महिला दिन ‘ ८ मार्च ’

जागतिक महिला दिन ८ मार्च ला साजरा करतातं. पूर्वी महिला घरातं असल्या तरी जातावर दळणं करतां असतं. घरीच शेता वरचे आलेले धान्य निट करुन वर्षभर राहील असं स्वच्छ रांजनातं ठेवतं असतं. घरातच गाई म्हशी असल्यामुळे गोठा स्वच्छ ठेवतं. दुध तुप घरीच खाण्यास सर्वांना मिळत असे. चिंचेनी पितळी भांडी स्वच्छ नीट ठेवतं सारवण व त्यावर रांगोळी काढतं. ऊमऱ्यावर मोर किंवा वडाचं झाडं काढतं बाजं बसण्यासाठी विणत. आताही महिला भरपूर कामं कारातातं पण कामाची पद्धतं वेगळी आहे.

नोकरी साठी ऑफिसला बाहेर जातातं मोटर कार चालवावयाला शिकल्या आहेतं विमान पण चालवतातं डॉक्टर होतात गणित विषयात P.H.D. होतातं. पूर्वी ओवी म्हणतं स्तोत्र म्हणत आता संगीत शिकतात. पोलीस पण किरण बेदी आहे. असे भरपूर महिला चांगलं चांगलं कामं ऊद्दोग करणाऱ्या आहेतं राष्ट्रपती प्रतिभा पाटील आहेत मीराकुमार लोकसभा अध्यक्ष आहेत. U .P . A . अध्यक्ष सोनिया गांधी आहेत.

अवकाश वीर कल्पना चावला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी कविता लिहिणाऱ्या शांता शेळके अशा भरपूर महिला आहेत. म्हणून चं महिला दिन साजरा करतातं, मादाम मेरी क्यूरी यांना विज्ञान शास्त्रा मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले आहे.

किरण बेदी

किरण बेदी

सप्तश्रुंग देवी व महालक्ष्मी देवी

सप्तश्रुंग वणी ची देवी : खुपचं खूप पूर्वी १९७५ / १९७६ साली मी आमच्या च्यां बरोबर माझे सौ आई वडील भाऊ (बाळं) सौ वाहिनी त्यांचा मुलगा आकाश व माझी बहीण कमलाताई आमची मूलं पुष्कर व प्रणव असे सर्वजण नाशिक ला गेलो तेथे धर्मशाळेतं राहिलो

सकाळी ४ वाजतां ऊठून डोंगर चढण्यास सुरुवातं केली.केवढा मोट्ठा डोंगर.बापरे त्यावेळेला होतां ! मोठमोठे दगड असे.आम्ही सर्वजण डोंगर चढूण सकाळी ७ वाजतां पायरी पाशी आलो

तेथे गुरुजी नां पुरणपोळी चा नैवेद्द सांगुन सर्व आटपून पायऱ्या चढण्यास सुरुवातं केली.व छान मनासारखं सर्वाचं चं सप्तश्रुंग वणी देवी चं चांगलं चं दर्शन झालं आमचं सर्वाचं आज ही ती आठवण मनातं आहे. भरते. नंतर नैवेद्द प्रसाद खाऊण परत डोंगर ऊतर ण्यास सुरुवातं केली.व ७ वाजतां नाशिक ला आलो. नंतर मुंबईत आलो. मी व आमची मूले पुणे कोल्हापूर असं घरी आलो.

कोल्हापूर महालक्ष्मी : कोल्हापूर देवी दर्शन नवरात्रात आलो होतो तेंव्हा तिसरी माळ चालू होती. नवरात्रातं मी दसरा पर्यंत बरेच वर्ष महालक्ष्मी देवी दर्शन केलं आहे. वास्तु पण नवरत्रातं झाली आहे. ह्यांचं वसुधालय पुस्तक नवरात्रात चं छापून आलं आहे.

Goddess Saptashrungi Devi of Vani near Nasik city Maharashta     mahalaxmidevi

सप्तश्रुंग देवी                                             महालक्ष्मी देवी

रेणुका देवी व तुळजापूर देवी

मी चार देवी दर्शन केले आहे हे लिहिले आहे. माहुर रेणुका देवी दर्शन नुकतेचं माघ महाशिवरात्र ला छान दर्शन झाल्याचं लिहिले आहे.

तुळजापूर देवी दर्शन लग्ना आधी माझ्या चुलत बहिण सौ. निशा हिच्या लग्नाला उस्मानाबादला गेले होते. त्यांच्या बरोबर नंतर देव दर्शन म्हणून तुळजापूर देवी दर्शन केले. नंतर माझं लग्न झाल्यावर मी हे व आमची मूले सर्वजण मिळून मी परत तुळजापूर देवी दर्शन केले आहे. त्यावेळा पंढरपूर पण विठोबा चं देव दर्शन केले आहे. कोल्हापूर महालक्ष्मी देवी दर्शन लिहिले आहे. सप्तशृंग देवी दर्शन लिहीनं.

mahur renuka devi    Tulajapur Bhavani

Mahur Renukadevi                           Tulajapur Bhavanidevi

कॉटन कपडे

कॉटन कपडे : आता उत्तरायण सुरु झाल आहे. फाल्गुन महिना सुरु झाला आहे. तसेच. मार्च महिना पण सुरु झाला आहे. एप्रिल मे महिने पण एतील. उन्हाळा चांगलाचं जाणवेल. कॉटन कपडे वापरणं चांगल मानतातं. हलक व मऊ वापरण्यासं घामाच्या द्रुष्टिनं चांगल असतं. पांढरे रंगीत कॉटन कपडे चांगले बाझारात मिळतातं. सूती मऊ कपडे वापरल्याने दिसतं पण चांगल. हवामान हया दृष्टिण पण चांगल असतं. कलकत्ता साड्या बाझारातं बाराही महिने मिळतातं. रंगीतं साड्या वापरल्या तरी ऊठावदार पणा येतो दिसतो. पुरुशां चे पण कॉटन कपडे मलमलचे सुती कपडे बाझारातं मिळतातं. लहान मूला मुलींचे पण कॉटन कपडे छान चं बाझारातं मिलतातं. सर्वानी सुती कपडे मार्च एप्रिल मे मध्ये वापरुन हवामान या द्रूष्टीन वापरणं चांगलं आहे.

कॉटन कपडे

कॉटन कपडे

कोकीळा कुहू S कुहू

 

१ वसंत ऋतु २ ग्रीष्म ऋतु ३ वर्षा ऋतु ४ शरद ऋतु ५ हेमंत ऋतु ६ शिशिर ऋतु.असे सहा ६ ऋतु आहेतं. उत्तरायण शिशिर ऋतु चालू आहे.मार्च एप्रिल महिना सुरु होईल.

आंबा ची झाड आंबा च्या बागा यांना मोहर आला आहे. कैऱ्या येण्यास सुरुवातं झाली आहे. आंबा च्या झाडांना मोहर आला आहे. आमच्या भागातं सकाळी ७/८ वाजतां व दुपारी ४ वाजतां कोकीळा कुहू S कुहू गातांना चांगला चं आवाज ऐकू येतो. कुहू S कुहू .कुहू S कुहू ईत्क की गोड ऐकू येत की कांही विचारुचं नका ! कोकीळा चा आवाज सर्वांनी चं ऐकला आहे हे सर्वांना चांगलंचं माहित आहे. आमच्या घरा जवळ झाडावर कोकीळा बसलेली आम्हाला दिसते. लाल डोळा छान बघून तिच्याकडे बघतं राहावं वाटतं. हया दिवसातं पंचम स्वर लावून गातातं व वाद्द वाजवतांना पण पंचम स्वर लावून वाजवतातं. सारंग राग पंचम स्वर व म कोमल स्वर व नी शुध्द नी व कोमल नी लावून चं गातातं व वाद्द पण हेच स्वर लावून वाजवतात.

आरोह – सा रे म प, नी शुध्द सा
अवरोह – सा नी कोमल प, म कोमल रे सा
पकड – रे नी कोमल प नी शुध्द सा रे, नी शुध्द रे सा
गत त्रिताल ८ मात्रा रे मम प नी कोमल प म S रे सा रेरे नी शुध्द सा
अंग – प S पपप नी शुध्द S नी शुध्द सा रे मम रेम रे S रे सा दोन वेळा घेणे. रे S रेरेरे म S म प म प प म नी कोमल प म कोमल रे ३ मात्रे पासून गत
अंतरा – नी शुध्द सासा नी शुध्द रे सा नी कोमल प म प प म नी कोमल प म कोमल रे नंतर ३ मात्रे पासून गत

सारंग राग मध्ये ताना तोडे विलंबित गत १६ मात्रेची त्रिताल ८ मात्रेचा व झाला करून सा वर राग थांबवतातं संपवतातं

मी सतार शिकले आहें मी खूप वेळा सारंग राग सतार वर वाजविला आहे.

Asian Koel (Eudynamys scolopacea)   DSCF0744

DSCF0640

सतार

परवचा

पूर्वी शाळेतली मूले पाढे रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावला की पाढे म्हणतं असतं. व दगडीपाटीवर पाटीवरच्या पेंनसीलने पाढे लिहितं असतं. चौकोण करून खालील चौकोण पुसूनये म्हणून पट्टी ठेवून सरकवतं सरकवतं छान पाढे मराठीतं लिहित असतं. दगडी दोन एकत्र पाटी त्यावेला मिळतं असतं. लिखाण पण पाटीवर करतं असतं.असेच शाळेत न पुसता निट नेत असतं आज ही त्या शाळेची व आमच्या मुलांनी केलेल्या लिहिलेल्या पाढ्याची आठवण येते.किती शिस्तीचा अभ्यास शिकवणं असे हे लक्षातं येते. हे नक्कीचं.

२१ ४२ ६३ ८४ १०५ १२६ १४७ १६८ १८९ २१० 
२२ ४४ ६६ ८८ ११० १३२ १५४ १७६ १९८ २२०
२३ ४६ ६९ ९२ ११५ १३८ १६१ १८४ २०७ २३०
२४ ४८ ७२ ९६ १२० १४४ १६८ १९२ २१६ २४०
२५ ५० ७५ १०० १२५ १५० १७५ २०० २२५ २५०
२६ ५२ ७८ १०४ १३० १५६ १८२ २०८ २३४ २६०
२७ ५४ ८१ १०८ १३५ १६२ १८९ २१६ २४३ २७०
२८ ५६ ८४ ११२ १४० १६८ १९६ २२४ २५२ २८०
२९ ५८ ८७ ११६ १४५ १७४ २०३ २३२ २६१ २९०
३० ६० ९० १२० १५० १८० २१० २४० २७० ३००
असे पाढे २१ ते ३० पर्यंत आहे.

पाढे

पाढे

शेवया ची खीर

शेवया ची खीर : शेवया प्रथम बारीक करुन घ्यावातं. सादुक तुपातं परतून घ्याव्यातं. थोड दुध घालून शिजवून घ्यावं. नंतर साखर घालावी व परत थोड दुध घालून ऊकलावं. आवडी प्रमाणे जायप्हळ किंवा वेलदोडेची पुड घालावी. बदाम थोडसं बारीक करुन शेवया खीर मध्ये घालावे.

तुपातं परतलेल्या शेवया दुध साखर जायफ़ळ बदाम सर्व मिळून केलेली शेवया खीर तयारं. पोळी पुरी बरोबर खाण्यास खूपचं चांगली लागते. पोट पण भरतं. ऊपासं सुटतांना कांही तरी गोड पदार्थ खातातं .अशी शेवयाची खीर केली तर ऊत्तमं.

शेवया

शेवया ची खीर

महाशिवरात्र

आज शके १९३२ शिशिर ऋतु व माघ कृष्णपक्ष महाशिवरात्र आहे. शिवपूजन करतात.

मी महाराष्ट्र मधील चार देवी शक्तीपीठ केली आहेत.१ तुळजापूर २ कोल्हापूर ३ सप्तश्रुंग ४ माहुर रेणुका असे चार देवी दर्शन केले आहे.

माहुर देवी रेणुका देवी दर्शन केल त्यावेला आम्ही आमचा मुलगा पुष्कर व मी कोल्हापूर नांदेड माहूर येथे गेलो.तेथे रिक्षा केली. प्रथम दत्त मंदिर पाहिल अनुसया देवीच दर्शन केल.

नंतर महादेव दर्शन केल लहान मोठे दगडी महादेव ऊंच ओटयावर ऊंच दगडावर कोरलेलं महादेव आहेत. खुपचं खूप महादेव पाहिले व एकदम मनाला छानच वाटलं त्यावेळेला.आजही डोळ्यातं मनातं महादेव भरतातं दिसतातं. त्यादिवशी माघ शिवरात्र होती व आज ही माघ शिवरात्र आहे त्याची आठवण आजपण येत आहे.

नंतर आम्ही रेणुका देवीचं माहूर देवीचं दर्शन घेतल.रिक्षा माहुराला आली माहूर नांदेड व कोल्हापूर असं छान प्रवास केला घरी हे व प्रणव आमचं देव दर्शन चांगल झालं म्हणून खूष झाले. त्यावेळेला. नंतर मी सौ. सूनबाई व ईतारांना फोनवर आमचं रेणुका देवी दर्शन चांगलं झाल्याचं सांगीतलं.

महादेव पाहिले याची आजही छान लक्षातं आहे. येतं.

Bangalore Shiva

बेंगलोर शिवा

मी पूर्वी रांगोळीने ॐ लिहिले आहे व संगणक वर पण ॐ लिहिले आहे ते दाखवत आहे.

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

ॐ रांगोळी

भारतीय सरकारी नाणी

भारतीय सरकारी नाणी

21412678

भारत सरकारने थोर लोकांची काढलेली नाणी, मी आमच्या घरी जपून ठेवलेली नाणी दाखवीत आहे.

DSCF1418

%d bloggers like this: